स्वातंत्र्यदेवीची विनवणी - कुसुमाग्रज
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
======================================
*शब्दमोती साहित्य,मंच मुंबई*
*राष्ट्रस्तरीय काव्यस्पर्धा*
*उत्तेजनार्थ*
स्नेहा समीर राणे, मुंबई
" स्पर्धेसाठी"
कवितेचे शीर्षक-पाऊस माझ्या मनातला.
स्पर्धक क्रमांक-SSM 012
माझ्या अंगणातली विहीर आटते आहे.
जरा उशिराच उगवलेला पाऊस याच्या भरवशावर तगेल सारं ?
नदी वाहील दुथडी भरून ?
रानमाळ हुंकारेल ?झाड,पान तरारेल ?
धारागारांनी माणूस मोहरेल ?आणि- - -
जरा उशिराच उगवलेलं माझं कवितेचं रोप वाढेल ?
का माझ्या अंगणातल्या विहीरी
सारखंच आटत जाईल ?
उरली-सुरली हताश झाडे - - -
पाऊस - - -पाऊस- - -गात राहातील !
मी फक्त ऐकत राहीन,त्यांचे पावसाचे गाणे आणि - - -
माझ्या मनातल्या कवितांच्या रोपांची सळसळही,मी फक्त ऐकत राहीन
माझ्या कवितांतून म्रुद् - गंधाचा
हळवा सुवास मनभर होत जातो
एक एक कविता मग - - -
डोळाभर स्वप्नं घेऊन अलगद अवतरते.
मन हरपत जाते, बेभान होऊन पाऊस क़ोसळत राहतो- - -
मनभर नुसतं पाऊस पाणी.
माझी एक-एक कविता मग पावसाच्या पाण्यात सोडते.
लहानपणाच्या कागदी होड्यां सारख्या हेलकावे खात त्या दूरवर जातात.
त्या कागदी होड्यांना अनेक संदर्भ होते,पण - -
या कविता डोळ्यांदेखत वाहत जातात.
यांच्या शिवाय जगणं आतासं एकटं वाटतं.
[8/17/2020, 2:05 PM] +91 99870 04481: अल्पसंख्याक
मूळ हिंदी कवी - पुनीत शर्मा
------------------------------ --------------------------
मी पाकिस्तानात छळला गेलेला
हिंदू आहे
मी हिंदूस्तानात दाबला गेलेला मुस्लिम आहे
मी इस्त्रायलकडून मारला जाणारा
पॅलेस्टिनियन आहे
मी जर्मनीत ठार झालेला ज्यू आहे
मी इराककडून जाळला गेलेला कुवैती आहे
मी चीनकडून चिरडण्यात आलेला तिबेटी आहे
मी अमेरिकेत घुसमट होत असलेला कृष्णवर्णीय आहे
मी आयसीसकडून अन्यायग्रस्त यजीदी आहे
मी अशोकाकडून हरलेला कलिंगी आहे
मी रशियाकडून त्रस्त सिरीयन आहे
पाॅलिश आहे,
हंगेरियन आहे,
युक्रेनीयन आहे
मी अकबराकडून पराभूत मेवाडी आहे
मी ब्रिटनकडून लुटला गेलेला आशियाई आहे
आफ्रिकन आहे
आॅस्ट्रेलियन आहे
उत्तर आणि दक्षिणी अमेरिकन आहे
मी अमेरिकेच्या शस्त्राअस्त्राने उद्धवस्त
केला गेलेला इराकी आहे
व्हिएतनामी आहे
लिबीयन आहे
अफगाणी आहे,
जवळजवळ ७० नागरीकत्वाची
जळती कहाणी आहे
मी म्यानमारमधून पळवून लावलेला
रोहिंग्या आहे
मी श्रीलंकेतून संपवण्यात आलेला तमिळी आहे
मी चौर्याऐंशीचा शीख आहे
मी भारतातील जंगलांमधून उद्धवस्त केला गेलेला आदिवासी आहे
मी आपल्या भूमीवर कैद काश्मिरी आहे
मी काश्मिरातून बेघर करण्यात आलेला काश्मिरी पंडीत आहे
मी आसामचा बंगाली आहे
मी स्वतःच्या देशात वर्णभेद साहणारा पूर्वोत्तरवासी आहे
मी पितृसत्ताकतेपासून जीव वाचवणारी मुलगी आहे
मी कुटुंबातून बहिष्कृत समलैंगिक आहे
मी कोलाहलात दाबला गेलेला सवाल आहे
मी वेदांनी बहिष्कार टाकलेली एक जात आहे
मी सामाजिक प्रतिष्ठेसाठी मारला गेलेला प्रेमी आहे
मी धर्मांधांकडून धमकावला गेलेला नास्तिक आहे
मी झुंडीबाहेर ढकलली गेलेली चेतना आहे
मी तर्कशून्य झुंडखोरीने घाबरवलेला तर्कनिष्ठ आहे
मी कधी एखाद्या गावातला,
कधी एखाद्या राज्यातला
कधी एखाद्या देशातला
कधी एखाद्या समाजातला
कधी एखाद्या संस्थेचा
तर कधी अवघ्या जगातला अल्पसंख्याक आहे
मी बहुसंख्याकांना दाखवला गेलेला बागुलबुवा आहे
मी दरोडेखोर सत्तेचा सर्वात सोपा प्यादा आहे
आणि मला ठाऊक आहे की हे दोघे हसतील जर मी स्वतःला निरपराध म्हटले तर
मग माझी भूमी कुठली आहे
माझा देश कुठे आहे
माझे घर कुठे आहे
या पृथ्वीवर मी काय कायमच
बेघर-फिरस्ता असणार आहे?
------------------------------ --------------
मूळ हिंदी कविता
पुनीत शर्मा
punit sharma
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
आभार:
सुनीता रामटेके
#अनुवादमाला
=========================================
: मित्रांनो नवीन कविता नक्की वाचा..आवडली तर नक्की सांगा...



" बाप्पा " 
कैलासाहून बाप्पा तुझी
सुटली का रे स्वारी ...?
वाटेत कुठे राहू नकोस
सरळ ये घरी.....
कुणीच नाही दिसेल तुला
उभ्या रस्त्यावरती....
वर्दीतला देव एकटाच
बघत असेल वरती.....
दर्शनास बाप्पा तुझ्या
नाही दिसेल गर्दी.....
एकटं एकटं वाटेल तुला
बघून अवती भवती....
तुझ्या माझ्यात बाप्पा
अंतर आता वाढेल.....
दुरून पाहत तुला
डोळयांत पाणी भरेल.....
ताट तुझ्या जेवणाचं
सूनं सूनं असेल...
आवडते मोदक तुझे
त्यात कमी दिसेल...
भजन आणि कीर्तनाला
येणार नाही भरती....
मंद मंद आवाजात
होईल तुझी आरती.....
प्रसादा पूर्वी हातात
Sanitizer येईल.....
तोंडावरच हसू
मास्काआड जाईल......
या कोरोंनाने बाप्पा
हाल आमचे झाले....
चूक झाली आमची
मान्य आम्ही केले....
संकटातून तार बाप्पा
होऊनी आमचा सखा....
तूच आमचा आधार
आता तूच पाठीराखा
आता तूच पाठीराखा....
गणपती बाप्पा मोरया
No comments:
Post a Comment