Saturday, November 12, 2022

 *🎤सूत्रसंचालनास उपयुक्त चारोळी- हळदीकुंकु*

~✍🏻©

1)सण संक्रांतीचा झाला साजरा
महिला कशा बघा आनंदल्या
वाण लुटण्या तयार सगळ्या
लगिनघाईने हो प्रत्येक नटल्या...

2)पर्व हळदीकुंकुचे झाले सुरु
रम्य, मंगलमय वातावरणात या
पर्यावरणपुरक वाण वाटुनी
निसर्गाची जपणुक हो करुया...

3)हळदीकुंकु आपली संस्कृती
जतन करण्याचा वसा घेवुया
सुविचारांचे हो वाण लुटुनी
अंधश्रद्धांना कोसो दूर ठेवुया...

4)आगळ्या वेगळ्या सुविचारांनी
उत्सव हळदीकुंकुचा साजरा करुया
भगिनींनो चला, नव्या या पर्वात
पुस्तकांचे वाण सारे देवुघेवुया...

5)नव्या विचारांनी नव्या दिशेने
अवघ्या भारतदेशास नेवुया
नवसंकल्पनांचे वाण रुजवुनी
मजल प्रगतीची ती गाठुया...

6)परंपरेने चालत आली
रीत अशी ही हळदीकुंकुची
नको उत्सव फक्त सधवांसाठी
मागणी असे ही नव्या युगाची...

*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...