Monday, January 9, 2023

*शब्द शब्द बहु अंतरा, शब्द के हाथ न पांव।*

*एक शब्द करे औषधि, एक शब्द करे घाव।।*

*शब्द सम्भाले बोलिये, शब्द खीँचते ध्यान।*
*शब्द मन घायल करे, शब्द बढाते मान।।*

*शब्द मुँह से छूट गया, शब्द न वापस आय।*
*शब्द जो हो प्यार भरा, शब्द ही मन मेँ समाएँ।।*

     🙏🏻 जयश्री कृष्णा🙏🏻  
Good morning🙏🙏

: मोगऱ्याला उठण्यास,
जरा उशीरच झाला होता!
पण सुवास मात्र त्याने,
मध्यरात्रीच दरवळला होता!

रात्रभर जागरण करून,
रातराणी नुकतीच उठली होती!
पानावरच्या दवबिंदुशी,
काही तरी गुजगोष्टी करत होती!

गंधाळलेल्या नजरेनी,
निशीगंध सारे पहात होता!
थंडीतल्या कोवळ्या किरणांना
तो हसत अंगावर घेत होता!

गुलाबी थंडीतही, ही फुलांची अशी मजा चालली होती!
संकटातही मजेत रहा, असं
प्रत्येक पाकळी जणू सांगत होती...
🎋🌿🍀☘️🥀☘️🍀🌿🎋

🌻🙏🏻मंगल शुभप्रभात🙏🏻🌻

 आली एकादशी
कार्तिक महाची
ओढ लागे मना
विठूच्या वारीची ||

खुशी ना मनात
खेद मनांतरी
बंद झाली यंदा
पंढरीचीवारी ||

पंढरीची वारी 
भक्तांचा विसावा
ओढ मनोमनी
विठ्ठल दिसावा ||

विठ्ठल दिसावा
मनी हाच लोभ
आनंद वारीचा
मिळो सर्व लाभ ||

मिळो सर्व लाभ
मंदिरे खुलावी
सर्व देवतांना
मुक्तता मिळावी ||

मुक्तता मिळावी
 नित्य भक्तजना
नाहिशा व्हाव्यात
सा-यांच्या वंचना ||

सा-यांच्या वंचना 
वारीने जातात
कोरोना जाऊ दे
खोल नरकात ||

कोरोनापासून
नक्की व्हावी मुक्ती
भक्तांच्या मनात
भक्तीची आसक्ती ||

यंदा मात्र एक 
शास्त्र पाळू या 
विठोबाची पूजा
घरीच करू या ||

अनंत केशव देवघरकर
अलिबाग. दि.25/11/20

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...