Monday, January 9, 2023

 🌹आई 🌹

आई म्हणजे मंदीराचा उंच कळस. 
अंगणातील पवित्र तुळस 
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी , 
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी 
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी 
आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी 
मातृदिननिमित्त आपल्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा   
🌷🌷🌷🌷🌷

==========================================


. *-II मातृत्व दिन II-*
        *घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही.*HB
*सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात, तेव्हा शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात.* 
     *"स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी"*
अमेरिकेत सर्वप्रथम मातृत्वदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने दत्तक म्हणून अपत्य देखील घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. आपल्या प्राणप्रिय जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यार्थ 'मदर्स डे' मातृत्व दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
            जगभरात साजरे केले जाणारे विविध दिन हे विशिष्ठ तारखेला असतात. पण, मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही निश्चितपणे ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ९ मे १९१४ रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात यावा. तद्नंतर भारतासह जगभरातील अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आणि तो देखील प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी.
            आ - म्हणजे "आत्मा"
             ई - म्हणजे "ईश्वर"
आत्मा व ईश्वर यांचे एकरुप म्हणजे "आई" 
*माझ्यासह सृष्टीतील समस्त सजीवांना जन्म देणाऱ्या असंख्य मातांच्या चरणांवर माझा साष्टांग दंडवत. मातृ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा II*
💐💐💐
=============================================

#🙂आई सोबत आठवणी u Mom

●जेव्हा चपाती भाजताना बसतो वाफेचा चटका....
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा दुखत असेल काही आणी राञभर झोप लागत नाही...
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा कडकडून भूक लागते..आणि डब्यात नसते काही.. आपले आपल्यालाच करावे लागते..
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा शाॅपिंग करताना .."आवडले तर घेऊन टाक हे पण..माझ्यातर्फे घे" हे शब्द नसतात..
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा सहलीला जाताना विकतचे पदार्थ घ्यावे लागतात,नसतो प्रेमाने दिलेला घरचा खाउ जवळ..
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा आपलेच लेकरू देते एखादे उलटे उत्तर आणि डोळ्यात येते टचकन पाणी..
तेव्हा आई आठवते.
● जेव्हा काम करुन थकते तन आणि कौतुकासाठी असते तरसलेले मन 
तेव्हा आई आठवते.
● जेव्हा आपल्याकडून काही चांगले झाले..आणि "आईचेच गुण आले हो"अशी कुणी पावती देते..
तेव्हा आई आठवते. 
●जेव्हा मनात साचलेल्या गोष्टी ऐकायला कुणी नसते..झालेली चिडचिड व्यक्त करायला हक्काची व्यक्ती नसते.
तेव्हा आई आठवते.
●"तू कर तूझे काम..बाकीचे मी बघते"..हे मी मुलीला सांगत असते..
तेव्हा आई आठवते.
●जेव्हा ठराविक वेळेला वाजणारा Mom नावाचा काॅल..त्या त्या वेळेला वाजत नाही..
तेव्हा आई आठवते.
🥰🥰🥰🥰

आई असताना..आईची काळजी घ्या...तीला शक्य तेवढा वेळ द्या...निदान रोजचा एक फोन तरी..
क्योंकी..जो है समा.. कल हो ना हो...

===================================================

" *एक रूम आई साठी*

  *प्रत्येकानेच वाचावीच अशी पोस्ट*✅

साहेब ! कुरिअर आहे... नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली... कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले...बघतो...म्हणून कुरिअर उघडले... आत एक पॅक केलेला मोबाईल आणि ३पानी एक पत्र...
अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे... इकडे कसा..? आणि पत्र कोणाचे आहे..?
मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले... अगं ! आईचे पत्र आहे... मग वाच ना.. ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वाच पत्र...
मी पत्र वाचायला सुरुवात केली...

प्रिय अजित, 

अजूनही तू मला प्रिय आहेस, म्हणून प्रिय लिहिले आहे...
तुझा व्हॅट्स ऍप वर मातृदिना प्रित्यर्थ पाठविलेला संदेश मिळाला...
अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे, हे समजून बरे वाटले... नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान...
फेसबुक/व्हाटसअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले...१०० च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या... पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही...न जाणो नावातील साधर्म्य पाहून, कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर, तू उगाच कानकोंडा होणार, म्हणून टाळले...
पण बेटा ! हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते... असो ! प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे...कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील, तुझा व सुनेचा फोटो पण पहिला... खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू... सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून...बंगला पण छान बांधला आहेस...
कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले... लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली...त्यावेळी खरंच वाटले नव्हते, कि तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू...सर्वजण म्हणायचे, माई ! तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही... सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही...
तुला खूप शिकविले, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला... तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास... परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली... तुला आवडलेल्या मुलीशी, लग्न लावून दिले...सोन्या सारखी दोन नातवंडे मिळाली... तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून, आनंदाने डोळे मिटणार होते. पण ! अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली...
परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस, परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास...पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते... परदेशातून परत आलेला मला, आमच्या संस्थापक बाई कडून समजले...आणि तू दिलेला १० लाखाचा चेक पण समजला... चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा..! पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटस ची होती...
मग मी सुद्धा, आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली...
एक सांगू राजा..! तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस...तुझ्या कडे राहिले असते, तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्या पुरते मर्यादित राहिले असते... इथे मला खुप समवयस्कर, समदुःखी मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत... मी आता एकदम मजेत आहे... तुझ्या १० लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे... मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही... अधून मधून बंटी-बबली आठवतात... आता मोठे झाले असतील ना रे..! आजीला ओळखणार पण नाहीत...आणि तुही ओळख सांगू नकोस...
सुनबाई नोकरी करते का रे अजून... हं ! आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही...हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन... तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे...
अरे..! आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे..! आम्हाला माया हवी असते... ज्या मुलांना आपण वाढविले, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेचे कोड-कौतुक कर ... आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची ईच्छा असते... पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार...अरे ..! केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका... आपल्या साठी पैसा हवा, पैश्या साठी आपण नको...
आता वाटते की, माझेच संस्कार कुठे तरी कमी पडले, नाहीतर मुले हि मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात... त्यामुळे मी तुला किंवा सूनबाईला दोष देत नाही... तुम्ही सर्वजण सुखात रहा हीच अंतिम इच्छा... फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच...

"नोकर माणसां साठी आणि कुत्र्यां साठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात, तशीच एक रूम आई साठी बांधता आली नाही का रे तुला...?

👏👏👏👏👏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...