लग्न समारंभाचा उच्चांक गाठणारा, “हळदी” मुळे गाजलेला, गर्दीमुळे स्मरणात राहणारा "मे" महिना संपला व पाऊस देणारा जून महिना सुरू होतो. 7 जूनला "मृग" नक्षत्राचा प्रारंभ होतो. शेतकरी पावसाची अपेक्षा करीत पेरणी करतो व नांगरणीसाठी सज्ज होतो. पावसाची रिपरिप, सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमाट सहन करण्याची क्षमता तयार होते. पेरणी, लावणी व नांगरणीची आणि लावणीची कामे सुरळीत होण्यासाठी तो "आगोठी" ची कामे उरकण्यात तो दंग होतो. यंत्र युगाचा प्रभाव वाढल्यामुळे माणूस काहीसा आळसावला आहे. शेतकऱ्याची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत आहे. पारतंत्र्य काळात विकासाचा सूर्य खेडोपाडी उगवलेला नव्हता. गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट हीच "वहिवाट" होती. शेतकऱ्यांच्या साथीला फक्त बैलगाडी होती. पाऊस पडला की गावाकडे तसेच भातशेतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद होत. पर्यायाने बैलगाडी बंद होत असे. म्हणून बैलगाडीच्या सहाय्याने होणारी कामे पावसाची सर पडण्यापूर्वी उरकली जात. सर्वत्र अठराविश्व दारिद्रय असल्यामुळे कच्ची घरे होती. मातीची घरे पेंढ्याने अगर गवताने शाकारली जात. पेंढारू घरे ऊन, वारा व पावसामुळे काळीकुट्ट होत. म्हणून ती दरवर्षी शाकारावी लागत. "केंबळी" (ऊन व पाऊस खाल्ल्यामुळे काळाकुट्ट झालेला पेंढा) राबासाठी उपयुक्त ठरतो. पूर्वी राब शेणाने तयार करून ते केंबळी अगर पाला - पाचोळ्याने भाजत असत. अशा राबात केलेल्या पेरणीत 21 दिवसांच्या कालावधी नंतर रोपे लावणीयोग्य होतात. तर अति मेहनतीने तयार केलेली रोपे १८ दिवसांत लावणीयोग्य होतात. अलिकडे राब शेणाऐवजी (शॉर्ट कट) कृत्रिम खताच्या सहाय्याने तयार करतात. पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस अखंडित पडत असे. म्हणून काही शेतकरी 20-20 खंडीच्या शेतीची लावणी वट पौर्णिमेला पूर्ण करीत असत. या हंगामात गावात दिवसा माणसे दिसत नसत. बाजारपेठा ओस पडत. एस.टी. मध्ये प्रवासी कमी होत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढलेली असे.
Pages
- Home
- प्रबोधन
- आपला भारत
- महत्वाच्या लिंक / वेबसाईट
- कायद्याची ओळख
- शैक्षणिक /करिअर मार्गदर्शन
- महिला वर्ग / ज्येष्ठ नागरिक विशेष
- महापुरुषांची ओळख
- शासन निर्णय /शासकीय योजना
- विविध संस्था माहिती
- ताज्या बातम्या व घडामोडी
- सोशल मिडिया
- ई -साहित्य -अंगण : PDF पुस्तके व अन्य माहिती
- जनरल नॉलेज
- फोटो गॅलरी
- अध्यात्मिक
- आयुर्वेद / आरोग्य विशेष
- संगीत विभाग
- अनमोल सुविचार
- खाद्य भ्रमंती
- बोधकथा
- कोरोना विशेष
- प्रेरणादायी
Saturday, December 24, 2022
“आगोठ”-- बळीराजाच्या जीवनातील अविभाज्य घटक
