Wednesday, August 17, 2022

देवांचा "whats app group"

*देवांचा "whats app group"*


📲📲📲📲📲📲📲📲

देव सुद्धा कंटाळले 
सारखा ऐकून *जप*
ठरवलं मग त्यांनी 
 करु सुरू *व्हाॅटस अप*

मनात करुन विचार, *नारदांनी*
 मारली *ब्रम्हदेवांना* *pin*
म्हणाले "महाराज, 
 आपणच व्हा ना *group admin*"

खूप करुन विचार, 
 दिली *ब्रम्हदेवांनी* संमती
मग *netpack* आणि *wifi* संगे 
 आली *smartphones* ना गती

सर्व देवांना *add* करुन, 
 रात्री *ब्रम्हदेवांनी* गाठली *शेज*
सकाळी आला *गणरायाचा*, 
 पहिला *good morning* चा मेसेज

पण नेमकी नव्हती त्यावेळी
  *कैलासावर* *range*
तिन्हिसांजेला मिळाला
 *कैलासपतींना* तो *gm* चा *message*

क्रोधीत होऊन त्यांनी 
 पुत्राला केले *correct*
कोपलेल्या *महादेवांनी*
 नंतर *group* च केला *Left*

*सरस्वतीदेवींनी* पाठवले
  ज्ञानाचे *message*
तर *अप्सरांनी* केल्या
 *beauty tips* पेश

धनप्राप्तीसाठी *लक्ष्मीनारायणांनी*
 लिहिले अनुभवाचे बोल
तर *गुरुदेव दत्तांनी* लिहिले
 *शांती व वैराग्याचे* मोल

सोळासहस्त्र नारींसोबतचे
 *गोपाळकृष्णांनी* केले *photo upload*
पण *प्रभू रामचंद्रांची* एकपत्नीव्रताची
 *कविता* ठरली तोडीस तोड

आई *अन्नपूर्णेने* *group* वर
 टाकल्या छान छान *पाककृती*
तर *धन्वंतरी* म्हणाले,
 "सगळं खा पण जपा आपली प्रकृती"

*मारुतिरायांनी* लिहिला लेख
  *"योगा आणि gym चे फायदे"* 
संतप्त *दुर्गादेवी* म्हणाल्या
 *"पाळा इथले कायदे,*
  *तरच मिळतील फायदे"*

*यमराजांनी* सुद्धा *रेडा* सोडून
 *photo* साठी मागितली *bike*
तर पंढरीच्या *विठ्ठल-रखुमाईंच्या*
 *photo* ला आले प्रचंड *likes*

*Whats App,* च्या या खेळात
 *देव* झाले *दंग*
पण *धरतीवरची* सारीच 
 *यंत्रणा* झाली की हो *भंग*

*माणसाच्या* कर्तृत्वाला
  नव्हते *देवांचे* आशीर्वाद
होऊ लागले त्यांच्यात 
 तंटे, बखेडे, वितंडवाद

मग मात्र *नारदमुनींचे* 
 धाबे दणाणले
*ब्रम्हदेवांना* ते परत 
 एकदा शरण गेले

म्हणाले " देवा, *group* च
  सारा करा *delete,*
सगळ्याच *देवांना* 
 याचा आला आहे *वीट,*

माणसांनाच करू द्या 
 त्यांचे हे रोजचे *काम,* 
आपण फक्त देवू आशीर्वाद
  ऐकूनी आपले *नाम !!*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...