There’s no good story without romance. – Stephanie Meyer
------------------------------ ------------------------------ ---------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – सुखी वैवाहिक जीवनाचे नऊ नियम!
------------------------------ ------------------------------ ---------
सर, माझे वय बेचाळीस वर्ष आहे. लग्नाला एकोणीस वर्ष झाली, दोन मुली आहेत,
लग्न झाल्यापासुन, माझ्या पत्नीशी माझं कधीही जमलचं नाही, सर!
कायम भांडण, सारखे खटके उडतात, माझ्या आई वडीलांशी तिने कधी जुळवुन घेतलं नाही, वडीलांना हार्ट प्रॉब्लेम आणि आईला डायबेटीस असुनही आई वडीलांपासुन वेगळा राहतो.
मागच्या पाच सहा वर्षांपासुन पत्नी शारीरीक संबंधाना नकार देते,
ह्या वयात माझ्या तिच्याकडुन अशा अपेक्षा चुकीच्या आहेत, असं तिचं म्हणणं आहे,
ह्या तिच्या वागण्यामुळे माझा स्वभाव चिडचिडा झाला आहे. कामात लक्ष लागत नाही, आई वडील असतात, मी सतत चिंतेत असतो,
ही गोष्ट चारचौघात बोलताही येत नाही, ह्या सगळ्याचा माझ्या मुलींवरही परिणाम होत आहे,
माझे काय चुकत आहे, सर?
------------------------------ ------------------------------ ------------------------------
XXX जी, इतक्या प्रामाणिक पणे आणि मोकळेपणाने प्रश्न मांडलात, याबद्द्द्ल मनःपुर्वक अभिनंदन!
तुमचा प्रश्ण वाचला आणि क्षणभर गोंधळात पडलो, काय उत्तर देऊ तुम्हाला?
खरचं काही प्रश्ण अशी उत्तरं शोधल्याने सुटतात,
त्यात अनेक वर्षांपासुन, नात्यांच्या गुंत्यांना पडलेली अशी सुत्तर गाठ सहजपणे सोडवता येईल का?
संदीप महेश्वरीच्या ‘आसान है’ ह्या परवलीच्या शब्दांचा मान ठेवु आणि प्रश्णाची उत्तरे शोधु!
आजकाल नवरा बायकोचं नातं हे बॅंक आणि कस्टमर सारखं झालं आहे, बॅंकेत जितकं जास्त डिपॉझीट करता, तितकं जास्त व्याज मिळतं,
तुमचा प्रश्ण आहे की मला इंट्रेस्ट का मिळत नाही?
अहो! तुम्ही तर कर्जाच्या आणि इ एम आय च्या ओझ्याखाली दबल्या गेले आहात.
इतकं सोपं आहे हे!
एकदा जर का हे समजलं की वैवाहीक आयुष्य सुखाचं बनतं!
आपण शर्ट घेतला, नाही आवडला, तर टाकुन देता येतो, नवा घेता येतो.
गाडी वापरुन वापरुन जुनी झाली तर नवीन मॉडेल घेता येतं,
जुनं घर अपुरं पडु लागलं तर नवं घर बांधता येतं,
पण लग्न ही अशी रिलेशनशिप आहे ना, जिथे कितीही त्रास झाला तरी सहजासहजी नातं तोडता येत नाही,
माझ्या लग्नाला पाचच वर्ष झाली पण मला हे खुप लवकर समजलं, उमगलं, अगदी हेवा करावा इतका माझा संसार सुखाचा आहे आणि म्हणुन आज मी तुम्हाला हक्काने काही गोष्टी सांगणार आहे.
------------------------------ ------------------------------ ----------
१) Relationship is Priority. -
आयुष्यात चार प्रकारची ध्येय असतात,
पैसा, आरोग्य, मानसिक संबंध, आणि नातेसंबंध –
तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्यांमध्ये नातेसंबंधाना प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे.
त्यातही प्रेमाच्या नात्याला कोरडं पडुन शुष्क आणि रुक्ष होण्याआधी भावनांचा ओलावा देऊन जगवण्याची वेळ आली आहे.
