Sunday, December 11, 2022

 🌺 

*एक विकत घ्या...*
*त्यावर एक फुकट घ्या.*
*विचार केला तर...*
*ही एक व्यापारी व्यवस्था वाटते,*
*पण वास्तवात ती आपल्या जीवनाशी निगडित व्यवस्था आहे.*
*जर आपण राग विकत घेतला,*
*तर आपल्याला एसिडिटी बद्धकोष्ठता फुकट मिळते.*
*जर आपण ईर्ष्या विकत घेतली,*
*तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते.*
*जर आपण द्वेष विकत घेतला,*
*तर आपल्याला अल्सर पोटदुखी फुकट मिळते.*
*जर आपण ताणतणाव* *विकत घेतला,*
*तर आपल्याला रक्तदाब BP फुकट मिळतो.*
*अशाप्रकारे आपण वार्तालाप,*
*बोलाचाली करून विश्वास* *विकत घेतला,*
*तर आपल्याला मैत्री दोस्ती फुकट मिळते.*
*जर आपण व्यायाम कसरत विकत घेतला,*
*तर आपल्याला निरोगी आयुष्य फुकट मिळते.*
*जर आपण शांती विकत घेतली,*
*तर आपल्याला समृद्धी फुकट मिळते.*
*जर आपण ईमानदारी प्रामाणिकपणा विकत घेतला,*
*तर आपल्याला झोप फुकट मिळते.*
*जर आपण प्रेमभाव विकत घेतला,*
*तर आपल्यावर सद्गुण सदाचारासह,*
*सद्गुरू कृपा सहज प्राप्त होते.*
*हे सर्व आपल्यावर,*
*अवलंबून आहे की,*
*आपण...*
*काय विकत घेतलं पाहिजे...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*आपल्या आयुष्यात...*
*वेगवेगळ्या प्रकारची दु:खे येतात,*
*क्लेश सहन करावे लागतात.*
*काही वेळा दु:ख वाट्याला येतं,*
*तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही.*
*वाटत, मी कुणाचंच वाईट करत नाही,*
*मग माझ्याच वाट्याला हे का.?*
*पण हे प्रारब्ध भोग असतात,*
*ते भोगूनच संपवावे लागतात.*
*परंतु बरीचशी दु:ख विनाकारण ओढवून घेतली जातात.*
*वाट्याला येणार्या दु:खाचा त्रास,*
*समोरचा सुखात आहे हे पाहून,*
*अधिक बळावतो.*
*आर्थिक संकट,कर्ज, आजारपण,*
*कौटुंबिक कलह,नोकरीत कटकटी,*
*फसवणूक,व्यसनाधीनता,*
*दारिद्र्य अशा गोष्टींना सामोर जावं लागलं की,*
*आपण अस्वस्थ होतो,*
*शांत राहू शकत नाही.*
*आयुष्यात आनंदी आनंद असेल,*
*तर आपली काहीच तक्रार नसते,*
*पण कोणतही दु:खं आलं की,*
*कधी यातून सुटका होते,*
*यासाठी त्या दु:खाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी,*
*इतर उपाय सुरु होतात.*
*कोण सांगेल ते विधी,*
*पूजा, व्रत, बुवाबाबा नवस,*
*पोथ्या यांची पारायण होतात.*
*आपल्या आयुष्यात येणारी सुखदु:ख सुद्धा,*
*अशीच असतात.*
*त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे,*
*हे सर्व असणारच,*
*ते सहन केलच पाहिजे,*
*असा विचार करत माझ्या मुक्कामी,*
*माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे,*
*अशी भावना आपण मनात दृढ करु शकणार नाही का !*
*मुळात ही सुखदु:ख माझी आहेत,*
*ह्या खोट्या भावनेत आपण पुरते गुंतून जातो.*
*पण ही सुखदु:ख केवळ ह्या देहाची आहेत,*
*आणि हा देह म्हणजे मी नाही.*
*त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही.*
*काठावर बसून पाहणार्याला,*
*बुडायची भिती नसते.*
*ह्या आयुष्याकडे आपणही असच काठावरुन पहायला शिकलं पाहिजे.*
*रोजच्या जीवनात अनेक प्रसंग,घटना, क्षण, बरच काही देवून जातात.*
*कधी सुखावणारं कधी दुखावणारं,*
*हवहवस वाटणारं,*
*नकोसं झालेलं,अस बरच काही आपण अनुभवतो.*
*आयुष्याकडे स्वत:ला दूर करुन,*
*पहाण्याच्या खेळात किती मौज वाटेल पहा.*
*कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळणारं आयुष्य,*
*कधी निराशेच्या मिट्ट काळोखाने,*
*काळवंडून जाणारं आयुष्य!*
*ह्या जीवनात शीतल गारवा,*
*बोचरी थंडी, उन्हाचा तप्तपणा,*
*कधी थंडगार जलधारांचा वर्षाव,*
*होतच रहातो.*
*सुखाचा किंवा दु:खाचा वाटणारा,*
*प्रत्येक क्षण सेकंदासेकंदाला,*
*मागे पडत आयुष्य पुढेच सरकत असतं.*
*आपण मात्र त्या क्षणांमधेच कायम अडकून घेतो.*
*आरशात पाहून कसं स्वत:ला ठीकठाक करतो,*
*तसंच आयुष्याकडे समोरुन पहाताना,*
*त्यातील बर्याच गोष्टी आपण सुधारु शकू.*
*जीवन उजळवणं आपल्याच हाती आहे.*
*असा जेव्हा आपण प्रयत्न,*
*अगदी तळमळीने करतो,*
*तेव्हा मार्गातले अडसर दूर होवू लागतात.*
*आयुष्यात नको त्या गोष्टींची,*
*चिंता करायचं सोडून देऊया...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

