Saturday, December 10, 2022

१) त्याची आई नेहमी म्हणायची बापाचा बूट मुलाच्या पायात बरोबर बसला की समजावे मुलगा घराची काळजी घेण्याएवढा मोठा झालाआहे.

   त्याने एकदा सहज म्हणून बापाचा बूट घालून बघितला आणि खरचं तो त्या दिवसापासून मोठा झाला.कारण बापाचे बूट झिजून त्यांच्या तळाला छिद्र पडलेले आहे हे त्याला त्याच दिवशी समजले.

२) वडील कामावरून घरी येताच तो म्हणाला
" बाबा ,तुम्ही दिलेल्या पैशातून मी भारीपैकी मजबूत बूट आणलेत."

"छान.असेही तुझे बूट झिजून चालले होते." वडील म्हणाले
" तुम्ही घालून बघता का तुम्हालाही बसतील."
" मला काय करायचेत घालून? माझे आहेत ना?"
" घालून तर बघा. बसले तर कुठे लग्नाबिग्नात जायला काम पडतील."

" बरं...आण ते इकडे."

"बाबा, एकदम छान बसलेत तुम्हाला. आता हे बूट तुम्हीच वापरायचे.तुमचे जूने बूट अगदीच खराब झालेत."
"नको रे. नवीन बूटात मला काम करायची सवय नाही."
" बाबा ,माझी शप्पथ आहे तुम्हाला. आता हेच नवीन बूट वापरायचे."

"शप्पथ नको घालू.वापरीन मी.पण तुझे बूट झिजलेत त्याचे काय?"

"माझे बूट तुमच्या जून्या बूटांपेक्षा कमीच झिजलेत. अजून चालतील काही महिने."

३) त्याच्या प्रशस्त सुंदर दिवाणखान्यात एकच गोष्ट खटकणारी होती,ती म्हणजे जूने झालेले,तळ झिजलेले बूट. एका कोपऱ्यात त्या बूटांची जोडी व्यवस्थित ठेवलेली होती. कोणी त्या बूटाविषयी विचारले तर तो सांगायचा

"जेव्हाही मला माझ्या आजच्या पोझीशनबद्दल गर्व होतो,माझा अहंकाराचा फुगा वरवर जातो तेव्हा मी या बूटांवर नजर टाकतो.मी मोठा व्हावा म्हणून कोणीतरी किती कष्ट केलेत ह्याची जाणीव मला होते आणि माझे पाय जमिनीला टेकतात."...

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

                      *🔴सुविचार🔴*

*💧मदद करना सीखिये, फायदे के बगैर । मिलना जुलना सीखिये, मतलब के बगैर । जिन्दगी जीना सीखिये, दिखावे के बगैर । मुस्कुराना सीखिये, सेल्फी के बगैर । और रिश्तों पर विश्वास रखिये, किसी शंका के बगैर ।* 

*💧झूठी बातपे जो वाह करेंगे, वही लोग आपको तबाह करेंगे । इस अफ़सोस के साथ न उठो, कि कल आप क्या नहीं कर पाए । बल्कि इस सोच के साथ उठो, कि आज आप क्या कर सकते हो ।*

*💧अच्छा स्वभाव वह खूबी है, जो सदा के लिये सभी का प्रिय बना देता है ! कितनाभी, किसीसे दूर हो, पर अच्छे स्वभावके कारण आप किसी न किसी पल यादोंमें आ ही जाते हो । इसलिये स्वभाव ही इंसान की अपनी कमाई हुई सबसे बड़ी दौलत है ।*


💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

 मी तुला एक प्रश्न विचारणार आहे असे म्हटल्यावर सगळ्या चुकीच्या गोष्टी आठवतात..........

*~ ✍🏻व.पु .काळे |📚 हुंकार..*

🌅 *" आजचा सुंदर विचार "*

   _*सकाळ म्हणजे भुतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार निर्मळ मन आणि मुखावर स्मित हास्य असावे, स्वतः सोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...