Monday, January 9, 2023

 मी घर बांधतोय घरासारखं......

मी घर बांधतोय घरासारखं...
आणि हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय मनासारखं.
मी विचारलं त्याला, बाबारे ना तुझ्या नावाचा सातबारा
ना तुझ्या नावाचं मुखत्यारपत्र...
तर म्हणाला.... अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं आणि कुणाच्या मनात घर करणं?
म्हणाला, माझं घर तर काड्यांचं आहे. तुझं घर माडीचं आहे. नात्यांची घट्ट वीण, विणत गेला नाहीस, तर माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं....
मला वाटायचं, माझ्यामुळे त्या पक्षाचं घर झालं..
आता वाटतंय, त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं...
आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असतो.
तो डोळे झाकून घरट्यात बसला की समाधिस्थ बुद्ध वाटतो.....
त्या पक्षाने एवढं शिकवलं मला,
एका घराची दोन घरं होण्यापेक्षा
'घरात घर करून राहणं' कधीही चांगलं.
😊😊😊

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...