Friday, December 16, 2022

 *🥇🏘️ प्रत्येक कुटुंबात आपली माणसे सुरक्षित ठेवण्यासाठी ""कडी"" ही असाविच लागते, नाहीतर काहीही घडु शकते...🥇🏘️👊🙏*


*घराची ही साधी कडी. पण काम चोख करते. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे. याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोंड्याच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही.*
 
*आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला ""मै हुॅ ना""! असं बेलाषक सांगते.*
 
*कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. पण कडी असेल तर निर्धास्त झोप लागते. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.*
 
*मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.* 

*मन जर कायम असं सताड उघडं असेल तर कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात जीवनात डोकावता येणार नाही.*
 
*बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. इतरही ठरावीक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.*

*बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो,पच्छाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरुन जातो.* 

*नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत.. घरात.. समाजात.. भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.* 

*कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं... दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं.हे कितपत योग्य आहे.* 

*आगरकर आणि टिळक यांनी एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण... काय उपयोग. मित्र कायमचा गेला.*

*आपणही जरुर कड्या लावा.पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी कडी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. पण योग्य ठिकाणी,योग्य वेळी कडी लावाल तर जीवन हलके कराल. फक्त मनाला कडी लावायची,कुठे आणि कधी यावर जरुर विचार करावा.*

*सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...