*आज कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे, म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहेत...!!!* .
*हल्ली माणसं पहिल्या सारखं दुःख कुणाला सांगत नाहीत, मनाचा कोंडमारा होतोय म्हणून आनंदी दिसत नाहीत...!!!* .
*एवढंच काय एका छता खाली राहणारी तरी माणसं जवळ राहिलीत का ?, हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?...!!!*
*अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालंय, पैश्याच्या मागे धावता धावता दुःख खूप वाट्याला आलंय...!!!*.
*नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात, एखाद दुसरा शब्द बोलतात, पण काळजातलं दुःख दाबतात...!!!*.
*जाणे येणे न ठेवणे,न भेटणे, न बोलणे या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका, गाठी उकलायचा प्रयत्न करा, जास्त गच्च होऊ देऊ नका...!!!*.
*धावपळ करून काय मिळवतो याचा जरा, विचार करा, बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा आपल्या माणसांची मनं भरा...!!!*
*एकमेका जवळ बसावं बोलावं आणि नेहमी नेहमी तिरपं चालण्याच्या ऐवजी थोडं सरळ रेषेत चालावं...!!!*
*समुद्री चोहीकडे पाणी आणि पिण्याला थेंबही नाही अशी अवस्था झालीय माणसाची यातून लवकर बाहेर पडा...!!!*.
*माणसं अन माणुसकी नसलेली घरे, अन देव नसलेले देव्हारे, कितीही पॉश असले तरी त्याचा काय उपयोग नाही..!!!*

No comments:
Post a Comment