Sunday, December 11, 2022

*🙆‍♂️ ह्याला आयुष्य म्हणावं काय ? 🤷‍♂️*


 *पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी*
  *लोळण घेतात पायात,*
   *तरीही बिल गेटची पत्नी*
   *घटस्फोट घेते ह्या वयात?*

*शिक्षणाने माणूस समृध्द होतो,*
*आम्ही आहोत अजूनही* *भ्रमात,*
*उच्चविद्याविभूषकांचे मायबाप,*
*मग का असतात* *वृध्दाश्रमात?*

               *हा डिप्रेशनचा शिकार,*
               *तो आत्महत्या करतो.*
           *ज्याला समजावं सेलिब्रिटी,* 
            *तोच एकाकीपणात मरतो!*

*ज्यांनी कमावलं नाव,*
*त्याला आनंद का मिळत* *नाही?*
*काय चाटायचं ह्या* *मोठेपणाला,*
*नातं आपुलकीचं जुळत नाही!*

        *जळजळीत वास्तव सांगतो,*
       *तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही,*
      *गरीब,अडाणी,प्रामाणिक जनांचे,*
      *मायबाप वृध्दाश्रमात* *दिसत नाहीत.*

        *आजारी मायबापांचा ईलाज,* 
          *करतात किडूक मिडूक विकून,*
          *पण जिव्हाळ्याची नाती*
          *ठेवली आहेत टिकवून.*

*व्यसनी,रागीट,नवरा,*
*त्याला गरीबीची जोड.*
*तरीही त्याची पत्नी बिच्चारी*
*करतेच ना तडजोड?*

        *दु:ख हलकं करतात*
       *एकमेकांना भेटून,*
      *एका शिळ्या भाकरीचा तुकडा*
      *खातात सारेजण वाटून!*

*जेवढी लावतात माया,*
*तेवढंच बोलतात फाडफाड.*
*कितींदा तरी भांडतात,*
*पण कुठे येतो ईगो आड?*

*ना तोल ढळतो,ना संयम,*
*दु:खातही सावरण्याची आस*
*कारण,अजूनही ह्या* *माणसांचा,*
*आहे माणूसकीवर विश्वास!*

  *एकत्रीत कुटूंब हल्ली*
*सांगा कुणाला हवं?*
*कामा शिवाय वाटतं का*
*आपण कुणाच्या घरी जावं?* 

                *एकदा तरी बघा जरा*
           *आपल्या आयुष्याचा रोड मॅप,*
             *कुणाचं कुणाशी पटत नाही*
             *काय तर म्हणे जनरेशन गॅप.*

*सांगा बरं कुणावर ह्या*
*विकृत विचारांचा पगडा नाही?*
*घर,बंगला,फ्लॅट असु द्या*
*दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही!*

               *बहूत अच्छे,बहूत खुब !*
           *क्या बात है?बहूत बढीया !*
       *एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया* 
       *जागृत चोवीस तास सोशल मिडीया!*

*आभासी दुनियेची चाले*
*कोरडी कोरडी ख्याली खुशाली,*
*मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा*
*मोबाईलवरच श्रध्दांजली!*

              *काय बरोबर? काय चूक?*
           *मत मांडण्याचीही सत्ता नाही*
    *तो बंद घरात मरून पडला वास सुटला*
*तरी शेजाऱ्याला पत्ता नाही*

           *लेकराला पाॅकेटमनी, बाईक*,
           *अन् भलेही दिली जरी कार*,
             *किती छान झालं असतं*
             *जर दिले असते संस्कार?*

*होस्टेल,बोर्डींगात बालपणीच पाठवलं* 
*तो तुम्हाला का वागवणार?*
*जमीन असो, जीवन*
*येथे जे पेरलं तेच ऊगवणार!*

                  *जीवशास्र शिकवलं,*
                 *जीवनशास्त्र शिकवा*...
                  *चुलीत गेली चित्रकला*,
                  *सांगा चारित्र्याला टिकवा*...

*त्रिकोण,चौकोन,षट्कोन*
*ह्याला सांगा विचारेल कोण?*
*ज्याचे जवळ नसेल*
*आयुष्याचा दृष्टीकोन!*

         *विपरीत परिस्थीतीतही*
       *जपणूक केली पाहीजे तत्वाची*...
       *व्याकरणापेक्षाही अंत:करणाची*
        *भाषा असते महत्वाची*...

*चुकू द्या चुकलं तर*...
    *अंकगणित अन् बीजगणित*...
       *माणसांची बेरीज करा*....
         *गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित!*

                *प्राणपणाने जतन करावे*
             *नाते शहर, खेडे,गावाचे*
            *मेल्यावरती खांदा द्यायला*
         *असावे चारचौघे जिवाभावाचे!*

*मेल्यावर दोन अश्रू* 
*हीच आयुष्याची कमाई*
*ज्याने हे कमावलं नाही*
*तो आयुष्य जगलाच नाही!*

                   *मिळून मिसळून वागावं*
                *आनंदानं छान जगावं*
            *तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं*
         *म्या पामरानं काय सांगावं ?*
*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा.*
*आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे.*
*मी निमित्त मात्र आहे.*
*इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस.*
   *राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती,समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे.*
  *चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा* *अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*                 
*🙏🏻💐श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻*


 *खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

*आपण आपली..*
*भोळीभाबडी भक्तीच करावी.*
*देवाला अनन्य शरण जाऊन,*
*त्याचे नामस्मरण करीत जावे,*
*म्हणजे सर्व काही मिळते.*
*जो जेवायला बसतो,*
*तो ’माझे पोट भरावे’,*
*असे कधी शब्दांनी म्हणतो का.?*
*पण जेवण झाले की, आपोआपच पोट भरते !*
*आपण ग्रंथामध्ये जे वाचतो,*
*ते जर आचरणामध्ये आणले नाही,*
*तर त्या वाचनाचा उपयोग काय.?*
*म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये,*
*कारण...*
*त्याने खरे साधन बाजूलाच राहते,*
*आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो.*
*म्हणून थोडेच वाचावे,*
*आणि त्याचे मनन करावे.*
*माणूस घर सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो.*
*आणि त्या घरात तो उदास बसतो.*
*या उलट त्याने लाखोंचं इंटेरिअर मनाच्या कप्प्यात करायला हवं.*
*त्याला हवा तितका आनंद,*
*हवी तितकं शांती...*
*आणि समाधान बसवावं.*
*एक आठवणींचा कोपरा सजवावा,*
*दुःखाचा लवलेश त्यात नसावा.*
*स्वप्न ती नसतात,*
*जी झोपल्यावर पडतात.*
*स्वप्न ती असतात,*
*जी आपल्याला झोपू देत नाहीत.*
*भगवंताने जगनिर्मिती लीलेने केली.*
*आणि प्रपंच हा त्याच लीलेचा,*
*मायेचा एक भाग आहे.*
*आपण प्रपंच हौसेने केला.*
*आणि या हौशीपायी,*
*भगवंत मात्र पलीकडे राहिला...!!*

                  🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...