*चॉईस तुमचा आहे ।*
पुरणाचे दिंड कि गाढवावरून धिंड
*चॉईस तुमचा आहे ।*
दिवे उजळायचे कि दिवे पाजळायचे
*चॉईस तुमचा आहे ।*
प्रकाशात न्हायचं कि गटारात लोळायचं
*चॉईस तुमचा आहे ।*
दीपज्योती नमोस्तुते कि चिअर्सची गीते
*चॉईस तुमचा आहे ।*
संस्कारांचं दिवाळं कि मदिरापानाचं सोहळं
*चॉईस तुमचा आहे ।*
धुऊन-पुसून दिव्यांचे पूजन,
की पिऊन आतड्यांची साफ-सफाई.
*चॉईस तुमचा आहे ।*
दिव्यांची आरास कि बाटली आणि गिलास
*चॉईस तुमचा आहे ।*
अंधाराला जिंकायचं कि टाईट्ट होऊन झिंगायचं
*चॉईस तुमचा आहे ।*
या लिखाणाला डिलीट मारायचं कि पुढं धाडायचं
*चॉईस तुमचा आहे*

दीप (दिवे धुण्याची) अमावस्येला
*गटारी अमावस्या* असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करू नये.
कारण त्यावरून आपले खानदानी संस्कार आणी संस्कृती समजते ...








*दीपज्योतिर्नमोस्तुते*







आषाढी अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या.चातुर्मास्याचा आरंभ देवशयनी एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशी पासून सुरू होतो.सर्व विश्वाचा पसारा सांभाळणाऱ्या भगवान विष्णूच्या विश्रांतिसमयाचा काल.जेव्हा भगवंतांची कार्तिकी एकादशीपर्यंत निद्रासमाधी लागते तेव्हा चार महिने हा विश्वाचा भार वाहण्यासाठी सर्व देवतांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदुधर्मात तर सर्व मानव चार महिने अगदी नियमबद्ध होऊन व्रतवैकल्ये, उपवास, पूजा अर्चा अगदी श्रद्धापूर्वक अंत:करणाने करतात.गुरुपूजनापा सून पूजनास प्रारंभ होतो.
त्यानंतर अमावास्येला दीपपूजन करण्यात येते.
धर्मशास्त्रात , तसेच हिंदूधर्मात दीपपूजनाचे अधिक महत्त्व सांगितले आहे.अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दिवा लावण्याची प्रथा आजही हिंदू धर्मात प्रचलित आहे.ही दीपज्योति म्हणजे आकाशस्थ सूर्यनारायणांचे छोटेसे रूप म्हणावयास हरकत नाही.
तिन्हीसांजेला लक्ष्मी घरात प्रवेश करत असताना देवाजवळ दिवा लावून प्रार्थना केली जाते ______
*शुभंकरोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।*
*शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते।*
म्हणजे ही दिव्याची ज्योत शुभ करणारी, कल्याणकारी, आरोग्यदायी, धनसंपत्ती देणारी,शत्रुबुद्धीचा नाश करणारी आहे.
तसेच दररोज देवपूजासमयी दीपपूजन करत असताना मंत्र म्हणून दिव्याची स्थापना करण्यात येते.तो मंत्र
*भो दीपब्रम्हरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय:।*
*आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे॥*
म्हणजे आपण ज्या दिव्याची पूजा करतो ती कोणत्या धातूची पूजा न करता आपण आरोग्यप्राप्तीसाठी,पुत्रपौत्रां च्या दीर्घायुष्यासाठी दिव्याच्या रूपाने साक्षात् ब्रम्हाची पूजा करतो.
*आज्यं सुवर्तिसंयुक्तं वन्हिना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह।
भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयात् घोरात् दीपज्योतिर्नमोस्तु ते॥*
गाईचे तूप ,वात ,अग्नीने प्रज्वलित केलेला दिवा हे भगवंता मी तुला देत आहे.तू त्याचा स्वीकार करून या त्रैलोक्यातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा कर.आणि घोर नरकापासून आमचे रक्षण कर.अशा उदात्त भावनेने आपण दीपपूजन करत असतो.
पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातून मातीचे दिवे करून त्याचे पूजन करण्याची प्रथा होती.
आजही आपल्याला काही प्रमाणात खेड्यापाड्यातून हे दीपपूजन आजच्या अमावास्येला केलेले दिसून येते.
त्याचप्रमाणे हिंदुधर्मात दीपदानाचेही महत्त्व सांगितले आहे.
*आजचे दीपपूजन म्हणजे भगवान विष्णूंना दीपदान करणेच आहे.
*दीपस्तमो नाशयति दीप:कान्तिं प्रयच्छति।तस्माद्दीपप्रदानेन प्रीयतां मे जनार्दन:॥*
भगवान् विष्णु झोपले असले तरी त्यांना अशापद्धतीने दीपदान करून प्रार्थना करतात की हे देव सूर्याने पाठवलेला हा दिवारूपी दूत अन्धाराचा नाश करतो.कान्ति देतो .असा परम तेजस्वी व माङ्गल्याचे प्रतिक असणाऱा दीप मी आपल्याला दान देत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा.व समस्त प्राणिमात्रांवर आपली कृपादृष्टी निरंतर राहू द्यावी.
अशाप्रकारे घराघरातून प्रदीप्त होणारे ब्रम्ह म्हणजेच साक्षात् नारायण स्वरूप आहे.
*अविद्यातमसा व्याप्ते संसारे पापनाशन:।ज्ञानप्रदो मोक्षदश्च तस्माद्दत्तो मयानघ॥*
अशाप्रकारे पापरहित नारायणस्वरूप ज्योतिर्मय दीवा अविद्यामय अंधाराने भरलेल्या संसारात ज्ञान व मोक्ष देणारा आहे.
काही धर्मांध लोकांनीं हिंदू सणांचा प्रत्येकवेळेस गैर अर्थ काढला आहे.त्याचे फळही ते तसेच भोगतीलही.पण जे सश्रद्ध आहेत त्यांना मात्र नक्कीच याचा चांगला लाभ होतो,व होणारही.
श्रद्धायुक्त अंत:करणाने आपण नित्य अशाच प्रकारे *ज्योतिने 
तेजाची आरती* करून

तेजाची आरती* करूनआपल्या घरातील, देशातील सुख,शांती, समृद्धी,धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी ,संतानलक्ष्मी , आरोग्यलक्ष्मी नित्य वृद्धिंगत होवो अशी प्रार्थना करू.










No comments:
Post a Comment