Sunday, December 11, 2022

 🌺

*आयुष्यात कितीही चांगलं काम केलं,*
*तरी कौतुक मात्र स्मशानातच होतं.*
*माणसाची किंमत ही त्याच्याकडे असलेल्या मनाच्या श्रीमंतीवर नव्हे,*
*तर आर्थिक श्रीमंती वर ठरते.*
*माणसे मन नव्हे तर चेहरा पाहून प्रेम करतात.*
*शंभर चांगली कामे कोणी लक्षात ठेवत नाही,*
*परंतु एक झालेली चूक,*
*लोक कायम लक्षात ठेवतात.*
*लोकांना समोर गोड,*
*आणि मनात कपट ठेवणारे लोक,*
*जास्त जवळचे वाटतात.*
*सगळ्यांना पैसा कमवायचा आहे,*
*पण काम मात्र कोणालाच करायचं नाहीये.*
*आपण एखाद्याची जेवढी जास्त काळजी घेऊ,*
*एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू,*
*स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊ,*
*तेवढच आपण त्याच्या मनात स्वतःची किंमत कमी करून घेतो.*
*कारण...*
*लोकांना असं सतत वाटत राहतं की,*
*आपण कसही वागलो तरी,*
*ती व्यक्ती आपल्याला सोडून जाणार नाही.*
*फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते.*
*आपण आयुष्यात कितीही पैसा कमावला,*
*तरी सोबत काहीही घेऊन जात नाही.*
*चांगला माणूस होता,*
*हे फक्त मेल्यानंतर ऐकायला मिळतं.*
*कितीही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागलं,*
*तरी लोक नावेच ठेवतात.*
*एखादी चांगली बातमी कोणीही सांगणार नाही,*
*पण वाईट बातमी न सांगता,*
*सगळीकडे पसरते.*
*मनापासून आनंदी राहण्यापेक्षा,*
*दुसऱ्यांना दाखवण्यासाठी,*
*लोक जास्त आनंदी राहतात.*
*लोक दानधर्म प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात.*
*मुलांना प्रेयसी पाहिजे असते,*
*पण बायकोचा आधी कोणी प्रियकर असेल,*
*तर मात्र चालत नाही.*
*मुली स्वतःचं शिक्षण,*
*करियर काही नसेल,*
*तरीपण मुलगा सरकारी नोकरी वालाच पाहिजे असतो.*
*सहज मिळालेली गोष्ट फार काळ टिकत नाही,*
*आणि फार काळ टिकणारी गोष्ट,*
*ही सहजासहजी मिळत नाही.*
*गरीब माणूस जमिनीवर बसला,*
*तर तिच त्याची लायकी आहे,*
*आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला,*
*तर तो त्याचा मोठेपणा असतो,*
*असं लोकांना वाटतं.*
*चैनीच्या वस्तू शिवाय आपण जगू शकतो,*
*तरीही त्या वस्तू निर्माण करणारे अरबपती आहेत,*
*आणि ज्या अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही,*
*तो शेतकरी मात्र गरीब...*
*एकदा हातातून निसटून गेलेली वेळ,*
*आणि तोंडातून गेलेला शब्द,*
*काही केल्या परत येत नाही...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*Detach अलिप्त,*
*अलिप्त होणे, Disconnect with somebody...*
*धक्का बसला ना मित्रांनो,*
*पण खरं आहे.*
*पटणार नाही काहींना,*
*आयुष्यात वेळ आली की,*
*Detach होणंच योग्य.*
*असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी.*
*अलिप्त म्हणजे separation नाही,*
*aloof नाही,*
*कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेणे,*
*ज्या गोष्टी जशा आहेत,*
*त्याचा स्वीकार करणे,*
*खोटी आशा बाळगू नये.*
*एक लक्षात असावे,*
*माणसाचा स्वभाव बदलत नाही,*
*स्वभावाला औषध नाही,*
*खरं आहे...*
*त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा,*
*ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये.*
*Detach...*
*मुलगा/मुलगी परदेशी आहेत हो..*
*त्यांची सारखी भेट होणार नाही,*
*प्रत्यक्ष होणं शक्य नाही,*
*हे मनाला सांगणे अलिप्त...*
*आपली स्थावार जंगम Property,*
*खूप कष्टाने उभी केलेली, मान्य...*
*पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही,*
*आसक्ती नाही,*
*त्यावर शांतपणे विचार करून,*
*निर्णय घेणे, Disconnect.*
*आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात,*
*कधी Marketing tricks मुळे,*
*तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह,*
*खरं सांगा अशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात,*
*खरं आहे ना...*
*आपण वापरत नाही पण जपून ठेवतो,*
*May be emotional attachment...*
*भांडी असंख्य, Dinner sets,*
*काचेचे वेगवेगळे glasses,*
*Mugs,अगणित वाट्या,*
*पेले इत्यादी...*
*कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला ना !*
*आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन...*
*काय करायचं अशा वेळी,*
*Detach होणंच महत्वाचं...*
*हे झालं निर्जिव वस्तूंबद्दल,*
*आता सजीव माणसं चेक करू या...*
*काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे,*
*स्वाभाविक होतं,*
*कारण...*
*व्यक्ती वेगळ्या होत्या,*
*सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशासारखं होतं,*
*आज परिस्थिती बदलली आहे,*
*मित्रांनो, विचार share होत नाही,*
*कोणी सल्ला मागत नाही,*
*काही न पटणाऱ्या गोष्टी,*
*विचारता येत नाही...*
*Detach...*
*रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो,*
*दुःखाला delete करायला यायला पाहिजे,*
*खूप कठीण आहे मान्य,*
*मग पूढे नाही जाऊ शकत.*
*अशा वेळी कृष्णाचे चिंतन करावे.*
*त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही.*
*कधी वाटलं नसेल का कृष्णाला की,*
*देवकीला घट्ट मिठी मारावी,*
*आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे.*
*कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या,*
*मनसोक्त बासरीच्या मंद आवाजात सगळं विसरून जावं.*
*मान्य आहे...*
*कृष्ण परम परमेश्वर होता.*
*आपण कृष्ण होऊ शकत नाही अशक्य.*
*आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल,*
*तर कृष्ण आठवा...*
*तो स्फूर्ती देईल.*
*मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात,*
*काय गैर आहे,*
*काही नाही,*
*ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील,*
*तर तक्रारीला जागा नसावी.*
*पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही.*
*निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते,*
*मान्य...*
*पण जबरदस्ती नको.*
*लागू द्या एखादी ठेच...*
*शिकेल मुलगा/मुलगी.*
*लहानपणी आई म्हणायची,*
*तुला कळणार नाही आता,*
*एकदा बाप झालास की कळेल.*
*इतक्या साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान,*
*आईच सांगू शकते...*
*अलिप्त होण्यात सुख आहे,*
*पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशासारखं मन स्वच्छ होईल.*
*मित्रांनो...*
*वाईट भावना, वाईट विचार, कोलमडून जातील,*
*आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल.*
*मनात प्रेम,सहानुभूती नक्कीच राहील,*
*पण गुंतणे नाही.*
*जिथे व्यक्ती गुंतते,तिथे राग,लोभ येणार.*
*हे मळभ दूर झाले की,*
*सर्व छान,स्वच्छ,निर्मळ.*
*बघा प्रयत्न करून,*
*जमलं तर ठीकच...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 

