*असणं आणि दिसणं...*
*एकदा खूप महिन्यानंतर,* *एका मित्राच्या घरी गेलो होतो.*
*मस्तं गप्पा टप्पा आणि चहाचा रतीब चालू होता.*
*तितक्यात आतल्या खोलीतून मित्राची आजी बाहेर आली.*
*खूप आस्थेने त्यांनी माझी,*
*आणि घरच्यांची चौकशी केली,*
*आणि मग "चालू दे तुमचं" म्हणून,*
*त्या परत आत गेल्या.*
*थोड्या वेळाने मी निघालो.*
*बाहेरूनच आजींना हाक मारली.*
*आजी, निघतो मी,*
*आजी बाहेर आल्या.*
*मी त्यांच्या पाया पडलो.*
*प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेऊन म्हणाल्या.*
*खूप दिवसांनी आलास.*
*येत जा हो अधूनमधून.*
*दिसत राहावं बाबा..बरं वाटतं.*
*खरंच.. किती महत्त्वाचं असतं,*
*असणं आणि दिसत राहाणं.*
*आपल्या आयुष्यात अनेकजण येऊन जातात.*
*कमी अधिक प्रमाणात तरंग उमटवून जातात.*
*आपले ठसे मागे सोडून जातात.*
*काळाच्या ओघात काही ठसे पुसट होत जातात,*
*तर काही गहिरे रंग ठेवून जातात.*
*या प्रवासात अनेक नाती,*
*हृणानुबंध जपलेले असतात.*
*सगळ्याच नात्यांना नावं नाही देता येत.*
*मग त्याला आपण मित्र,*
*किंवा मैत्रीण म्हणतो.*
*त्यांचं असणं हा एक मोठा दिलासा असतो.*
*एकाच वस्तीत राहूनही दिवस दिवस भेटू न शकणारे सुहृदही असतातच की,*
*पण ते आहेत, नुसते जिवंत आहेत, असं नव्हे.*
*तर आपल्या मैत्रीत आहेत ही भावनाही सुखावह असते.*
*ते असणं खूप महत्वाचं पण ते "असणंपण" टिकवणं हे सर्वात महत्वाचं.*
*तसे मित्र मैत्रिणी पुष्कळ असतात.*
*सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात तर फारच.*
*पण शब्दांच्या पलिकडे जाऊन,*
*हृणानुबंध जपणारे फारच थोडे.*
*अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.*
*काही प्रत्यक्षातले तर काही आठवणीतले.*
*काही जवळ असलेले,*
*तर काही दुरावलेले.*
*काही खांद्यावर हात ठेवून शेजारीच उभे असलेले,*
*तर काही पापण्यांच्या कडांवर ओथंबलेले.*
*"दिसणं" महत्वाचं आहेच,*
*पण "असणं" लाख मोलाचं...!!*




*आयुष्य हसत-खेळत जगले पाहिजे,*
*असे म्हणतात,*
*पण खेळणे तर काही लोक लहानपणीच विसरुन जातात,*
*आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदा-यांमध्ये दबून जाते.*
*निर्णय चुकला तरी हरकत नाही.*
*स्वतःवर विश्वास असला की,*
*जीवनाची सुरूवात कुठूनही करता येते.*
*आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं,*
*तर,तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो.*
*मनापासून लिहीलेल्या गोष्टी,*
*मनाला स्पर्श करुन जातात.*
*त्या नेहमीच काही तरी वेगळं बोलून जातात.*
*काही माणसं भेटून बदलत असतात.*
*आणि काही माणसांना भेटून,*
*आयुष्यात बदल घडून येतात.*
*कुणी देव म्हणो,कुणी दैव म्हणो,*
*कुणी निसर्ग म्हणो,कुणी योगायोग म्हणो!*
*पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही,*
*अशी एक अंध, अवखळ शक्ती,*
*माणसाला माणसाशी जोडत असते.*
*कधी रक्ताच्या नात्याने,*
*कधी भावनेच्या नात्याने,*
*कधी गरजेच्या नात्याने!*
*वादळी समुद्रात,*
*फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे,*
*जशी लाटांमुळे जवळ येतात.*
*तसेच या अफाट जगात घडते.*
*कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो,*
*कुणी तरी आपला सांभाळ करते.*
*शाळेच्या चिमण्या जगात कुणी तरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखविते.*
*कुणी तरी चिमणदातांनी राय-आवळ्याचे दोन तुकडे करून,*
*त्यांतला एक आपल्याला देते.*
*योगायोगाने जवळ आलेल्या,*
*कुणाच्या तरी जीवनात यौवन,*
*आपले जीवन मिसळून टाकते.*
*जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे,*
*दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे,*
*त्याचे जीवन फुलावे,*
*म्हणून त्याच्यासाठी जे-जे करता येईल,*
*ते-ते करणे...*
*अहंकार आणि गैरसमज,*
*या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र,*
*आणि आप्तेष्टांपासून दूर करतात.*
*गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही.*
*आणि*
*अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही.*
*गैरसमज हे मॅगीसारखे असतात,*
*लगेच होतात...*
*तेही फक्त २ मिनिटात,*
*यावर उपाय एकच...*
*गरम असतानाच संपवावे,*
*नाहीतर चिकटून बसतात,*
*आणि चिवट होतात...*
*मन कोसळलं की,माणूस कोसळला.*
*मन शाबूत ठेवलं की,*
*आयुष्य पैलथडीला हसत खेळत नेता येतं.*
*माणूस प्रथम मनानं खचतो,*
*आणि तस झालं की,*
*प्रवाह संथ असतानाही,*
*त्यांच्या होड्या उलटतात,*
*संकटातून वाचल्याशिवाय,*
*जीवाची किंमत समजत नाही.*
*आणी जीव गुदमरल्या शिवाय,*
*श्वासांची किंमत कळत नाही.*
*मालमत्तेचा वारस किती असू शकतात.*
*मात्र कर्माची वारस आपण स्वतःहाच आहोत.*
*एक सत्य लपविण्यासाठी,*
*दहा वेळा खोटे बोलावे लागते,*
*आणि त्यासाठी चिंता करावी लागते,*
*म्हणूनच खरे बोलण्याची सवय ठेवा,*
*म्हणजे चिंता करावीच लागणार नाही.*
*कोणतीही नाती उगीच टिकत नाहीत.*
*त्यासाठी निस्वार्थीपणे जीव लावावा लागतो...!!*



No comments:
Post a Comment