Saturday, December 10, 2022

--तीर्थक्षेत्र देहू--

 ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

                   *🔸तीर्थक्षेत्र देहू🔸*

*🔹१९/०६/२०२२- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान- देहू...🙏*

*श्री तीर्थक्षेत्र देहू (dehu) हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे.*

*ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले, तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. आज या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे.*

*ज्या इंद्रायणी डोहात तुकारामांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले, तो डोहही इंद्रायणीकाठीच नजिक आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते.*

*देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर आदि स्थाने दर्शनीय आहेत. तुकारामबीजेला म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आलं आहे, संत तुकारामांचे अभंग संगमरवरी दगडावर कोरवून मंदिराला आतून सजवण्यात आलं आहे.*

*स्रोत: संतसाहित्य, आंतरजाल.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...