माझा तुम्हाला प्रश्ण आहे, तुम्ही प्रेम करायला शिकलात का?
ह्या पृथ्वीवर प्रत्येक माणसाने प्रेम करायला शिकलेच पाहिजे. ते ही पुन्हा, पुन्हा, रोज रोज, द्वेष करायला शिकण्याची आवश्यकता नसते, प्रेम करण्याचे शिक्षण मात्र माणसाला प्रयत्नपुर्वक घ्यावे लागते.
तुम्हाला जीवाभावाचे म्हणावेत असे मित्र आहेत का?
मित्रांवर प्रेम कसे करावे हे माहित असणार्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी असते.
बहुतांश पुरुषांना मैत्री करण्याच्या कलेचा सराव नसतो.
छोट्या छोट्या मुली तुम्हाला हातात हात घालुन शाळेत जाताना दिसतील. खेळताना किंवा अंधारात एकमेकांना गच्च धरुन ठेवतील. लाडात एकमेकींना मिठीत घेतील, बरोबरीने रडतील आणि गळ्यात पडुन म्हणतील, तु माझी सर्वोत्कृष्ट मैत्रीण आहेस.
छोटी मुलं अशा प्रकारे वागताना क्वचितच दिसतील.
वाढत्या वयासोबत पुरुषांच्या मनात एक पोकळी तयार होते, जसजसा तो व्यावसायिक यशस्वीतेच्या पायर्या चढत जातो, त्याचा इगो त्याला इतरांपासुन दुर नेण्यात कारणीभुत ठरत जातो,
फारच थोड्या पुरुषांना मन मोकळं करण्याची, प्रेमळ मित्रसंबंध अनुभवण्याची संधी मिळते.
पुरुषांची मैत्री ही फक्त कोणत्या तरी कृतीशी किंवा कार्यक्षेत्राशी निगडीत असते.
स्त्रियांचं विश्व मात्र मात्र परस्पर सहभाग, भावनिक शेअरींग याभोवती गुंफलेलं असतं!
नेमकं इथचं घोडं पेंड खातं!
म्हणुन सुखी वैवाहिक जीवनाचा नियम पहिला – तिला प्रायोरीटी द्या!
------------------------------ ------------------------------ ----------
२) जसे आत, तसे बाहेर!
असे लोक लोकप्रिय असतात, जे मुखवट्याशिवाय जगतात.
स्वच्छ, नितळ, पारदर्शी!
जर तुम्ही स्वखुशीने, प्रांजळपणे आणि मोकळेपणे वागलात तर तुमच्यावर प्रेम करणारे लोक तुम्हाला निश्चितपणे भेटतील.
जसं बडेजाव, मोठेपणाचा आव, बढाया, मी ग्रेट ही भावना आपलं इतरांपासुन अंतर वाढवते, तसं गप्प गप्प राहणे, व्यक्त न होणे, मनातल्या मनात ठेवणे, मुकेपणाने वावरणे अशा वागण्यानेही आपण आपल्या भावनांना योग्य प्रकारे हाताळु शकत नाही.
आपल्या लाईफ पार्टनर सोबत आपण शंभर टक्के प्रामाणिक राहिले पाहीजे.
मनाचा थांगपत्ता लागु न देणारे लोक आपल्या खर्या भावना लपवतात, आणि तिथेच दरी पडण्याची सुरुवात होते.
त्याउलट प्रामाणिकपणा प्रेमसंबंध वाढवण्यात उपकारक ठरतो. आपण निरागसपणे जगु लागलो की लोकंही जसे असतील तसे आपल्यासमोर सादर होतात.
आपल्या अवतीभवतीच्या अभेद्य भिंती तोडा. आपल्या माणसांसाठी घातलेली तटबंदी उध्वस्त करा.
कणखर, सहनशील, आत्मविश्वासु, भावनांचे प्रदर्शन न करणार्या, जेम्स बॉन्ड सारखे कठोर रुप सोडा.
सुखी वैवाहिक जीवनाचा नियम दुसरा - पारदर्शकाची कास धरा.
