Saturday, December 10, 2022

 *क्रोधाचा परिवार...!!!*

क्रोधाचा म्हणजेच रागाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार आहे.
🔸रागाची एक लाडकी बहिण आहे "हट्ट", ही सदैव रागा बरोबर असते.
🔸रागाची पत्नी आहे " हिंसा ", हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते.
🔸रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे " अहंकार ",
🔸रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव " भय " (भिती), 
आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत " निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते.
🔸"वैर "हा रागाचा मुलगा आहे.
🔸"इर्षा" ही या परिवाराची सुन आहे.
🔸या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव " घृणा ", ही नेहमी नाका जवळच असते, 
नाक मुरडने एवढेच हिचे काम.
🔸"उपेक्षा" ही रागाची आई आहे.
असा हा "रागा" चा छोटासा परिवार !!! आहे छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य आहे त्यात !!
त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे या परिवारा पासून दूर रहा, तरचं तुमच्या घरी सर्व मंगल मांगल्य, समाधान, सुख-सम्पत्ती व मुख्य म्हणजे शांती राहील .....!!
धन्यवाद….
💐💐 💐💐.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...