*नवलेखक अनुदान योजनेचा लाभ घ्या...*
*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची योजना*
*अर्ज करायचा अखेरचा दिनांक - २८ फेब्रुवारी २०२०*
सर्वांच्या माहितीसाठी विश्व मराठी परिषदेकडून महत्वपूर्ण संदेश... आपण वाचा आणि शेअर करा...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन २०२० या वर्षासाठी ज्याचे *आजमितीपर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही* अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
नवलेखकांना,
(१) *कविता* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - ८० कविता)
(२) *कथा* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त ४५००० शब्द)
(३) *नाटक/ एकांकिका* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त २८००० शब्द)
(४) *कादंबरी* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठ - जास्तीतजास्त ४५००० शब्द)
(५) *बालवाड्.मय* (६४ ते ९६ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त २८००० शब्द)
(६) *वैचारिक लेख/ ललित लेख/ चरित्र/आत्मकथा/प्रवास वर्णन* (१२८ ते १४४ टाईप केलेली पृष्ठे - जास्तीतजास्त ४५००० शब्द)
या सहा वाङ्मय प्रकारातील पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकूराला अनुदान देण्यात येईल. _(वर उल्लेखिलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे तसेच कमाल पृष्ठसंख्येपेक्षा जास्त पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही)_
नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरूपात (टाईप केलेल्या) पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे.
नवलेखकांनी त्यांचे साहित्य दिनांक *२७ जानेवारी, २०२० ते २८ फेब्रुवारी, २०२०* या कालावधीत पुढील पत्त्यावर पाठवावे.
*
पत्ता:*
पत्ता:*सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०००२५. दूरध्वनी :- ०२२ २४३२५९३१
या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील शासनाच्या *www.maharashtra.gov.in* या संकेतस्थळावर 'नविनतम संदेश' या अंतर्गत नवलेखक अनुदान योजना २०२० माहितीपत्रक व अर्ज या शीर्षकाखाली तसेच What's New या अंतर्गत Navlekhaka Grant Scheme Rules Book and Application Form या शिर्षकाखाली तसेच मंडळाच्या *https://sahitya.marathi.gov. in* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संदेश सौजन्य:*विश्व मराठी परिषद*
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयी अत्यंत उपयुक्त माहिती देणारे, सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि विदेशातील मराठी बांधवांचे आणि युवकांचे आत्मीय व्यासपीठ...!
कृपया संकेतस्थळाला भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
विश्व मराठी परिषदच्या व्हॉट्सअप लिस्ट मध्ये सहभागी व्हा आणि भाषा, साहित्य, संस्कृती विषयक उपयुक्त माहितीचे अपडेटस मिळवत रहा. त्यासाठी *७०६६२५१२६२* हा क्रमांक *विश्व मराठी परिषद* या नावाने सेव्ह करून त्यावर आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरुन *Join Vishwa Marathi Parishad* असा संदेश पाठवा.
फेसबुक पेज लाईक करा :
No comments:
Post a Comment