मी हल्ली
पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !
पुस्तकं महाग झालीयत,
माणसं स्वस्त.
शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात
माणसं.
बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र
खूप वेळ लागतो
समजायला.
काही तर
आयुष्यभर कळत नाहीत !
सगळ्या साईजची
सगळ्या विषयांची.
छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.
आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.
दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं
बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.
पाठीवर थाप मारणारी,
हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने,
घट्ट धरून ठेवणारी.
मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.
सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं,
डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं.
काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही,
काहींच्या मजकुरात विषयच नाही,
वर्षामागे वर्ष पानं जातात गळत,
काहींची प्रस्तावनाच संपत नाही !
पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,
माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार,
विषय, मजकूर
सारंच बदलत बदलत
शेवटी वाचायला
माणूसच उरत नाही.
तरीही शब्द शब्द
वाचतोे मी माणसं,
पानापानातून
वेचतोे मी माणसं.........!!! 

==============================================
सुखाचे गुंफलेले काही मोजके क्षण !!
कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग
आलं घातलेला वाफाळणारा चहा
अंगणातला प्राजक्ताचा सडा,
सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर ,
अवीट गोडी असलेलं ... लताचं "सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के ...",
लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात
पुलं चं पुस्तक , त्यांचं पेटीवादन ... त्यांचं कथाकथन,
आशाच्या हुकमी आवाजातलं "जाईए आप कहा जाएंगे… , "
बिस्मिल्लांचे सनईचे सूर ,
सुधीर फडके यांचं "धुंदी कळ्यांना …" भावगीत
सोनचाफ्याची फुलं
अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी
थोडीशी तिखट भेळ , गरम भजी , चुलीवरची भाकरी , गरम हुरडा आणि चटणी
रातराणीचा सुगंध ,
थंडीत खाल्लेलं टेंडर कोकोनट ,
गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र ,
पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी
अचानक नजरेला पडलेला भारद्वाज
आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी
दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं …सुख सुख म्हणतात ते हेच…
..... आणखी काय पाहिजे.....छोटी छोटी सुख शोधाल तर जीवन जगाल !!!
====================================
आयुष्य कठीण अजिबात नसतं . .
कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .
कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .
कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .
कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .
कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .
कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .
कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .
कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .
कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .
कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .
कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .
कधी पैसा असला कि नात्यांचा मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो
. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??
ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .
आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......
==============================================
तनाव के उन क्षणों में मजबूत लोग भी आत्महत्या कर लेते हैं..
वो लोग जिनके पास सब कुछ है
शान ... शौकत ... रुतबा ... पैसा .. इज्जत
इनमें से कुछ भी उन्हें नहीं रोक पाता ..
तो फिर क्या कमी रह जाती है ???
कमी रह जाती है उस ऊँचाई पर
एक अदद दोस्त की
कमी होती है उस मुकाम पर
एक अदद राजदार की
एक ऐसे दोस्त की जिसके साथ "चांदी के कपों" में नहीं
किसी छोटी सी चाय के दुकान पर बैठ
सकते ..
जो उन्हें बेतुकी बातों से जोकर बन कर हंसा पाता ...
वह जिससे अपनी दिल की बात कह हल्के हो सके..
वह जिसको देखकर
अपना स्ट्रेस भूल सके
वह दोस्त
वह यार
वह राजदार
वह हमप्याला
उनके पास नहीं होता
जो कह सके तू सब छोड़ ... चाय पी मैं हूं ना तेरे साथ ...
और आखिर में
यही मायने कर जाता है...
सारी दुनिया की धन दौलत
एकतरफ...सारा तनाव एक तरफ ..
वह दोस्त वह एक तरफ !!!
लेकिन अगर आपके पास
वह दोस्त है
वह यार है
तो किंमत समझिये उसकी...
चले जाइए एक शाम उसके साथ
चाय पर ...
जिंदगी बहुत हसीन बन जाएगी......
याद रखिए आपके तनाव से यदि कोई लड़ सकता है तो वो है आपका दोस्त और उसके साथ की एक कप गर्म चाय !!!

======================================
*माळा सरसर रोज ओढतो* ,*
*पण जप काही जमत नाही*
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(1)
गंध लावतो मी रोज नेमाने.