*प्रत्येक मनुष्याला,*
*मनापासून असे वाटत असते की,*
*भगवंताने आपले सर्व संकल्प,*
*व मनोरथ पूर्ण करावेत.*
*श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा,*
*देवाजवळ मागणे मागतात,*
*की,जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात,*
*वास्तविक,आपण देवाजवळ लडिवाळपणे मागायचे,*
*व देवाने आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या,*
*अशी व्यवस्था निसर्गाने-ईश्वराने,*
*आपल्या जीवनातच करून ठेवली आहे.*
*निसर्गाने अशी सुरेख व्यवस्था करून सुद्धा,*
*आज आपली अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे,*
*याचे एकमेव कारण हे की,*
*माणसाला निसर्गाने आपल्यासाठी,*
*अशी व्यवस्था करून ठेवली आहे,*
*याची मुळीसुद्धा जाणीव नाही.*
*कल्पतरुच्या झाडाखाली बसले असता,*
*आपण जे मागावे ते तत्काळ प्राप्त होते,*
*असे पुराणांत उल्लेख सापडतात.*
*पुराणातील वांगी पुराणातच!*
*त्याचा आपल्याला उपयोग काय.?*
*असे वाटण्याचा संभव आहे.*
*परंतु हा कल्पतरू पुराणातले वांगं नसून,*
*आपले जीवन चांग व सांग करणारा प्रत्यक्ष शंकरू आहे.*
*हा शिव-शंकर आपल्या हृदयात वास करतो,*
*व आपण जे काही मागतो,*
*त्या सर्व मागण्यांना तथास्तु म्हणतो.*
*प्रत्यक्ष शंकराने तथास्तु असा आशीर्वाद दिल्यावर,*
*आपल्या मागण्या फलद्रूप झाल्याशिवाय कशा राहतील.?*
*परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे,*
*ती अशी की,*
*आपले मागणे योग्य की अयोग्य,*
*चांगले की वाईट,*
*बरे की बुरे,*
*कल्याणाचे की अकल्याणाचे,*
*याचा शंकर 'विचार' करत नाही.*
*तथास्तु म्हणायचे...*
*व आपल्या कामना पूर्ण करायच्या इतकेच हा शंकर जाणतो.*
*चांगल्या-वाईटाचा किंवा,*
*हित-अहिताचा जो काही विचार करायचा,*
*तो आपण;*
*शंकराने नाही...*
*निसर्गाची-ईश्वराची वरील व्यवस्था,*
*न समजल्यामुळे आपल्या सारखी सामान्य माणसे,*
*शंकराजवळ जे मागावे,*
*ते मागत नाहीत व जे मागू नये ते नेमके मागतात.*
*याचा परिणाम असा होतो की,*
*आपल्या वाट्याला जीवनात,*
*दुःखाचा सुकाळ...*
*व सुखाचा दुष्काळ...*
*अनुभवास येतो.*
*पुराणातील भस्मासुराची कथा सुप्रसिद्ध आहे.*
*भस्मासुराने वर मागितला की,*
*ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन,*
*तो भस्म व्हावा...*
*व त्यास शंकराने त्याच्या भोळ्या स्वभावाप्रमाणे,*
*तथास्तु म्हटले...*
*शेवटी भस्मासुराने स्वत:च्याच मस्तकावर हात ठेवला,*
*व तो भस्म झाला.*
*पुराणातील ही भस्मासुराची कथा म्हणजे प्रत्यक्षात सामान्य माणसाची व्यथा आहे.*
*कळत नकळत आपण देवाजवळ नको ते मागतो,*
*व हा शंकर तथास्तु म्हणतो.*
*परिणामी आपल्या जीवनात,*
*वादळ व गोंधळ निर्माण होऊन,*
*प्रत्यक्षात सुखाचे सोने प्राप्त होण्याऐवजी,*
*जीवनात दुःखाची माती मात्र पदरात पडते.*
*या बाबतीत निसर्गाचा किंवा ईश्वराचा,*
*एक नियम लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.*
*हा नियम असा की,*
*आपण जे करतो ते देवाजवळ मागतो,*
*कारण...*
*करणे' हे एक प्रकारचे मागणेच आहे.हे 'करणे' दोन प्रकारचे आहे.*
*एक मनाने करणे व दुसरे देहाने करणे.*
*यापैकी मनाने करणे,*
*या गोष्टीला अधिक महत्त्व आहे.*
*कारण...*
*देहामार्फत जे केले जाते,*
*ते प्रत्यक्षात मनच करीत असते.*
*ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे,*
*मनाचे जीवनातील असाधारण महत्त्व ध्यानात येईल.*
*आपले जीवन हे नाटक,संगीत,जुगार किंवा खेळ नसून युद्ध आहे.* 

