एक सद्गुरू गावोगाव फिरत असत.त्यांची प्रवचनं फार लोकप्रिय होती. प्रवचनाच्या शेवटी ते नेहमी विचारत, देवाची थेट भेट व्हावी, त्या परमपित्यामध्ये विलीन होऊन मोक्षप्राप्ती करावी, असं कोणाकोणाला वाटतं?
सगळे हात वर व्हायचे.
मग ते म्हणायचे, मी निघालोय त्या परमेश्वराच्या भेटीला. प्रवास कसा होणार, मार्ग कसा आहे, किती वेळ लागणार, यातलं काहीही मला माहिती नाही. पण, मी निघालोय, हे खरं. आता सांगा, कोण कोण येतंय माझ्या मागे?
सगळे हात खाली व्हायचे. माना खाली झुकायच्या. आपल्या प्रापंचिक मोहांचा तात्काळ त्याग करून परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी अनिश्चित प्रवासाला निघायची हिंमत सगळ्यांमध्ये नसते.
महाराज हसायचे. शिधा गोळा करायचे. पुढे निघायचे. पुढेही तोच खेळ व्हायचा. त्यापुढेही तेच.
एका प्रवचनात मात्र पहिल्या प्रश्नाला वर झालेला एक हात खाली झालाच नाही.
त्यांच्यामागोमाग परमेश्वरापर्यंत यायला एक माणूस तयार होता. महाराजांना आश्चर्य वाटलं. प्रवचनाचे बाकीचे श्रोते फिदीफिदी हसत होते. ज्याने हात वर ठेवला होता, तो वेडा माणूस म्हणूनच त्यांना ठाऊक होता. महाराजांनी त्याला आपल्यामागे येण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले. पण, तो बधला नाही. तुम्ही कितीही खडतर मार्गावरून न्या, कितीही काळ लागूदेत, काहीही संकटं येऊदेत, प्राण गेला तरी बेहत्तर, पण, मी परमेश्वराला भेटल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांना सांगून तो त्यांच्यामागे निघाला.
महाराजांची त्याने अक्षरश: सावलीसारखी पाठराखण केली. आधी गुरूंना हा साथीदार बरा वाटला. सोबतही होती, सेवाही करत होता. पण, सतत बरोबर असायचा. त्याला चुकवून काहीही करता येत नव्हतं. शिवाय त्याच्यामुळे महाराजांवर दबाव यायला लागला. हा इतक्या श्रद्धेने मागे चालतोय, तर आपली वाट परमेश्वराकडे जाणारी असायला हवी, तेवढी आपली तयारी असायला हवी. त्यांनी तर संसारी माणसांना आपल्यासोबत येताच येणार नाही, या गृहितकावर परमेश्वराच्या वाटेचा सिद्धांत रचला होता. प्रत्यक्षात तेही आपल्या ओळखीच्या परिसरातच फिरत होते. शेवटी त्यांनाच हे ओझं वाहणं जड झालं.
त्या वेड्या माणसाला समोर बसवून ते म्हणाले, हे पाहा. मी लोकांना परमेश्वराच्या वाटेवर नेतो आहे, ही माझ्या धंद्याची ट्रिक आहे. असं सांगितलं कोणीही आपल्यामागे येत नाही, असा माझा आजवरचा अनुभव होता. तू मात्र खमक्या निघालास. माझ्यामागे जिद्दीने अनेक वर्षं चालतो आहेस. मी तुला फसवू शकत नाही. मला परमेश्वराकडे नेणारी वाट वगैरे काही माहिती नाही. तुझा रस्ता तू चालावास.
तो वेडा म्हणाला, मी माझी वाटच चालत होतो महाराज. योगायोगाने तुम्ही पुढे होतात एवढंच. ते काही फार महत्त्वाचं नव्हतं. मी तुमच्यामागे चालत नव्हतो, तुम्ही माझ्यापुढे चालत होतात, इतकंच. त्यामुळे तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका.
शरमेने झुकलेली मान महाराजांनी वर केली, तेव्हा वेडा पुढे निघून गेला होता आणि त्याच्यामागे चालत जाण्याचं धाडस आपण एकवटायला हवं होतं, ही खंत त्यांना आयुष्यभर राहिली.

