*मोबाईल नंबर,*
*Block-unblock का कराता.?*
*थोडासा विचार करा,*
*व त्यांच्याशी संवाद ठेवा.*
*बर वाटेल...*
*मन हलक झाल्याचे वाटेल नक्कीच,*
*सद्या माणसांना एकमेकांचा राग आला,*
*की एकमेकांचे फोन नंबर,*
*ते ब्लॉक करतात...*
*नंबर ब्लॉक होतो...*
*पण प्रेम ब्लॉक होत का.?*
*आठवणी ब्लॉक होतात का.?*
*तर नाही...*
*ज्या आठवणी कायमच्या हृदयात ब्लॉक असतात.*
*त्या अशा नंबर ब्लॉक केल्याने मिटतात का.?*
*हो,फक्त त्या माणसांचा संवाद थांबतो,*
*एकमेकांशी होणारा.*
*पण एकमेकांचे विचार थांबतात का.?*
*विचार ब्लॉक होतात का.?*
*पण संवादाची जागा वादाने घेतली,*
*की नंबर ब्लॉक होतो...*
*पण नंबर ब्लॉक करण्याऐवजी,*
*आपल्यातला अहंकार ब्लॉक झाला,*
*तरच नंबर अनब्लॉक होईल.*
*माणसं अहंकाराचं कवच,*
*इतकं कठीण करून का फिरतात?*
*आपल्याच माणसांसाठी,*
*हे कवच आपण फोडू शकणार नाही का.?*
*अहंकार ब्लॉक केला,*
*तर प्रेम अनब्लॉक होईल.*
*आपल्या प्रियजनांसाठी आपण,*
*एक पाऊल स्वतः आधी उचललं,*
*तर सेल्फ रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो,*
*तो कमी होतो म्हणे...*
*असं मन सांगतं.*
*अहो अहंकारी मन जपण्यात,*
*कसला आलाय रे सेल्फ रिस्पेक्ट.*
*ब्लॉक करण्यासाठी,*
*एकमेकांच्या जवळ,*
*किती वाईट गोष्टी आहेत.?*
*की ती म्हणजे राग,द्वेष, मत्सर,गैरसमज,कटुता,*
*हे सगळं ब्लॉक करूया...*
*नंबर ब्लॉक केल्याने हे सगळे जिंकतील हो!*
*तुम्ही ह्यांना
फक्त दोन दिवस,*
फक्त दोन दिवस,**ब्लॉक करून पहा.*
*मग तुम्हाला कळेल,*
*एखाद्याचा प्रेमरूपी मोबाईल,*
*कितीदा रिंगटोन देऊन गेलाय,*
*तुमच्या मनात.*
*एकदा तुही कॉल करून पहा.*
*एखाद्याचा प्रेमाला...*
*मग मला सांगा...*
*तुमच्या प्रेमाची जी कॉलरट्यून तुम्ही ठेवलीये,*
*ती किती गोड वाजते ते...*
*ती ऐकण्यात मंत्रमुग्ध व्हाल तुम्ही.*
*पण एकदा एखाद्याचं,*
*प्रेम अनब्लॉक करून तर पहा.*
*एकदा तर रिसिव्ह करा.*
*एखाद्याच्या मनाचा कॉल,*
*मग ठरवा हवं तर...*
*त्याच्या तुमच्या मनापासूनच्या भावना,*
*नंतर ठरवा ब्लॉक करायचा की,*
*अनब्लॉक !
*
**आयुष्य खुप सुंदर आहे.*
*तुम्हीही आनंदात जगा.*
*व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या.*
*सर्वानी आनंदात राहा.*
*आपला समाजातील माणसांवर,*
*जिव्हाळा कायम ठेवा...!!*



No comments:
Post a Comment