"ए आई" आणि " अहो आई " विषयीची एक छान कविता...
माहेरच्या मातीतली तुळस जोवर सासरच्या अंगणात रूजत नाही
तोवर तुलना होणारच दोघीमध्ये
ए आई आणि अहो आई।।
आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते
पण कर्तव्यदक्ष सुगृहीणी घडवण्यासाठी अहो आई कठोर वागते।।
जन्मदात्या आईची सर कोणालाही येणार नाही
पण तरी अहो आईचं आयुष्यातलं महत्व कमी होणार नाही।।
ताणल्याशिवाय तुटत नाही
अन् टाळी एका हातानं वाजत नाही
असं एकतरी घर दाखवा बघू
जिथं भांड्याला भांड लागत नाही।।
अहो आईचे अनुभव तिचे कष्ट याचे ठेवावे भान
म्हणजे घराच्या रंगमंचावर
होणारच नाही नाटक मानापमान।।
अहो आईचा मोठाच पाठींबा
घरादाराला त्याचाच आधार
मुलं तिच्याच स्वाधिन करून
आपण संभाळतो घरसंसार।।
माहेरची जाईजुई बहरून
सासरच्या मंडपावर चढते
ए आई इतकं मुलीचं कौतूक
अहो आई सुनेचंही करते।।
दोघीही समईतल्या वातीसारख्या स्वतः जळून घर प्रकाशमयच करत असतात,
एक मुलीला संस्कार देते,
एक सुनेलां पुढच्या पीढीकडे द्यायचे रीतीरिवाज शिकवते
सर्व आया आणि सासवांनां समर्पित.....
===============================================
मलाही वाटतं ... !
मलाही वाटतं .....
कधीतरी स्वतःच्याच तालात जगावं
घड्याळाचा लगाम तोडून
कसं मोकळं मोकळं व्हावं !
गरम चहाचा आयता कप
आरामखुर्चीत बसून ऐटित संपवावा
मलाही वाटतं
"आज नाश्त्याला काय आहे हो ?"
हा प्रश्न एकदातरी मी विचारावा ...!
मलाही वाटतं
स्वयंपाकाची धावपळ , जेवणाची तयारी
कशाकशाचा विचार न करता
मस्तीत पेपर वाचावा
जेवणाच्या क्रमवारीत
माझा पहिला नंबर लागावा .....!
मलाही वाटतं ...
तडक वामकुक्शीला वळावं ,
उरलं-सुरलं, रात्री काय ?
चक्रात त्या न पडता
आवडीच्या पुस्तकात
तासंनतास रमावं ...!
मला नसतो वीकएंड
ना मिळतो हॉलिडे
सुट्टी असेल तेंव्हा तर
कामे वाढतात दुप्पटीने .... !
थांब थोडी जरा आता
नुसतं वाटून काय होणार ?
नेहमीच्याच रहाटगाड्ग्यात
उसंत तरी कधी मिळणार ?
माझी ना युनियन
ना सरकारचा ठाव
कुणापुढे मांडणार
मागण्यांचा प्रस्ताव ?
बाहेरचं जग मोठं
मोठया जगाच्या मागण्या हजार
माझ्या साध्याशा या मागण्यांना
इथे भीक तरी कोण घालणार ..?
*एक आई*



===============================================
*आई*

*काहीच बोलता न येणारी बाळं* *बोलायला शिकतात*
*बोलायला शिकवलेल्या आईला*
*कधी कधी खूप खूप बोलतात* 

*मान्य आहे पहिला संघर्ष* *आईशीच असतो*
*बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ*
*समजून का घ्यायचा नसतो ?* 

*नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा* *हवे तसे बोला , मस्करी करा*
*ती कायम तुमच्या पाठीशीच असते*
*कारण ती वेडी असते* 

*नाही जेवला , अभ्यास नाही केला* *लवकर नाही उठला , नाराज दिसला*
*सतत विचारपूस करत राहते*
*कारण ती वेडी असते* 

*तुम्हाला रागावते पण तीच रडते* *मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते*
*स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते*
*कारण ती वेडी असते* 

*जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते* *हरला तर खंबीर बनवते*
*तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते*
*कारण ती वेडी असते* 

*ती नाही कळणार , नाही उमगणार* *तीच्यामुळे आपण काहीसे घडलो*
*हे आज नाहीच आपल्याला पटणार*
*कारण ती वेडीच वाटणार* 

*खरं तर ती वेडी नसतेच कधी* *मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत*
*स्वतःला ही नव्यानं फुलवत असते*
*स्वप्नातील दिवस तुमचे*
*वास्तव स्वीकारुन बघत असते*
*कारण ती "आई "असते* 

*ती उमगू लागते तेव्हा आपण* *मागे जाऊ शकत नसतो...*
*ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी*
*यासारखा खरा आनंद नसतो,,,* 

*सर्व आईंना समर्पित*
*.......सुप्रभात......* 







कवी - - अज्ञात
No comments:
Post a Comment