मनोभावे पूजा करतो.
देवळात जातो, भजन करतो.
कुळाचारही सगळे पाळतो.
सात्विक असा मी धुतला तांदूळ.
पण मनात कुठनं गणंग येतात..
लपून राहील्या सूक्ष्म अळ्यांचे,
फणा काढून भुजंग होतात..
_वळवळ शेपटी विकारांची,_
_ठेचता अजून ठेचत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(2)
लोक मला नीट ओळखत नाहीत..
पण माहितंय मला, मी असतो हुशार.
चतुर तर मी असतोच असतो.
प्रगल्भ असतात माझे विचार.
चांगलं असतं ते माझंच असतं.
माझंच असतं नवीन, वेगळं.
मीच स्मार्ट. मीच ज्ञानी.
मीच करतो सुंदर सगळं.
_गर्द भिनल्या अहंकाराचा.._
_उग्र दर्प काही विरत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(3)
“आज काय ? कारल्याची भाजी ?”
मग मी पोळी एकचं खाईन..
“भज्या चार तळ की पट्कन.”
मग एखादी पोळी जास्त जाईल..
हपापून असतो मी श्रीखंडाला.
बासुंदीतून वाहून जातो.
चमचमीत एका मिसळीसाठी,
कोल्हापूरला जाऊन येतो.
_‘हवं - नको’ नसलेली, असली.._
_भुकंच मला लागत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(4)
काय माणसं वागतात एकेक.
जगात नीतीच उरली नाही..
उपकाराची किमान जाणं ठेवणं.
असली रीतच राहिली नाही..
तो - काs तसा वागतो ??
म्हणून मग मीही असा वागतो.
अन्यथा जगाला माहिताय..
किती क्षमाशील मी असतो.
_वृत्तीचा हा जाता तोल.._
_जाणवत नाही. सावरत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(5)
पळावं लागतं किती..
एक नेटका संसार चालवताना.
फरपट होत राहते जीवाची..
सुख खेचून आणताना.
होंडा सिटी पण मी पाहून ठेवतो,
मारुती ८०० घेताना.
पण चार वेळा विचार करतो..
दुष्काळाचा निधी देताना.
_खऱ्या सुखाचं मर्म मला,_
_अजूनही कळत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(6)
रस्त्यावरती सिग्नलला कधी..
काळी फाटकी पोरं दिसतात.
जगणं जळलेल्या डोळ्यातून..
ओल्या ओल्या हाका येतात.
पाच रुपये मी देतो कदाचीत,
किंवा कान बंद करतो.
डोळे गच्चं मिटून घेतो,
किंवा मग सिग्नलच पडतो.
_खेळाप्रमाणे जग पहायला,_
_नजर अजून धजत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(7)
चाकोरीत जगणारा. मी, पापभीरू.
पण तत्वासाठी. हट्टी असतो.
चार माणसं जमली की,
गंभीर, ठेवणीतलं. बोलत राहतो.
पण बऱ्याचं वेळा तत्त्व माझं.
नेमकं माजघरात राहुन जातं..
कोसळणाऱ्या नीतिमूल्यात..
भिजलं मांजर बनून जातं.
_शोधत राहतो आदर्श मी,_
_जो ,आरशातही स्पष्ट दिसत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(8)
भिऊन जातो मी..
जेव्हा बातम्या बघतो, पेपर वाचतो.
अधर्म, असत्याचा नाच,
बघावं तिकडं सुरु असतो.
भितो मी.. –
रस्त्यात भांडायला.
खरी मतं मांडायला.
होय. भितो मी साहेबाला.
गणवेषातल्या पोलिसाला.
अरे ला कारे म्हणायला.
सभेत शिट्टी वाजवायला.
गुंडाला एखाद्या झोडायला.
माळावरचं फुल पण तोडायला.
दरदरून असलं भय हे.
पिढीजात पिचून पोसलेलं..
दणकट असून मनगट ते.
पांढरपेशात लपलेलं..
_भयगंड हा लागीरलेला,_
_कुठंल्या अंगाऱ्यानं उतरत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(9)
जीव पोखरणारा एक प्रश्न .
महाराज तुम्हाला विचारू का ?
