“परिपुर्ण मी”
वडिल असावे कर्तुत्ववान अन् रुबाबदार,
समोर येताच वाटावे निश्चिंत अन् जबाबदार!
आई मात्र असावी साधी सरळ छान,
केंव्हाही कुशीत तिच्या खुपसता यावी मान!
भाऊ असावा एक तरी उमदा,
रुबाब त्याचा मिरवी, रूपया बंदा!
बहिण असावी एक सुंदर अन् गुणी,
हजर व्हावी समोर गरज पडता क्षणी!
सासरे असावेत प्रिय वडिलांहुन,
कोणीही भेटताच म्हणावे, ’अरे, ही तर आमच्या बाळुची सुन’!
सासु असावी गृहकृत्यदक्ष छान,
उपसलेत किती कष्ट, राखावा तिचा मान!
नवरा असावा मित्र कतृत्ववान,
आकंठ बुडावे प्रेमात त्याच्या, हरपुन मी भान!
दिर असावा एकतरी धीर-गंभीर,
पाठीशी उभा असे कायम खंबीर!
जाऊ असावी प्रेमळ अन् पाककलावान,
चव तिच्या हाताची, पुरवी जिभेचे चोचले छान!
नणंद मात्र असावी सख्खी मैत्रीण गोड,
सुख-दु:खात लाभे तिची अखंड जोड!
वहिनी असावी सुविद्य अन् प्रतिभावान,
माहेरपण टिकवुन ठेवी, वाटे तिचा अभिनान!
मुलं असावीत सर्वगुणसंपन्न आणि हुशार,
आई त्यांची होण्यातच वाटे कृतकृत्य फार!
मुलगी असावी एकतरी, खोडकर अन् चुणचुणीत
प्रतिबिंब तिचे पहाते, भाची अन् पुतणीत!
जीवाला जीव देणार्या मैत्रीणी असाव्यात मात्र भरपुर,
सहवासात त्यांच्या रमता यावे नेहमीच पुरेपुर!
ह्या सर्व नात्यांनी युक्त अन् परिपुर्ण मी!!
***********************************************
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही
पान नाही, पाकळी नाही, देठही नाही
अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना
आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना;
फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते
एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते -
एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते,
मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !
एप्रिल फुल दिवसाच्या शुभेच्छा !!!

========================================
दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.
दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
दहा मिनिटे साधुसंन्याशासामोर बसा, आपल्याजवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल.
दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.
दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.
दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.
दहा मिनिटे शेतकरी/कामगार यांच्या समोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.
दहा मिनिटे सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल.
दहा मिनिटे मित्रांसमोर बसा; स्वर्ग, स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल.
सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!

===============================================
*उरले सुरले*
उरले सुरले जपून वापरायची
सवय किती छान होती
आयुष्य साधंच होतं तरी
मजा काही औरच होती
तोडकी मोडकी कंपास
पुन्हा जोडून वापरत होतो
झिजली जरी पेन्सील तरी
टोपण लावून लिहीत होतो
तुटलेला पेन पुन्हा पुन्हा
स्प्रिंग बदलून वापरत होतो
एकच पेन खूप जपून
रिफील करून वापरत होतो
जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे
कव्हर घालून वापरत होतो
तुझी पुस्तकं दे बरं मला
आधीच सांगून ठेवत होतो
जुन्या वह्यांची कोरी पानं
दाभण वापरुन शिवत होतो
जुन्यातूनच नाविन्याचा
आनंद आम्ही घेत होतो
सायकलच्या जुन्या टायरचे
गाडे आम्ही चालवत होतो
तोल कसा सांभाळावा ते
बेमालूमपणे शिकत होतो
फुटलेल्या फटाक्यांची
दारू गोळा करत होतो
उरलेल्या चिंध्याचा मस्त
गरगरीत चेंडू करत होतो
तुटलेल्या स्लीपरला पीन
लावून वापरत होतो
ध्येयाकडे न थांबता
तरीही पाऊले टाकत होतो
फुटलेल्या बांगड्यांनाही
वाया घालवत नव्हतो
दगडांचा बच्चू तर फरशीची
लगोरी आम्ही करत होतो
फाटलेल्या गोधडीला ठिगळं
लावून सजवत होतो
उसवलेल्या कपड्यांना
धाग्या दोऱ्याने सांधत होतो
गंध जरी जुना असला
तरी छंद मात्र नवा होता
काटकसर अन बचतीचा
संस्कारच चिरकाल होता
वापरा आणि फेकून द्या याचा
हल्ली जमाना आलाय
किंमत नाही वस्तूंची म्हणून
नव्याचा कचरा झालाय
*सुई धागा हरवला नाही*
*पण तो हल्ली कोण घेत नाही*
*फाटलेली नाती आणि वस्तू*
*खरंतर कोणीच शिवत नाही*









No comments:
Post a Comment