*सुख माझ्या नजरेतून*

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं*? *ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

*भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं*,*सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं*,
*नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं*,

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं* ?*ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

*साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं*,*हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं*,
*डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं*,

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं* ?*ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

*एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं*,*वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं*,
*टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं*,

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं* ?*ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

*एखाद्या चिमणीला जवळून बघणं*,*हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं*,
*एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं*

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं* ?*ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

*खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं*,*रातराणीचा सुगंध उरात साठवणं*,
*पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं*,

*सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं* ?*ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....*

No comments:
Post a Comment