===================================================

सुख 


एका स्त्रीची एक सवय होती ती रोज झोपण्याअगोदर आपला दिवभराचा आनंद एका वहीत लिहीत असे. एका रात्री तिने लिहिले....
मी फार सुखी समाधानी आहे.
माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो. ही ईश्वराची कृपा आहे, कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते.
मी फार सुखी समाधानी आहे, माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असते. ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे.
दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे
रोज मला घरातील केर कचरा काढून घर स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही त्याचे काय हाल होत असतील?
मी फार सुखी समाधानी आहे.
कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे
प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्या जवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत - माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेट देऊ शकते. जर हे लोक नसते तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.
मी फार सुखी समाधानी आहे
रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.
जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्यावा, आनंद शोधावा. अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.
ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे की आपण आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात, आपल्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.
*सुख शोधून सापडत नसते त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते*..
======================================================
प्रेरक कथा ....Arun pagar.










सत्याच्या मार्गाचे अनुसरण करा
एकदा एका गावात एक संत आले. त्यांच्या चांगल्या शिकवणीचा परिणाम असा झाला की हळूहळू त्यांच्या अनुयायांची संख्या वाढू लागली.
यामुळे त्याच शहरातील एका जुन्या धर्मोपदेशकाना त्रास सुरु झाला, त्यांना असे वाटू लागले की जर हे संत या शहरात आणखी काही काळ राहिले तर त्याच्याकडे कोणीही सत्संगासाठी येणार नाही. त्यांना नव्याने आलेल्या संतांचा हेवा वाटू लागला आणि त्यांनी त्यांच्या बद्दल खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली.
एके दिवशी हि चुकीची माहिती नव्याने आलेल्या संतांच्या एका जवळच्या शिष्याच्या कानावर पडली. शिष्याने लगेच आपल्या गुरूंना याची माहिती दिली. तो असेही म्हणाला की “महाराज, शहरातील जुने धर्मोपदेशक तुमच्याबद्दल उघडपणे चुकीचे बोलत आहेत. तुम्ही त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर दिले पाहिजे”
हे ऐकून संत हसले आणि म्हणाले, "जे माझ्याबद्दल असे बोलत आहेत त्यांच्याशी मी वाईट किंवा वाईट का बोलावे? माझा निषेध माझ्या विरोधातील अपप्रचार थांबवेल का? "
नंतर त्यांनी शिष्याला एक कथा सांगितली
एकदा एक हत्ती शहरातून चालत जात होता. कुत्रे त्याच्यामागे धावू लागले आणि भुंकू लागले. बराच वेळ ते कुत्रे हत्तीच्या मागावर राहिले पण अखेरीस थकले आणि परतले. जर हत्ती त्यांच्यावर रागावला असता किंवा ओरडला असता तर काही फायदा झाला असता का? असे केले असते तर तो देखील कुत्र्याप्रमाणेच आपली रिकामी एनर्जी घालवीत बसला आसता असे झाले असते.. म्हणून माझ्याबद्दल कोणीही वाईट बोललेलं ऐकून अस्वस्थ होऊन मी माझ्या एकाग्र मनाची आस्वस्थता का वाढवुन घ्यायची , तो त्याच्या कर्माचे फळ नक्कीच भोगेल त्या साठी मला काही करायची गरज नानाही आपण आपले कार्य करत रहा आणि सत्याच्या मार्गावर चालत रहा. "
हा उपदेश ऐकल्यावर शिष्याचा राग शांत झाला आणि त्याला जीवनाचा एक नवीन धडा शिकायला मीळाला.










*
_मैत्री_
*
_मैत्री_
**_______________*
*मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका !*
*कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला !*
*मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत*
*नाहीत
*
* *"मित्र" नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा,*
*कारण..*
*जीवनांतील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो
*
**कोणीतरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा..*
*त्यांना सांगितले,*
*मित्र हे फक्त मित्र असतात..*
*त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते. ते "थेट" मित्र असतात
*
**“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”
*
**प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही.*
*काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात
*
**माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात "सावली म्हातारपणात "शरीर"*
*आणि..*
*आयुष्याच्या शेवटच्या काळात "पैसा" कधीच साथ देत नाहीत साथ*
*देतात ती फक्त आपण जोडलेले "जवळचे मित्र"
*
**म्हातारपण केव्हा
*

**मित्र बोलवित आहे, पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात. म्हातारपण येवू न देणे आपल्या हातात आहे.*
*मित्रांसोबत रहा* *व आनंदात*
*जीवन जगा*



जय गजानन माऊली

No comments:
Post a Comment