Sunday, December 11, 2022

--आपलं माणूस--


*★ भरले डोळे पुसण्यासाठी, आपलं माणूस लागतं.*
*★ आनंदाचा उत्सव करण्यासाठी, आपलं माणूस लागतं.*
*★ कौतुकाने पाठ थोपटायला, आपलं माणूस लागतं.*
*★ पाठीवर रट्टा द्यायलाही, आपलंच माणूस लागतं.*
*★ अशी आपली माणसं, सहजासहजी मिळत नाही.*
*★ काळजात प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा, माया असली की,या आपलं माणूस भेटतं.*
*★ ऑनलाईनच्या जमान्यात, सगळं काही घरपोच मिळतं.*
*★ भाजीपाला, किराणा, जेवण काही क्लिकवर घरी येतं.*
*★ एक गोष्ट मात्र कधीही, ऑनलाईन मिळत नाही.*
*★ मन मोकळे करायला आपलं माणूस, कधी घरपोच येत नाही.*
*★ म्हणूनच पैशांबरोबर, आपली माणसं पण, जोडायला शिका.*
*★ इगो,मतभेद,राग,द्वेष,मत्सर सोडून, नात्यांचे अतूट बंध विणायला शिका.*
*★ नातं टिकवायला कधीतरी, कमीपणा हा घ्यावाच लागतो.*
*★ नात्यांच्या श्रीमंतीनेच, माणूस खरा श्रीमंत होतो.*
*★ आपली माणसं जोडणं, खरंच इतकं काही अवघड नाही.*
*★ थोडासा दुसऱ्याचा विचार केला, तर नातं कधीही तुटत नाही.*
*★ सहजच केलेला फोन, खरंच खूप आनंद देऊन जातो.*
*★ धावती जरी भेट दिली तरी, आपला माणूस सुखावतो.*
*★ एकटं एकटं जगण्यात, खरं सांगा बरं काय मजा आहे.?*
*★ आपलं माणूस सोबत नसेल, तर जीवन जगणं सजा आहे.*
*★ आपलं माणूस सोबत असलं की, नैराश्य दूर पळतं.*
*★ आपल्या माणसांमुळेच, आपलं आयुष्य सुंदर बनतं...!*
                             
          🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...