🌺 
*ज्याप्रमाणे आपण घर रोज झाडतो,*
*भांडी रोज घासतो,*
*स्नान रोज करतो,*
*त्याचप्रमाणे श्रवण ही मनाची अंघोळ आहे.*
*शरीराला जशी अन्नाची गरज आहे,*
*तशी मनाला वाचन, मनन,*
*आणि चिंतन यांची गरज आहे.*
*एखाद्याबद्दल गैरसमज निर्माण होणे,*
*क्रोधाच्या आहारी जाणे,*
*एखाद्याचा द्वेष करणे,*
*मन स्थिर नसणे,*
*ही सारी लक्षणे मानसिक उपासमारीची आहेत.*
*इंद्रियावरती विषयांची पकड,*
*इतकी जबरदस्त आहे की,*
*त्यातून बाहेर पडण्यासाठी,*
*रोज सत्संगाची अथवा श्रवणाची गरज आहे.*
*ज्याठिकाणी अशा सत्संगाची,*
*अथवा श्रवणाची व्यवस्था नसेल,*
*त्या ठिकाणी साधकाने,*
*संत वांग्मयातील किमान,*
*तीन चार पाने रोज शांतपणे वाचावीत.*
*आणि त्यावर मनन चिंतन करावे.*
*हे ही साधकाला जमत नसेल,*
*तर महाराजांनी एकदम साधा,*
*आणि उत्तम उपाय सांगितला आहे,*
*तो म्हणजे, वैखरिने नाम घेणे,*
*आणि ते नाम आपल्याच कानांनी ऐकणे,*
*जे श्रवण भक्तीचे काम करते.*
*हा नेम अखंड पाळला,*
*तर आपल्या मनोवृत्तीत हळूहळू बदल होऊ लागला आहे.*
*हे साधकाच्या ध्यानात येईल.*
*अशा प्रकारे श्रवण...*
*आणि वाचन...*
*यांचे साधकांच्या जीवनात,*
*अनन्य साधारण महत्त्व आहे...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...