Thursday, December 22, 2022

 *काढा पिताय तर हे संपुर्ण निट वाचा*

      कोरोनाव्हायरस चे इन्फेक्शन मार्चमध्ये वाढू लागले आणि सर्वांना आयुर्वेद ची आठवण झाली. वेगवेगळे आयुर्वेदिक काढे जो तो आपल्या मनाने किंवा ऐकीव माहितीवर प्यायला लागला. कसलेच इन्फेक्शन नसले तरी बरेच जण काढे प्यायला लागले. हळूहळू इतके लोक काढे प्यायला लागले की त्यासाठी लागणाऱ्या वनस्पती बाजारातून नाहीश्या झाल्या. आणि आम्हा डॉक्टरांना कधी नव्हे ते वनस्पती दुर्मिळ झाल्या .दुकानातून ती चूर्ण गायब झाली. त्यात रामदेव बाबांनी त्यांची औषधे सांगितली आणि लोक त्याच्यावर तुटून पडले. यात भर म्हणून "आयुष" ने एक आयुर्वेदिक काढा प्रसिद्ध केला आणि मग काय जो तो सकाळ दुपार संध्याकाळ काढा पिऊ लागला. आयुष् ने सांगितलेला काढा हा व्हायरल इन्फेक्शन जर झाले तर त्याच्या सुरुवातीला प्राथमिक उपचार म्हणून हा काढा घ्यायचा होता परंतु लोकांना या गोष्टी समजले नाहीत आणि त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन नसेल तरीही लोक दिवसातून तीन वेळा हा काढा घ्यायला लागली .मुळात आयुष् ने योग्य सांगितले होते. कोणतेही व्हायरल इन्फेक्शन झाले आणि आणि सर्दी, ताप ,घसा दुखणे, घसा खवखवणे, खोकला येणे अशी जर सुरुवातीची वायरल इन्फेक्शन ची लक्षण असतील तर हा काढा घ्यायचा होता. लोकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी हा प्रतिबंधक काढा समजून प्यायला सुरुवात केली. यामध्ये सुंठ,पिंपळी, मिरे दालचिनी लवंग इ. उष्ण औषधे होती. जर तुम्हाला वरील काही लक्षणे असतील तर त्यासाठी या का ढा नक्की उपयोग होता. परंतु कोणतेही लक्षण नसलं तर हा काढा रोज पिण्याने त्रास नक्कीच होणार होता. व्हायरल इन्फेक्शन च्या सुरुवातीच्या काळात हा पाच ते सात दिवस काढा घेतला तरी पुरेसा होतो. परंतु लोकांनी हा महिना महिना प्यायला सुरुवात केला आणि त्याचा त्रास नक्की होणार होता. यातील औषधांचे चुकीचे प्रमाण घेण्यामुळे बर्‍याच लोकांना याचा त्रास होऊ लागला. ही सर्व औषधे उष्ण असल्यामुळे पोटात आग पडणे, पित्ताचा त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, लघवीला जळजळ होणे, शौचाच्या जागी आग होणे, शौचावाटे रक्त पडणे, लघवीला पिवळी होणे अशी लक्षणे दिसायला लागली त्याहीपुढे जाऊन काहीना मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. आताही परिस्थिती काहींच्या दृष्टीने 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी झाली. त्यामुळे कोरोनाव्हायरस इन्फेक्शन बाजूलाच राहिले आणि नको त्या वेगवेगळ्या आजारावर ती उपचार करण्याची वेळ आली. आता यात नक्की चूक कोणाची होती? आयुष् ने सांगितलेला काढा बरोबर होता परंतु तो व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर चा प्राथमिक उपचार म्हणून घ्यायचा काढा होता. लोकांनी गैरसमजातून तो व्हायरल इन्फेक्शन प्रतीबंधक काढा समजून रोज घ्यायला सुरुवात केली आणि तो पाच-सात दिवस न घेता महिना-महिना घ्यायला लागली त्यातील औषधांचे प्रमाण चुकली रोज विनाकारण गरम पाणी प्यायला लागली आणि त्याचा त्रास लोकांना झाला. तो काढा रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा आहे असे लोकांना वाटले परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने तो काढा रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी उपयोगी नव्हता. रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी आयुर्वेद मध्ये दुसरी औषधे वापरली जातात ज्याला आयुर्वेदीय परिभाषेत 'रसायन 'असे म्हटले जाते. यातील कुठलीही औषधे रसायन या परिभाषेत बसत नाहीत. त्यामुळे अजूनही जर कोणी हे काढे विनाकारण रोज घेत असतील तर त्यांनी ते कृपया थांबवावे. जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शन ची लक्षणे दिसायला लागली तरच त्याचा वापर करावा. विनाकारण वापर करू नका. त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.औषधाचे प्रमाण जर चुकले तर उपाय होण्याऐवजी अपाय होऊ शकतो. 
           आयुर्वेद शास्त्रात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बाकी बऱ्याच वनस्पती आहेत ज्याचा वापर तुम्ही रोज काढा करून पिण्यासाठी करू शकता. गुळवेल, तुळस, अश्वगंधा, शतावरी, हळद इ. अशा वनस्पती वापरून तुम्ही त्याचे काढे केले आणि ते रोज पिण्यासाठी वापरले तरी चालते. या वनस्पतींचे काढे तुम्ही बारा महिने जरी पिण्यासाठी वापरले तरी त्याचा त्रास होणार नाही. फक्त त्यातील औषधाचे प्रमाण हे अल्प असावे. जेणेकरून हळूहळू आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढेल. एक लक्षात ठेवा काढा पिण्यास सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी पासून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढली असं समजू नये. तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही तसे हे काढे आपण रोज घेत राहिल्यानंतर हळूहळू आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि याचा परिणाम आपल्याला सहा महिन्यानंतर दिसेल. आपल्याला कळेल हवामानात बदल झाला तरी आपल्याला फारसा त्रास होत नाही किंवा पूर्वी बारीक-सारीक गोष्टीनी आपल्याला होणारा आजार हा आता होत नाही. वर दिलेल्या वनस्पती आपण रोगप्रतिबंधक म्हणून वापरू शकतो. अजूनही जर कोणी आयुष ने सांगितलेला काढा रोज घेत असेल तर त्यांनी तो त्वरित थांबवावा...
          डॉ प्रकाश पवार (आयुर्वेद तज्ञ)
                          सातारा.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...