Wednesday, August 17, 2022

Beauty of Marathi👌🏻👌🏻👍🏻👍🏻


*पाऊल🦶🏻 व पाय🦵🏻*

*🤷‍♀पाऊल व पाय* दोन्ही शब्द चटकन् बघितलं तर ऐकायला व दिसायला एकच वाटतात; पण त्यांचे संदर्भ खूप वेगळे असू शकतात..

*पाऊल नाजूक* ..व
 *मुलायम..👌🏻* तर *पाय भक्कम* अन् *मजबूत* असावा लागतो..!👍🏻

*पाऊलखुणा* उमटतात तर *पायांचे ठसे ...!!*

*पाऊलवाटेवर* कोणाची साथ मिळेलच याची खात्री नसते; पण *पायवाट* ही अनेकांच्या चालण्यामुळे बनते..!👌🏻👍🏻

*पाऊल जपून टाकायचे* असते; पण *पाय हा रोवायचा* असतो.. !!👌🏻👍🏻

🤷‍♀काय कमाल आहे बघा..
नावडत्या व्यक्तीच्या घरी *"कधी पाऊलसुद्धा टाकणार नाही"* असे म्हणतो; 🤔पण आवडत्या माणसाच्या घरातून मात्र *आपला पाय लवकर निघत नाही..!!☺👍🏻*

नको त्या ठिकाणी *पाऊल घसरते*😔 तर बहारदार संगीत मैफिलीत *पाय रेंगाळत राहतो !*👍🏻

 *पाऊल वाकडे पडले तर पायांचा मार्ग व दिशा चुकते !*😔

जीवनात किंवा व्यवसायात टाकलेले *पहिले पाऊल हा एक कौतुकाचा विषय बनतो* तर येणार्‍या अनुभवांमुळे *आयुष्यभर कधी स्वतःसाठी वा इतरांसाठी केलेली पायपीट* ही अटळ व गरजेची असते... *...!👍🏻*

बऱ्याचदा विरोधी अर्थाने हे दोन्ही शब्द आपण वापरत असलो तरीही........

🤷‍♀जन्माला येताना स्वतःच्या *पावलांनी* न येणारे आपण ,...परत जातानादेखील आपल्या *पायांनी* मात्र जात नाही एवढंच काय ते दोघांत *साम्य* आहे...
======================================

ती.. मी...

कधी कधी केव्हा तरी,

ती आकांत
मी ...निवांत

ती अशांत
मी ...प्रशांत

ती बडबड
मी ..निशब्द

ती धमकी
मी ...विनम्र

ती किरकिर
मी बेफिकीर

ती गंभीर
मी धीरखंबीर

ती आदळआपट
मी तोंडावर बोट

ती आक्रमण
मी ...समर्पण

तरीही नेहमी मात्र,

ती उदाहरण
मी साधारण

ती सुगरण
मी विरजण

ती आठवण
मी विस्मरण

ती तल्लख
मी क्षुल्लक

ती वक्तशीर
मी ऊशीर

ती सुरळीत
मी विस्कळीत

मी कावरा बावर
ती आवरा..आवर

म्हणुनच,

*ती रुक्ष कधी गोड क्षणात*
*मी कायम तिच्या ऋणात...*
=============================================


 *लाखो इथले गुरू...!


बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे 
यांशी गोष्टी करू!
बघू बंगला या मुंग्यांचा, 
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील 
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
*लाखो इथले गुरू!*
सुग्रण बांधी उलटा वाडा, 
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे 
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
*लाखो इथले गुरू!*
कसा जोंधळा रानी रुजतो, 
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा 
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा 
*लाखो इथले गुरू!*
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, 
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या 
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा 
*लाखो इथले गुरू!*

– ग. दि. माडगूळकर

*गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*
======================================

 नशीब आमचे टिचर नव्हते
बाई आणि गुरूजी होते..

स्वतःच्या पगारापेक्षा मुलांचे 
घडणे पहात होते..

शाळेत एकटे असले तरीही
चालते बोलते विद्यापीठ होते...

पाठीवर मारताना शिवशिवणारे हात
पोटभर शाबासकी देत होते..

हुशार मुलांबरोबर ढ विद्यार्थांना
व्यवहारात निपुण करत होते..

आपल्या साडी लिपस्टिकपेक्षा
मुलांच्या स्वच्छतेकडे पहात होते..

नीटनेटक्या कव्हर्सपेक्षा
हस्ताक्षरावर भर देत होते...

शाळेतल्या मुलांच्या घरदारासकट
आर्थिक परिस्थितीला ओळखत होते..

शाळेतल्या मुलांबरोबरच
शाळेचा अभिमान बाळगत होते..

परिक्षार्थी घडवण्यापेक्षा
गुणी विद्यार्थी घडवत होते..

आणि

हा माझा विद्यार्थी म्हणून सांगताना
मनभर आनंदी होत होते...

😊😊

आणखी एक अत्यंत महत्वाचे सांगावेसे वाटते..

त्यावेळी 2/ 2 वर्ष नापास होणारे विद्यार्थीही आत्महत्या करत नव्हते... 

उलट नवीन बॅचबरोबर मिसळून जात होते...

त्याचेही श्रेय त्यांचेच होते
*************************************************


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...