------------------------------ ------------------------------ ----------
३) प्रिये, माझे तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे.
पुलवामा हल्यामध्ये शहिद होणार्या एका गंभीर जखमी जवानाचे शेवटचे बोल काय होते, माहित आहे?
“प्रिये, माझे तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे.”
- मरण्याआधी त्याला आई वडील, इन्शुरंस, मुलांचे शिक्षण, भाऊ बहिण, प्रॉपर्टी सगळ्यापेक्षा तिची आठवण आली.
- आपण आपल्या प्रियजनांना आपल्या जाहीर प्रेमाची कबुली फार कमी वेळा देतो.
आपल्या पत्नीवर प्रेमाचा, सदभावनांचा वर्षाव करुन बघा, ती ही तुमच्याइतकीच प्रेमाची भुकेली आहे, साहेब! दररोज अशी काही वाक्ये बोलुन तर बघा,
- “देव, तुला सुखी ठेवो,”
- “तुला खुप मिस करेन मी!”
- तुझ्यावर माझा पुर्ण विश्वास आहे,
- तुझ्याएवढं ह्या जगात मला कोणीही प्रिय नाही.
मी तुम्हाला खोटं खोटं प्रेम करा असं सांगत नाहीये, मी फक्त तुमच्या मनातल्या जिव्हाळ्याला तिच्यापर्यंत पोहोचवायला प्रोत्साहन देत आहे.
आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर हे जाहीरपणे सांगायला आपण एवढे नाखुश का असतो?
प्रेमपुर्ण आणि निरागस स्वभाव तुम्हाला निरोगी कामजीवनाकडे घेऊन जाईल.
स्त्री आधीन व्हायला जितकी कठीण आहे, तितकीच ती संबंध जोडायला उत्सुकही असते.
पण त्याआधी तिच्याशी मैत्रीपुर्ण आणि विलोभनीय संबंध तयार व्हावा लागतो.
सुखी वैवाहिक जीवनाचा नियम तिसरा - तुमच्या प्रेमसंबंधाविषयी बोलण्याचे धैर्य दाखवा.
------------------------------ ------------------------------ ----------
४) प्यार का टच – करे सपनेको सच!
छोट्या छोट्या कृतीमधुन प्रेम व्यक्त केल्याने गाढ प्रेम निर्माण होते, जसे की -
- तिने केलेल्या सेवेबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद द्या.
- गुड मॉर्निंग किस तुमचा दिवस आनंदादायी, उर्जावान बनवेल.
- वाढदिवस, एनिव्हर्सरी विशेष काहीतरी करुन साजरी केल्याने अविस्मरणीय बनते.
- सकाळचा नाश्ता एकमेकांसोबत घ्या.
- आठवड्यातुन एकदा फक्त दोघेच एकत्र जेवणासाठी बाहेर जा. मोबाईल स्वीच ऑफ करा आणि फक्त सहवासाची मजा लुटा.
- एखाद्या रात्री मनातले सर्व कप्पे तिच्यापुढे रिते करा.
- भेटवस्तु द्या.
- कधी तिच्याशी उगीच छेडछाड करा. चोरटे स्पर्श, धसमुसळेपणा नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा जिवंत ठेवतो, नात्यांमध्ये गुलाबी रंगत आणतो.
- प्रेमळ पणा हाच आपला स्वभाव बनवा! प्रेम करण्याच्या कृती आपोआप सुचत जातील.
सुखी वैवाहिक जीवनाचा नियम चौथा - प्रेम व्यक्त करण्याच्या कृती शिका!
------------------------------ ------------------------------ ----------
हे होते सुखी वैवाहिक जीवनाचे पहिले चार नियम!
पुढच्या भागात अजुन पाच नियम घेऊन भेटीला येईन.
लेख आवडल्यास लाईक करा.
आपल्या सर्वांचा गृहस्थाश्रम, आनंदी आणि सहजीवन तृप्त करणारा होवो, ह्या ह्रद्यपुर्वक प्रार्थनेसह,
मनःपुर्वक आभार आणि शुभेच्छा!...