सत्वगुणी संत लोकांचं,
चांगलं वागून चुकतं का ?
त्यांच्याच वाट्याला इतकी दुःखं.
नक्की हिशोब काही चुकत असेल..
बघा ना जरा महाराज !.. तुमचा -
‘हातचा’ मिळवायचा रहात असेल..
_कर्मफळाची विश्लेषण,_
_मन काही ठिकाणी मानत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही.* -(10)
भवरोगी मी असा जर्जर.
कृतकर्मात लडबडलेला..
धाव धावलो आजवर आता.
भर चौकात गडबडलेला..
मायेचा तुमचा हात महाराज.
एकदा पाठीवरून फिरूदे..
जन्मामध्ये या किमान.
इयत्ता, पहिली तरी पास होऊदे..
_संचिताचा हा सुतळगुंता,_
_माझ्याच्याने आता सुटत नाही…._
*नाम तर मी घेतो महाराज.*
*त्यात ‘राम’ अजून येत नाही..* -(11)
=======================================
*शेअरिंगचं सौजन्य : गिरीश शिंत्रे*
माझे माझे चे गाठोडे
तुझ्या चरणाशी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
किती मोकळी मी झाले ।।
माझे माझे गणगोत
चिंता सर्वांची वाहिली
तुझे तुझे म्हणताना
गुंतागुंत ती सुटली ।।
माझा माझा रे संसार
करिता आयुष्य हे गेले
तुझे तुझे म्हणताना
मुक्त मनोमनी झाले।।
माझी माझी मुलेबाळे
मोह सुटता सुटेना
तुझे तुझे म्हणताना
चिंता काहीच वाटेना।।
माझे माझे हे वैभव
हाच ध्यास जीवनात
तुझे तुझे म्हणताना
मन झाले हे निवांत।।
माझे माझे हे चातुर्य
करी सदा रे विवाद
तुझे तुझे म्हणताना
ऐकू येई अंतर्नाद ।।
माझे माझे म्हणताना
मोह माया ताप झाली
तुझे तुझे म्हणताना
लागे ब्रह्मानंदी टाळी ।।
माझे माझे मीपण।।
तुझ्या चरणी वाहिले
तुझे तुझे म्हणताना
तुझ्यातच विलोपले ।।
*वीणा मुंदरा.....*
==================================
मनात येत राहते
जिथे तिथे तुझेच नाव
जिथे शरीर पोचते
तिथे तिथे तुझेच गाव
जाई जिथे नजर तिथे
रूप तुझे पाहतो
तुझेच कोड सर्वदूर
बाई मी ग ऐकतो
पावलांत पैंजणे
किणकिण नादावती
पक्ष्यांचे कंठध्वनी
तुझ्या गळी स्थिरावती
गंध तुझ्या अंगाचा
परिसरात पसरतो
प्रेक्षक मग नागासम
देहभान हरपतो.
..........अजित. .........
********************************************************
सर...एकटेच आलात?
काल अडीच महिन्यानंतर शाळेत हजर झालो. १५ जूनपासून ऑनलाईन वर्ग सुरू करायचेत. त्याच्या तयारीसाठी पाच दिवस अगोदरच हजर व्हायचा आदेश आला. हजर व्हायचे सोपस्कार पूर्ण करून कॉम्प्युटर रुममध्ये जात असताना मुलांच्या सहवासाने लेकुरवाळी होणारी शाळेची इमारत काल पोरकी वाटत होती. त्यावरून सुचलेल्या ओळी:
सर...
एकटेच आलात?
मुले कुठे आहेत?
हसणारी
रडणारी
भीडणारी
चीडणारी
नाचणारी
गाणारी
खेळणारी
पळणारी
मुले कुठे आहेत?
सर...
एकटेच आलात?
मुले कुठे आहेत?
महिने झालेत-
घंटेचे टोल पडले नाहीत
प्रार्थनेचे बोल घुमले नाहीत
नि पीटीचे ढोलताशे वाजले नाहीत
सर...
एकटेच आलात?
मुले कुठे आहेत?
पाखरांविना मळा
खडूविना फळा
नि मुलांविना शाळा
नसते हो!
सर...
एकटेच आलात?
मुले कुठे आहेत?
.........................
दा. रा. खांदवे
No comments:
Post a Comment