*काल पुन्हा त्या रायगडावर*
*मला शिवराय दिसले*
*वाकून त्यांना मी जयभीम केला*
*तेव्हा ते गालातच हसले*
*मी विचारले राजे आपणास*
*माझा राग तर नाही ना आला*
*ते म्हणाले बरं झालं बाळा*
*तू मला जयभीम केला*
*कारण माझा खरा वारसदार तर*
*तुझा भीमरावच ठरला*
*ज्याच्या पुढे तर इथला*
*अतिहुशार सनातनी ब्राह्मणपण हरला*
*त्यांनीच तर माझ्या त्या स्वराज्यसोबत*
*खरा काय तो न्याय केला*
*जहाल त्या जातीव्यवस्थेवर इथल्या*
*योग्य तो उपाय केला*
*त्याचं खडतर ते जगणं*
*त्याचं परखड ते बोलणं*
*त्याचा संघर्षही माझा स्वराज्याच्या*
*संकल्पने इतकाच महान आहे*
*आणि माणसाला इथं माणुसकी शिकवण्याची*
*त्यालाच लागली तहान आहे*
*पण दुःख मला एवढंच वाटतं*
*माझा लेकरांना एवढं साधं गणित कळत नाही*
*माझा नुसताच गवगवा करतात*
*पण त्यांचे मन भीमरायकडे पण का वळत नाही*
*माझं तर एवढंच सांगणं आहे त्यांना*
*मी तुमच्या अखंड सोबती आहे*
*परंतु तू आज फक्त एक भारतीय म्हणून जग*
*तलवारी लय उचलल्या हाती तू*
*आता तो कलम उचलून बघ*
*मग तुलाही त्या तलवारीची गरज*
*कधी आयुष्यात पडणार नाही*
*या पुढे तुझ्यावर अन्याय*
*इथं कधीच घडणार नाही*
*त्या सूर्याचा देह जरी मावळला इथं*
*पण त्याच्या विचारांचा प्रकाश कधी मावळणार नाही*
*आणि त्याच्या सारखा महान भूमिपुत्र*
*आपल्याला पुन्हा इथं मिळणार नाही*
*म्हणून इथल्या तमाम नेत्यांमध्ये*
*तोच महान ठरतो*
*आणि तुझ्यासोबत आज मीही*
*त्या ज्ञानाच्या सूर्याला मानाचा जयभीम करतो*
*आणि तुझ्यासोबत आज मीही त्या ज्ञानाच्या सूर्याला मानाचा जयभीम करतो................*
No comments:
Post a Comment