(2018 मध्ये एका व्हॉटस एप कोर्स साठी लिहलेला लेख)
[9/3/2020, 8:49 PM] +91 95036 45430: Law of attraction; is it just giving you false hope?...
------------------------------ ------------------------------ -------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – लॉ ऑफ अट्रॅक्शन; किती खरा? किती खोटा?
------------------------------ ------------------------------ -------------------
नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे?
आज मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे,
फेसबुकवर आपलं मानसशास्त्र नावाचा एक समुह आहे, गेल्या एकदोन वर्षात मी माझे अनेक लेख इथे प्रकाशित केले.
आपलं मानसशास्त्र ग्रुपवर मी आकर्षणाच्या सिद्धांताविषयी अनेक लेख लिहले. त्यातला एका पोस्टवर मला एका अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेच्या कार्यकर्त्याने गाठले.
त्याने मला काही प्रश्ण विचारले, आणि शंका उपस्थित केल्या, उत्तरे द्या नाहीतर पोस्ट डिलीट करा असे आव्हानही दिले. त्याचे प्रश्ण काहीसे असे होते.
१. ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ खरचं ‘लॉ’ आहे का? मग तो सिद्ध करता येतो का?
२. फक्त वस्तुंची कल्पना केल्याने त्यांची निर्मीती करता येते का?
३. फक्त विचार करुन सगळे मिळत असेल, तर काम का करायचे?
४. तुम्ही हे थोतांड सांगुन लोकांना आळशी बनवत नाही का?
तसं बघितलं, तर त्याचे सारे प्रश्ण आणि तर्क लॉजिकल होते.
‘आकर्षणाचा सिद्धांत’ ही टर्म तशी खुप वादग्रस्त आहे,
त्याची काही कारणे अशी आहेत,
• लॉ ऑफ अट्रॅक्शन फाटक्या माणसाला खोटी आशा लावतो, मोठी स्वप्ने दाखवतो,
• नुसती कल्पना केल्याने वस्तुंची निर्मिती करता येते का?
• विचारांमध्ये ताकत असेल तर प्रत्येक जण हवे ते, का आकर्षित करु शकत नाही?
• खरोखर विचारांनिशी बदल घडु लागले तर ह्या सृष्टीत किती गोंधळ उडाला असता?
• विचारांनी सर्वकाही शक्य आहे तर मग, लोक नुसता विचार करुन, विचार करुन करुन पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यांचे भाव नियंत्रित का करु शकत नाहीत?
• आयातदार लोकांना रुपया वरचढ हवा, तर निर्यातदार लोकांना रुपया जास्तीत जास्त खाली पडलेला हवा, दोघांनी तीव्र इच्छा केल्या, तर मग कोणाचे खरे होईल?
• द सिक्रेट मध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन खरा आहे का? का पुर्णपणे फेकाफेकी आहे? का पुस्तके, मुव्ही सुपरहीट करण्यासाठी वापरलेली चलाख खेळी आहे?
• लॉ ऑफ अट्रेक्शन वर प्रवचन देणारे, आपले यशाचे ढोल वाजवतात, मग ते हा सिद्धांत वापरुन मिळालेल्या प्रत्येक अपयशाबद्द्ल का बोलत नाहीत?
• गौतम बुद्ध म्हणतात, ‘इच्छा’ सर्व दुःखाचे मुळ आहे, मग आकर्षणाचा सिद्धांत तीव्र इच्छांना जन्म देऊन, दिवसेंदिवस, दुःखे वाढवत नाही का?
• गीतेमध्ये भगवान सांगतात, ‘कर्म कर, फळाची इच्छा करु नकोस’, मग फक्त फळाच्या आसक्तीवरच भर देणारा हा सिद्धांत, प्रत्यक्ष भगवंतनी गायलेल्या गीतेच्या विचारांना छेद देत नाही का?
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------
आधी ‘द सिक्रेट’ वर मी माझं मत सांगतो,
द सिक्रेट मध्ये जे सांगितलेलं आहे, Ask, Believe, Receipt ते खरं ही नाही, पुर्णपणे खोटंही नाही,
ते ‘अर्धसत्य’ आहे.