पूर्वी दळणवळणाची साधने पुरेशी नव्हती. बैलगाडी हेच शेतकऱ्याचे वाहन होते. सर्वत्र कच्चे रस्ते होते. पावसाची पहिली सर येताच हे रस्ते बंद होत. म्हणून घराला लागणाऱ्या वस्तू - किराणा माल, कापड - चोपड, घोंगड्या, गुरांचे खाद्य इ. पाऊस पडण्यापूर्वी बैलगाडीने बाजारातून आणीत. पूर्वी मिक्सर, ग्राइंडर, रोटीमेकर, कटर, वा़ॕशिंग मशीन अजिबात नव्हत्या. घरटीने भात भराडले जाई. पाखडून तूस व भात वेगळे केले जात असे. जात्याने तांदूळ दळून भाकरीसाठी पीठ काढले जाई. घराघरात उखळ - मुसळ, जाते - घरटे कुऱ्हाड, विळा, कोयता , खरळ यांना मानाचे स्थान होते. घरटी तसेच जाते - वरवंट्यास वापरल्यामुळे (घर्षण झाल्यामुळे) "टाकी" देत असत. आता यंत्र युग सुरु झाल्यामुळे "टाकी" देऊन उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरापासून दूर असलेल्या विहिरीतून पोहऱ्याच्या सहाय्याने पाणी काढून ते हंड्यात भरत. हे हंडे डोक्यावरून वाहून आणत असत. पाणी भरण्याचे काम महिला सूर्योदयापूर्वी करीत.त्यानंतर दिवसभराची कामे त्या उरकीत असत. अवयवांची भरपूर हालचाल व प्रदूषण विरहित वातावरण असल्यामुळे महिला आजाराला सहसा बळी पडत नसत. गरोदर महिला दैनंदिन कामे करता करता खाजगी सुईणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूत होत. आजच्यासारखी "सिझरिंग" ची पद्धती नव्हती.
"इरले" व "घोंगडी" झाले इतिहासजमा "आगोठ" हा शेतकऱ्यांचा कसोटीचा काळ असतो. शेताच्या बांधबंदिस्तीची कामे "वेळीच" उरकावी लागतात. घराची शाकारणी, गुरांच्या वाड्याची डागडुजी करावी लागते. जळणासाठी लाकूड फाटा आणून तो वाळवून त्याची साठवणूक करावी लागत असे. कारण सुकी फाटी असतील तरच पावसाळी चूल पेटते. व हंगामात वेळीच जेवण होते. गुरांसाठी -विशेषत; नांगरणी करणाऱ्या गुरांसाठी - पेंढा खरेदी करावा लागतो त्याची गोठ्यात साठवणूक केली जाते. घराची व वाड्याची दुरुस्ती होते. वेळ प्रसंगी छप्पर बदलावे लागते. भात बियाण्याची विशेष काळजी घेतो. बैललगाडी सतत वापरात असल्यामुळे बैल मांडवात (घराजवळ) बांधलेले असतात. पूर्वी रेडे राना - वनात सोडलेले असत. पेरणीपूर्वी त्यांना शोधून आणत. नांगरणी करणे हे अति कष्टाचे व त्रासाचे काम असते. म्हणून नांगरण्यास अति महत्त्व असते. तो आधीच "बुक" करावा लागतो. शिवाय त्यास "ॲडव्हान्स" द्यावा लागतो. पूर्वी ट्रॅक्टर व पॉवर टिलर नव्हते. म्हणून "नांगर" वादातीत होता. नांगर तयार करण्यासाठी इसाड, लुमणी, जोकड, शिवला, पालवा, या वस्तू विशिष्ट आकाराच्या असाव्या. त्या रानावनात जाऊन शोधाव्या लागत. त्यानंतर सुतार त्या लाकडाची साफसफाई करून "नांगर" तयार करतो. नांगराचा फाळ साधारणतः जमिनीत 6 ते 8 इंच खोल जावा लागतो. शिवाय बैलाच्या उंचीनुसार नांगर तयार करावा लागतो. बैलाचा व रेड्याचा नांगर यांच्या जोडणीतही फरक असतो. नांगरणी करताना दगडधोंडे व झाडाची मुळे आड आल्यामुळे नांगर मोडतो, नांगरणीत अडथळा येऊ नये म्हणून नांगर त्वरित दुरुस्त करावा लागतो. पूर्वी रस्ते नव्हते. चिखल व दगड- धोंड्यातून वाट तयार करावी लागे. नांगर खांद्यावर टाकून बैल सोबत घेऊन नांगऱ्या अनवाणी शेतापर्यंत जात. पडत्या पावसात, थंडीवाऱ्यात नांगरणी करावी लागते, वेळप्रसंगी पडत्या पावसात बांधावर जेवण उरकावे लागते. नांगऱ्यास घोंगडीचा आधार असतो, प्लॅस्टिक कापड, खोल, रेनकोट पूर्वी नव्हते, नांगऱ्यासाठी