*तुमचा आयुष्यभराचा जोडीदार कोण?*
- श्री श्री रविशंकरजी
आई?
वडील?
पत्नी?
मुलगा?
नवरा?
मुलगी?
मित्र?
ह्यापैकी कुणीही नाही.
तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार आहे तुमचे शरीर.
एकदा का शरीराने तुमची साथ सोडली की कुणीही तुमच्या सोबत नसतं.
तुम्ही आणि तुमचे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत एकत्रच राहतात. तुम्ही आपल्या शरीराशी जे काही करता, ती तुमची जबाबदारी असते आणि तेच तुम्हाला परत मिळते.
तुम्ही आपल्या शरीराची जेवढी काळजी घ्याल, तेवढीच तुमचे शरीरही तुमची काळजी घेत असते.
तुम्ही काय खाता, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय करता, ताण तणावाचा तुम्ही कसा सामना करता, आपल्या शरीराला किती विश्रांती देता, ह्या साऱ्या बाबींवर तुमचे शरीर तुम्हाला कसा प्रतिसाद देते हे ठरत असते.
हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठे राहता तो स्थायी पत्ता म्हणजे फक्त तुमचे शरीरचं आहे.
तुमचे शरीर ही तुमची संपदा/जबाबदारी आहे, जिचा वाटेकरी इतर कुणीही नसतो. तुमच्या शरीराची जबाबदारी तुमच्यावरचं आहे. कारण तुम्ही खरेखुरे आयुष्याचे जोडीदार आहात.
स्वस्थ रहा. स्वतःची नीट काळजी घ्या. पैसा काय? येत राहील, जात राहील. नातेवाईक आणि मित्रमंडळी स्थायी नसतात.
तुमच्या स्वतः शिवाय तुमच्या शरीरासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही.
प्राणायाम - फुफ्फुसांकरिता
ध्यान - मनाकरिता
योग - शरीराकरिता
चालणे - हृदयाकरिता
सकस अन्न - आतड्यांकरिता
चांगले विचार - आत्म्याकरिता
चांगले कर्म - जगता करिता





No comments:
Post a Comment