फक्त कल्पना करुन आयूष्याची वस्तुस्थिती बदलत नाही. ह्या साखळीमध्ये एक महत्वाचा शब्द मिसिंग आहे. Action!
अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर मला ‘लॉ ऑफ अट्रेक्शन’ चा एक नवाच अर्थ गवसला.
• प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येण्याआधी कल्पनेत जन्म घेते.
• आकर्षणाचा नियम वापरुन आपल्या आयुष्याची ‘ब्लु प्रिंट’ बनवु शकतो. ती जितकी दर्जेदार, तितकी आयुष्याची इमारत भव्य, दिव्य, देखणी!
• ‘आकर्षणाचा सिद्धांत’ म्हणजे विचारांना आपल्या बाजुने वळवणं आहे.
• हा ‘लॉ’ माणसाला ‘आळशी’ बनवत नाही, उलट अधिक झपाटुन काम करण्यासाठी प्रेरणा देतो.
• हा ‘लॉ’ माणसाला स्वतःला, स्वतःशी स्पष्टपणे बोलायला शिकवतो.
• प्रत्येक अपयश ही प्रत्येक नवी संधी आहे.
• दुःख उगाळत बसण्यापेक्षा आम्हाला यश साजरे करायला आवडते, तर निराशवादी लोकांच्या पोटात का दुखावे?
• इच्छा पुर्ण झाल्या नाही तर हा लॉ मला दुःखी बनवत नाही, उलट येणाऱ्या उद्यासाठी अधिक उत्साहाने, ‘प्रार्थना’ आणि ‘श्रद्धा’ करायला शिकवतो.
• गीता वाचणारा माणुस भगवंतावर अतूट विश्वास ठेवतो, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनही ‘विश्वास’ ह्या एकाच अतिमहत्वाच्या शब्दावर टिकुन आहे. ही दोघांमधली समानता पुरेशी आहे.
• स्वामी विवेकानंदांच्या भाषेत, उतिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत, म्हणजे, उठ, जागा हो, आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत स्वतःला झोकुन दे, हा प्रयत्नवाद मला प्रचंड आवडतो,
• निश्चित ध्येयाने, ‘आफलोदयकर्मणात’ म्हणजे इच्छित फळ मिळेपर्यंत, दृढपणे, काम करत रहा, असे सांगणारी आपली संस्कृती आहे.
भगवतगीतेमध्ये कृष्ण भगवान सांगतात, माझ्या भक्तांचा विनाश होत नाही!
नेमकं लॉ ऑफ अट्रेक्शनमध्ये सामावलेला हाच जिवंत आशावाद मला खुप भावतो, साद घालतो, आवडतो.
ज्याला संशय आहे त्यांनी आक्षेप घेत रहावेत पण एक मात्र मला इतकं कळुन चुकलं आहे,
निराश होऊन, रडत पडत, नशीबाला दोष देत जगण्याऱ्यांपेक्षा, ‘खोटा असेल तर खोटा’ पण ‘आशेचा किरण’ ह्रद्यात बाळगत जगणारे आशावादी लोक,
हे ‘निराशावादी’, ‘रडक्या’ आणि ‘संशयवादी’ लोकांपेक्षा लाखो पटींनी चांगले आहेत.
कुठल्याही परिस्थितीत हसत खेळत आनंदी राहणारे, आणि कितीदाही अपयश आलं तरी जिद्दीने गरुडभरारी घेणारे, लोकच जगाला हवेहवेसे वाटतात,
इतिहास काढुन बघा, असे लोकच जगावर राज्य करतात,
आणि हे एक ओपन सिक्रेट आहे.
लॉ ऑफ अट्रॅक्शन एक हजार एक टक्के खरा आहे, आणि हा योगायोग नाही, थोतांड नाही,
लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरुन आनंदाने आणि उत्साहाने जगणारे माझे शेकडो मित्र याला पुरावा आहेत,
आपल्या सर्वांना आकर्षणाच्या सिद्धांताची नेमकी उकल व्हावी, समज यावी, या एकाच मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..
No comments:
Post a Comment