Saturday, December 10, 2022

 🌺 

*जीवनाचे वस्त्र...*
*नुसत्या सुखाने किंवा नुसत्या दु:खाने विणले जात नाही,*
*तर ते सुखदु:खाच्या आडव्या,*
*आणि उभ्या धाग्यांनी विणल्या जाते.*
*ह्या वस्त्राला जर भक्तिची कांती लाभली,*
*तर जीवनात मन:शांतीची प्राप्ती होते.*
*आपल्या मधील विश्वास,*
*पर्वतालाही हलवु शकतो,*
*परंतु...*
*आपल्यामधील शंका,*
*आपल्यासमोर पर्वत ऊभा करते.*
*परमार्थाला दान हे जरुर आहे.*
*पण दान किती करावं ?*
*आपल्या प्रपंचाचा बिघाड न करता,*
*व अगदी सहज जे देता येईल,*
*तेवढंच योग्य ठिकाणी दान म्हणून द्यावं.*
*ते दिल्यावर त्याचं स्मरण उरता कामा नये.*
*असं दान नियमितपणे करीत गेल्याने,*
*वृत्ती आपोआप उदार बनते,*
*आणि दानाची कक्षा वाढत जाते !!*

                  🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*हल्ली लोकांचे हित करण्यासाठी,*
*जो तो झटत असतो,*
*पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय्,*
*दुसऱ्याचे हित आपण काय साधणार.?*
*ज्याला स्वतःला सुधारता येत नाही,*
*तो दुसऱ्याला काय सुधारणार.?*
*त्यालासुद्धा अभिमानच आड येतो,*
*कारण...*
*त्याला वाटते,*
*आपण दुसऱ्याचे हित करून देऊ.*
*या अभिमानाने तो फुगलेला असतो.*
*अहंकार जाण्यासाठी,*
*साधनच करावे लागते,*
*आणि ते साधन गुरू सांगत असतात.*
*म्हणून,त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले,*
*म्हणजे आपले हित होते.*
*ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही.*
*ते आपल्या जवळच असते;*
*पण ते दुसऱ्याने आपल्याला दाखवावे लागते.*
*हेच काम सद्‌गुरू करीत असतात.*
*मातीने घडवलेल्या भांड्यांची,*
*आणी काटकसर करून,*
*घडवलेल्या परिवाराची किंमत,*
*त्यालाच कळते,*
*ज्याने आयुष्याची,*
*सर्कस करून ते घडवलेलं असते!!*

                🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*अन्नदानाने हात पवित्र होतात.*
*तिर्थयात्रेने पाय पवित्र होतात.*
*नामस्मरणाने तोंड पवित्र होते,*
*आणि...*
*शरणागतीने चित्त पवित्र होते.*
*मग भगवंताला कृपा केल्यावाचून,*
*राहवतच नाही...*
*जसा गुळ्याच्या खड्याला जश्या,*
*मुंग्या गूळ संपेपर्यंत डसून असतात,*
*तसेच आपले जीवन आहे.*
*चांगुल मित्रपरिवार...*
*हा पण असाच असतो.*
*एकदा का आपली आवश्यकता संपली,*
*की सर्वजण अनायसे दूर होऊन जातात.*
*आयुष्याचा खरा आनंद...*
*भावनेच्या ओलाव्यात असतो.*
*कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही.*
*ते आपोआप जोडलं जातं.*
*खरी आपुलकी, माया,*
*ही फार दुर्मिळ असते.*
*हे दान ज्याला लाभतं,*
*त्यालाच त्यातला...*
*खरा आनंद मिळवता येतो...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...