Tuesday, August 16, 2022

संदेश नियतीचा

🌿संदेश नियतीचा🌿

नेहमीचेच दिनक्रम 
आता मात्र ठप्प होते,
एका सकाळी मी
सहज गच्चीत उभी होते.

म्हणे कोरोना नावाचे सावट
परिसरात पसरत होते,
काळजीपोटी माणसं मात्र 
खिडकितूनच डोकावत होते.

आजूबाजुचे चित्र काहिसे
दिवसेंदिवस बदलत होते,
विविध पक्षी मात्र
गच्ची-खिडकीत थबकत होते.

परिसरातील हा बदल 
रोजच जाणवत राहिला,
पक्षांच्या हालचालींकडे पाहण्याचा
नवा छंद मज लागला.

एकदा एक चिऊताई
वेगळ्याच पक्षास भरवत होती,
माझ्या विचारचक्रास 
जणू ती चालना देत होती.

कोणे काळी जातीधर्मात 
भेद करणारी माणसं,
कोरोनाच्या भयावह परिस्थितीत 
सारे विसरुन मदतीचा हात एकमेकांस देत होती.

कोरोना नष्ट झाल्यानंतरही मानवा
एकोप्याने राहूया ,
निष्पाप पक्षांकडून... नियतीने दिलेल्या धड्यातून 
घेतलेली शिकवण जपूया....

हीच अमुची प्रार्थना 
अन् हेच अमुचे मागणे,
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे ...🙏🏻

 — श्रीम. प्राप्ती प. अवसरे
               ( ठाणे - पश्चिम )

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...