Tuesday, August 16, 2022

 गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना

हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा...
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा...
कालचा हा खेळ बघ वाटे नवा

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे

हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता...
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा...
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा...

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

================================================

 नातवंडांनी हॊऊच नये
नयेच होऊ 
कधी मोठे... 

काळ सरकतोच भराभर
पाने उलटतातच झरझर
झाडाखाली पडतो खच
सुकल्या-वाळल्या पर्णांचा
गळून पडल्या
काटक्यांचा
संपून गेल्या ओलाव्याचा
पण संपून जाऊ नयेत
कधीच त्या कोवळ्या
 विभ्रमांचे साठे....

गळ्यातल्या हातांचे
गोजिरे हार
अस्फुट शब्दांचे ते
हवे हवेसे उच्चार
काळजीने धरलेल्या
हातांमधले ते
मायालाघव
पांघरुणात बिलगलेल्या
स्पर्शांचे ते मखमाली
रेशीमआठव
कधी होऊ नये
ते मोरपीस कुरठे....

त्या पांघरुणातल्या गप्पा
ती न संपणारी मस्ती
गोष्टीतल्या भुताच्या
अतरंगी गोष्टी
ते हसणे पोटभर
ते रडणे घोटभर
आजी आपली जास्त
हे दाखवण्यासाठी केलेले
बहाणे खोटेनाटे...

असेच रहावे जन्मभर
परीसारखे.. खारीसारखे..
फळामधल्या बीसारखे...
दूधदातांच्या फटींतून
असेच हसावे 
गंगाजलातल्या निर्मळ
शिंपल्यासारखे
लबाड ओंजळीतून
चमकावेत डोळे असेच
भरतीच्या लाटांवरच्या
फेनफुलांसारखे
असेच रहावे
मावळतीशी उगवतीचे साटेलोटे....

पुरवावा एकूण एक हट्ट
त्यांनी करावा जो जो
खाऊ घालावा तो पदार्थ
 त्यांना हवा तो तो
पण मग तेव्हाचे काय
जेव्हा अंतिम क्षणी
मिटताना हे डोळे,
निरोपताना हा गाव
कासाविशीने 
म्हणतील-
आजी..please don't go...
तेव्हा कोवळ्या
बोटांतून कशी सुटतील
सुरकुतलेली बोटे.....?
मग मात्र व्हावेच लागेल 
त्यांना मोठे
व्हावे लागेल त्यांनाच मोठे.....!!
    - संजीवनी बोकील

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...