*
।।श्री स्वामी समर्थ।।
*
*आयुष्य हे रेल्वेच्या प्रवासा सारखं असतं. रेल्वेत कसे खूप सारे प्रवासी असतात, तसंच आयुष्याचं. आपण आपल्या स्टेशन वरुन रेल्वेत चढतो. कधी सोबत कुणाला घेऊन तर कधी एकटे. पुढे रेल्वे धावायला लागते. रिझर्वेशन केलेली लोक सुखाने एका जागेवर बसून नजारे बघतात. इतरांची मात्र उभे राहण्यासाठीची धडपड. काही वेळाने चार ओळखी होतात. गप्पा रंगतात, सुख-दुःख वाटले जातात. नंतर मात्र आपापलं ठिकाण आलं की, एकेक जण उतरून जातं, रेल्वेतल्या आठवणी सोबत घेऊन. आपल्या सोबत असणारे देखील असेच कुठेतरी उतरतात. आपण मात्र एकटे उरतो. पण शेवटी आपलाही मुक्काम येतोच आणि आपणही इतरांसारखं निघून जातो, सगळं मागे सोडून...! तसंच आयुष्याचं. आयुष्याला सुरुवात होते. पैसा असेल तर सुखाचं जीवन सुरु होत, नाहीतर जगण्यासाठीची धडपड. जिवंत राहण्याचा प्रयत्न. नंतर आयुष्यात नव-नवीन लोक येतात. सुख-दुःख येतात. चढउतार येतात. पण अचानक काही काळाने सोबत असणारे लोक दुरावतात. खुप साऱ्या आठवणी देऊन ते निघून जातात ..! आपण एकटे पडतो. एक-एक जण कसा आपल्याला एकटं करून जाताेय ते बघत...! पण शेवटी आपलीही वेळ संपते आणि आपणही सारं काही मागे सोडतो. केवळ आठवणींच्या बोचक्यानिशी निघतो, एका अज्ञात प्रवासाला...! जग आणि रेल्वे मात्र निरंतर चालूच राहतात .... फक्त नविन प्रवाश्यांसह.....!*







No comments:
Post a Comment