 *रात्रं दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग ।* 
 *अंतर्बाह्य जग आणि मन ।।* 

*या शब्दात तुकाराम महाराजांनी सुद्धा,*
*जीवन हे युद्ध आहे,*
*असेच उपदेशिले आहे.*
*ज्याच्या हातात मन,*
*तो जीवन युद्ध जिंकणार हे निश्चित.*
*असे हे मन अत्यंत विचित्र,*
*व विलक्षण आहे याची जाणीव,*
*आपल्या सारख्या सामान्य माणसाला नसते.*
*हे मन प्रत्यक्षात तीन प्रकारे नांदते.*
*या मनाच्या एका प्रकाराला बहिर्मन म्हणतात,*
*दुसऱ्या प्रकाराला अंतर्मन म्हणतात,*
*तिसऱ्या प्रकाराला दिव्य मन असे म्हणतात.*
*Conscious mind,Sub-Conscious mind and Divine Consciousness.*
*असेही म्हणतात.*
*यांना जीव,शिव व देव असेही स्थूलमानाने संबोधण्यास हरकत नाही.*
*सध्या आपल्याला पहिल्या दोन तत्त्वांशी कर्तव्य आहे,*
*ती म्हणजे बहिर्मन व अंतर्मन,*
*ही दोन मने वास्तविक दोन नसून,*
*एकाच मनाचे दोन भाग आहेत.*
*परंतु त्या दोघांची कार्य करण्याची पद्धत,*
*व कार्यक्षेत्र भिन्न आहेत,*
*व त्यामुळेच हे एक मन नसून,*
*दोन भिन्न मने आहेत,*
*असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होते.*
*बहिर्मन अत्यंत छोटे आहे,*
*तर अंतर्मन खूपच मोठे आहे.*
*बहिर्मन स्थूल आहे,*
*तर अंतर्मन अतिसूक्ष्म आहे.*
*बहिर्मन प्रचितीला येते,*
*तर अंतर्मनाचा थांगपत्ताही,*
*सामान्य माणसाला लागत नाही...!!* 

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...