Saturday, November 12, 2022

गाव विकास चळवळ


मी ज्या गावात जन्म घेतला त्या गावाचे मी ऋण कसे फेडू शकतो
१)जर मी शिक्षक आहे तर आठवड्यातून एक दिवस गावात शिक्षण किती महत्वपूर्ण आहे याचे प्रबोधन करेन
२)जर मी कीर्तनकार,प्रबोधनकार,प्रवक्ता व अन्य कोणत्याही मार्गाने मला जर बोलता येत असेल तर मी अधूनमधून लोकांचे वैचारिक प्रबोधन करेन
३)जर मी सरकारी नोकरी करत असेन मग ती वरिष्ठ अधिकारी पासून थेट शिपाई पदापर्यंत असेल तर त्या पदाच्या आधारे मी समाज बांधवांना जमेल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करेन तसेच आपले काही बांधव सरकारी सेवेत कसे रुजू होतील याचा प्रयत्न करेन
४)जर मी ग्रामपंचायत सदस्य पासून अन्य कोणत्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी असेन तर लोकांच्या समस्या स्थानिक पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत सोडविण्याचा प्रयत्न करेन
५)जर मी आर्थिक दृष्टया सक्षम असेन तर गावातील माझ्या बांधवाना आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा प्रयत्न करेन
६)गावात जर लोक वर्गणी आणि लोक सहभागातून एखादे काम अंग मेहनतीच्याद्वारे करायचे असेल तर त्यामध्ये मी सहभाग नोंदवून मनापासून काम करेन
७)गावाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होईन,त्यामध्ये आर्थिक योगदान देईन तसेच वाट्याला येईल ते काम करेन
८)ज्या कुटुंबात,भावकीत आणि गावात माझा जन्म झाला त्यांच्या सोबत मरेपर्यंत नाळ जोडून जीवन जगेन
९) माझी कोणत्याही कृतीमूळे,बोलीमुळे गावात वादांग होणार नाही किंवा गावाचे विभाजन होणार नाही याची सर्वतोपरी मी काळजी घेईन
१०)वरील सर्व काही करता नाही आले तरी एक मात्र नक्की करेन......तर काय..... 
    गावासाठी न्यायी भूमिकेने जे जे लोक कार्य करत आहेत त्यांना नेहमी पाठिंबा देईन आणि हेही नाही करता आले तर तटस्थ राहीन पण न्यायी कामाला विरोध करण्याची भूमिका मी कधीच घेणार नाही.....✍🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...