Saturday, December 10, 2022

रायगड जिल्हयाविषयी

 रायगड जिल्हयाविषयी काही महत्वाच्या आणि वैशिष्टयपुर्ण गोष्टी – 

लोकसंख्या 26,35,200

क्षेत्रफळ 7,152 वर्ग कि.मी.

साक्षरतेचे प्रमाण 89%

एकुण तालुके 14

राष्ट्रीय महामार्ग क्र 4 आणि क्र. 17 या जिल्हयातुन गेले आहेत

रायगड जिल्हा सायन पनवेल एक्सप्रेस वे ने जोडला गेला आहे

रायगड जिल्हयाला 240 कि.मी. लांबीचा विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभला आहे

या जिल्हयात प्राचीन ऐतिहासीक वास्तु, पर्यटकांना आकर्षीत करणारे समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, पश्चिम घाटात असलेली आकर्षक अप्रतिम ठिकाणे आपल्याला पहायला मिळतात.

घारापुरी येथील ऐतिहासीक एलिफंटा गुहा त्याकाळातील वैभवसंपन्न संस्कृतिच्या साक्षीदार म्हणुन आजही आपल्याला खुणावतात

रायगड जिल्हयात वेगवेगळया काळातील भव्य आणि चिरेबंदी किल्ले आजही आपले अस्तित्व टिकवुन आहेत… रायगड किल्ला, मुरूड.जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला सुधागड किल्ला आजदेखील आपल्याला कुतुहलात टाकतात

या जिल्हयातील आज अस्तित्वात असलेल्या वेगवेगळया सांस्कृतिक परंपरा, भाषा, धर्म त्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हयाची आपली अशी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे रायगड जिल्हयात असलेले महाराष्ट्रामधले एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ!

किना.यालगत घारापुरी, कुलाबा, जंजिरा, खांदेरी.उंदेरी, कासा, करंजा अशी बरीच लहान मोठी बेटे आहेत.

रायगड जिल्हयात पुर्वी काही ठिकाणी बेनेइस्त्रायली ज्यु लोकांनी निवास केला होता.

आगरी जातीचा समाज या जिल्हयात मोठया प्रमाणात वास्तव्याला आहे.

भात हे रायगड जिल्हयातील मुख्य पिक आहे लागवडीखाली असलेल्या एकंदर क्षेत्रापैकी बहुतांश म्हणजे 70 टक्के क्षेत्रात भात पिकाची लागवड होते त्याखालोखाल काही भागात नाचणी आणि वरीचे पीक घेतात, म्हसळे, मुरूड, श्रीवर्धन, अलिबाग या भागात नारळाचे उत्पादन मोठया प्रमाणात घेण्यात येते, रायगड येथील डोंगर उतारावर लाल मातीत आंब्याची लागवड केली जाते, कोकम (रातांबी) ची झाडं देखील येथे लावुन त्यांचे उत्पन्न घेतले जाते.

जिल्हयाला विस्तिर्ण समुद्रकिनारा लाभल्याने साहजिक मत्स्यव्यवसाय हा येथील मुख्य व्यवसाय आहे

रेणव्या, पेडवे, पापलेट, सुरमई, बांगडा, कर्ली, रावस, हाईद, सरंगा, या प्रकारचे मासे येथील समुद्रात मोठया प्रमाणात सापडतात.

प्रगत तंत्रज्ञान आणि यांत्रिक नौकांमुळे मत्स्यव्यवसाय पुर्वीपेक्षा सोपा आणि सुलभ झाला आहे

रायगड जिल्हयात औद्योगिक वसाहत मोठया प्रमाणात निर्माण झाली असुन औद्योगिकदृष्टया हा जिल्हा विकसीत होत आहे.

रोहे, पनवेल, कर्जत, पेण, सुधागड या तालुक्यांमधे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश वनांनी व्यापलेले आहे.

या वनांमधे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असुन येथे वाघ, सांबर, कोल्हे, रानडुक्कर यांसारखे प्राणी आढळतात.

आंबा, चिंच, ऐन, खैर, साग, सारखे वृक्ष या वनांमधे आढळुन येतात.

खोपोली येथील विद्युत केंद्र महाराष्ट्र राज्यातील पहिले जलविद्युत निर्मीतीकेंद्र म्हणुन ओळख मिळवुन आहे.

अष्टविनायकांपैकी दोन गणपतीची मंदिर (ठिकाणं) या जिल्हयात आहेत. 1) पाली येथील बल्लाळेश्वर 2) खोपोली जवळ महड येथील वरदविनायक
  🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जिजाऊ, जय शिवराय, जय धर्म वीर संभाजीराजे 
जय महाराष्ट्र       
🚩🚩🚩🚩🚩🚩👏🏻👏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...