Tuesday, August 16, 2022

*घर*


मी घर बांधतो घरासारखं
आणि
हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय त्याच्या मनासारखं !

मी विचारलं त्याला , 'बाबारे , ना तुझ्या नावाचा सातबारा,
ना तुझ्या नावाचं मुखत्यारपत्र !'

तर म्हणतो कसा,

'अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं 
आणि कुणाच्या मनात घर करणं ?

माझं घर तर काड्यांचं आहे.
तुझं घर माडीचं आहे!

नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर
माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं!'

मला नेहमी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.
आता वाटतंय.
त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असतो.
तो डोळे झाकून घरट्यात बसला, की *समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.*

त्या पक्षाने शिकवलं मला...

एका घराची दोन घरं होण्यापेक्षा *घरात घर करुन राहाणं*

आणि

दुसऱ्याच्या *मनात घर करुन राहाणं* कधीही चांगलं..
*🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...