Thursday, December 22, 2022

करोना बद्दल उपयुक्त सटिक माहिती

जेष्ठ वैद्य सुचित्रा जी कुलकर्णी यांची करोना बद्दल उपयुक्त सटिक माहिती आवश्य वाचा ।। 

'करोना' बद्दल थोडेसं. (खास लोकाग्रहास्तव)

खरं तर या विषयावर आजपर्यंत इतक्या जणांनी इतकं लिहिलं आहे, की मी नव्यानं काही लिहायला शिल्लक नाही. परंतु तरी खूप जणांना 'आपल्या माणसाचा' शब्द जास्त महत्त्वाचा आणि आश्वासक वाटतो. त्यांच्या विनंतीवरुन त्यांच्यासाठी हा लेखन प्रपंच!
जगभरात थैमान घातल्याचं दारुण चित्र उभं केल्यानं, करोना बद्दल लोकांना भीतीनं ग्रासलं आहे.

#करोना_गैरसमज 
१) करोना चे रुग्ण जगभर असले तरी जगाच्या लोकसंख्येच्या मानानं त्यांची संख्या इतकी कमी आहे की त्याला 'साथ' म्हणता येणार नाही.
२)या आजाराचा मृत्युदर देखील अल्प आहे. त्यापेक्षा आजही आपल्याकडे मलेरिया किंवा TB चे रुग्ण, कितीतरी जास्त संख्येने आहेत आणि त्यांचा मृत्युदर देखील जास्त आहे.
३) हा विषाणू श्वसन संस्थेवर हल्ला करणारा असल्यानं ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी अधिक सतर्क असावं हे उत्तम.

वसंत ऋतू आणि कफाचे आजार.
आपल्या देशात आता वसंताच्या आगमनाची चाहूल लागली आहे. या काळात वातावरणातील उष्णता वाढल्यानं शरीरातील कफ पातळ होऊन त्याचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच दरवर्षी या काळात #सर्दी #ताप #खोकला या लक्षणांचे रुग्ण भरपूर प्रमाणात आढळतात. त्या सगळ्यांना करोनाची लागण झालेली नसते.
वसंत ऋतूतील कफाचे आजार टाळण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांकडे जावून #वमन करवून घेणं हा सर्वात उत्तम उपाय आहे.

#Virus_structure
सर्वात आधी - virus म्हणजे नक्की काय आणि तो शरीरात काय उलथापालथ करतो हे थोडक्यात जाणून घेऊ या. कोणत्याही virus ला शरीर नसतं. 'प्रोटीनचं आवरण असलेला RNA' असं त्याचं स्वरूप असतं. कोणत्याही प्राण्याच्या शरीराबाहेर या virus ला काहीच अस्तित्त्व नसतं. एकदा का जीवाच्या शरीरात प्रवेश केला की हा पेशीत जाऊन स्वतःला duplicate करत जातो. जिहादी पद्धतीनं तो आपली संख्या वाढवतो आणि संख्या बेसुमार झाली की पेशी फोडून, मारून बाहेर पडतो. पुन्हा शेजारच्या पेशीवर आक्रमण करायला मोकळा. दरम्यानच्या काळात जर याचं बाहेरील प्रोटीनचं आवरण, त्या जीवाला नष्ट करता आलं तर मात्र याची duplicate होण्याची क्षमता संपून जाते. 

#प्रतिबंधात्मक_उपाय 
हा आजार संसर्गातून पसरत असल्यानं संसर्ग टाळण्याचे उपाय महत्त्वाचे ठरतात.
#प्रसंगात्_गात्रसंस्पर्शात्_निःश्वासात्_सहभोजनात्|_सहशय्यासनाच्चापि_वस्त्रमाल्यानुलेपनात्|
शरीर संपर्क (अलिंगन/ चुंबन/ हस्तांदोलन इ. कोणत्याही प्रकारे), श्वासाचा संपर्क, एकत्र भोजन (एकमेकांचं उष्टं अन्न खाणं), एकमेकांची वस्त्रं-दागिने-चपला-अंथरूण-पांघरूण- मेकअपचं सामान- वापरल्यानं संसर्गजन्य रोग पसरतात असं आयुर्वेदात सांगितलं आहे. ते टाळायला हवं. बाहेरून घरी गेल्यावर स्नान करून कपडे बदलायला हवे.
पूर्वी आमच्याकडे जेवतानाचं वस्त्र वेगळं असायचं. त्याला बुरसटलेपणा ठरवून ती पद्धत आपण बंद केली.. करोनानं आता पुन्हा त्याची आठवण करून दिली आहे.
प्रत्येक वेळी खाताना हात धुवायला हवे. मात्र यात सॅनिटायझरची आवश्यकता नाही. सॅनिटायझरनं virus मरत नाही. उगाच प्रदूषण वाढवायची आवश्यकता नाही. पाण्यानं तो धुतला जाऊन निघून जातो. तितकं पुरेसं आहे. 
करोना हे हवेतून पसरणारे virus नसल्याने mask ची आवश्यकता नाही.

#प्रोटीन्सचं_आवरण_नष्ट_करण्याचे_उपाय 
आपली उत्तम पचनशक्ती हीच virusवरील प्रोटीन्स चं आवरण नष्ट करू शकते. त्यासाठी 
१) नियमित व्यायाम 
२) घरचा, ताजा आणि गरम आहार 
३) अल्प आहार 
४) आठवड्यातून एकदा उपवास 
५) प्यायला गरम पाणी 
६) आलं, लसूण, सुंठ, मिरी, हळद, दालचिनी, लवंग या मसाल्याच्या पदार्थांचा आहारात समावेश...  
इतकं पुरेसं आहे.

#भय_इथले_संपत_नाही
भय हे त्या आजाराला शरीरात अनुकूल वातावरण निर्माण करत असते. त्यामुळे सगळ्यात आधी त्याला हाकलून लावायला हवे.

#मोदी_सरकार या विषयावर पुरेसं सतर्क असून त्यांनी उत्तम उपाय केले आहेत. 

आपण फक्त 
१)स्वच्छता पाळा
२) गरम अन्न खा 
३)व्यायाम करा 
४) घाबरू नका 
५) #आयुर्वेद_अंगीकारा

वैद्य सुचित्रा कुलकर्णी 
M.D. (आयुर्वेद), B.A. (योगशास्त्र)

करोना चित्र सौजन्य- नेट
[3/17/2020, 10:59 PM] +91 91586 70262: *TATA हॉस्पिटल मुंबई*

चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी . 
1. कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो , त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही

2. विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही

3.कपड्यांवर पडलेला विषाणू 9 तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो

4. हातावर पडलेला विषाणू 10 मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे

5. थंड अन्न आणि icecream खाणे टाळा

6. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफुसात संसर्ग होत नाही.

7. 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही

8. गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका.

9. भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा

10. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करावा.

11. वाचून शेअर करा म्हणजे इतर मित्रांना व नातेवाईकांना सावध करा म्हणजे निदान त्यांच्या मार्फत कोरोना तुमच्या पर्यंत पोहोचणार नाही .

                                             " आपल्या सेवेत
                                         Tata हॉस्पिटल मुंबई

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...