घोंगडी खरेदी केल्यानंतर तिचा खडबडीतपणा जाण्यासाठी ती "मळावी" लागते. शिवाय "रोठ" घालावी लागते. तरच ती वापरण्यायोग्य होते व दीर्घ काळ टिकते. घोंगडीमुळे नांगऱ्याचे दोनही हात मोकळे असतात. एका हाताने नांगर व दुसऱ्या हाताने पालवा धरु शकतो. घोंगडीमुळे मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऊन, थंडी यांपासून संरक्षण होते. घोंगडीला "ऊब" असते. डोक्यावर ती व्यवस्थित बसण्यासाठी विशिष्ट तऱ्हेने "बुचडी" बांधावी लागते. तिच्या निऱ्या दोन इंच रुंदीच्या असतात. बुचडी घट्ट बांधण्यासाठी वळीव सुतळ वापरतात. दिवसभर चिखलात व पावसात असणारी घोंगडी कडकडीत वाळण्यासाठी रात्री चुलीवर (पूर्वी गॅस सिलेंडर नव्हते) टांगलेल्या विशिष्ट आकाराच्या लाकडी बेचकीवर टाकीत असत. चूल पेटताच ती कडकडीत वाळत असे. नांगऱ्याचे काम अतिकष्टाचे असते. म्हणून त्यास सकाळी न्याहरी, दुपारी जेवण व रात्री "पोस्त" व जेवण द्यावे लागते. "फाळधुणी" च्या दिवशी तो "पाहुणा"च असतो, आता "घोंगडी" लुप्त झाली आहे.
इरले - पावसाळा, लावणी व इरले हे समीकरण ठरलेले होते, लावणी करताना, गुरे राखताना, घराबाहेर पडताना "इरले" हवेच. इरले डोक्यावर घेतल्यामुळे दोनही हात काम करण्यास मोकळे असतात. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच ऊन यापासून संक्षण होते. येथे छत्री निरुपयोगी ठरते. ती वाऱ्यामुळे उडून जाते. बांबूच्या चिरीव कांबींपासून विशिष्ट आकाराचे "इरले" बनवितात. त्यासाठी साधारणतः ओला बांबू वापरतात. इरल्याच्या आच्छादनासठी पळसाच्या पानांचा वापर करतात. पानांना अपेक्षित आकार येण्यासाठी ती खडखडीत वाळवून पाण्यात बुडवून मऊ करतात. इरल्यावर रचलेली पाने सरकू नयेत म्हणून ती ओल्या काथ्याने अगर झाडाच्या सालीने घट्ट बांधतात. इरल्याच्या प्रत्येक आऱ्यामध्ये ४ इंचांचे अंतर असावे. पावसाळ्यात इरले सर्व ठिकाणी वापरत. आता ही जागा छत्री, रेनकोट, खोल इ. नी घेतली आहे. इरले झटकन वाळत असल्यामुळे घोंगडीप्रमाणे वाळविण्याची गरज पडत नाही. इरले दृष्टीस पडताच पावसाळी वातावरण निर्मिती होत असे. अस्तास गेलेले "इरले" व "घोंगडी" चे तंत्र नवीन पिढीने आत्मसात करावे, हे आवाहन!
-श्री.बळवंत वालेकर
संपादक, साप्ताहिक कुलाबा वैभव तथा ज्येष्ठ पत्रकार, अलिबाग
संपर्क क्रमांक- 9921074140
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
१. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...
-
प्रत्येक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ठरलेला असतो, तसंच त्या प्रवासातले टप्पे किंवा थांबेही ठरलेले असतात. काही वेळा ते अगदी हक्काचे असतात, तर ...
-
*आता पर्यंत आपण धारा 370 बद्दल माहिती घेत होतो चला आता कलम 340 बद्दल माहिती जाणून घेऊ* —— कलम ३४० —— (ओ.बी.सी. च्या सत्यानाशाचे का...
-
काश्मीरच्या पूर्वेकडील हिमालयाचा भाग, आसाम, बंगाल, ब्रह्मदेश व पश्चिम हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप या प्रदेशांत हें झाड दृष्टीस पडतें. याचीं फळ...
No comments:
Post a Comment