🌷 श्री स्वामी समर्थ🌷
1). दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला दूध, काळी तीळ,हळद,पाणी असे एकत्र करून अर्पण करावे.असे एकूण ४० दिवस करावे.
2) जल अर्पण करताना पितरांचे नाव घ्यावे.
3) प्रत्येक अमावस्येला अमावस्या सुरू झाल्यावर भगवान विष्णु दर्शनानंतर आपापले पितर आपल्या कुटुंबीयांचे हाल हवाला घेण्यासाठी आपल्या कुटुंबियांच्या,नातेवाईकांच्या घराच्या दरवाज्यासमोर सकाळ पासून आलेले असतात.त्यामुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून अगरबत्ती लावून नमस्कार करून त्या दिवशी व रोज पितृ तुष्टी कारक पितृ स्तोत्र वाचन, बाह्य शांती सुक्त याचे हवन करावे... व वर नमूद केलेले जल पिंपळाला अर्पण करावे..तसेच त्यादिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत जेवण न करता दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान हिरण्या दान श्राद्ध करावे......जर अमावस्येच्या दिवशी आपण पितरा साठी वाचन ,हवन किंवा काहीही न केल्यास ते संध्याकाळ पर्यन्त उभे असतात व सायंकाळी अत्यंत निराश भावनेने आपल्याला व आपल्या कुटुंबियांवर नाराजगी व्यक्त करून कुठलाही आशिर्वाद न देता निघून जातात.
4) तसेच दर शनिवारी वरील एकत्र जलासह गूळ सुद्धा पिंपळाला अर्पण करावा. कारण गूळ हा ब्रम्ह देवाला अती.प्रिय आहे. तसेच दररोज सायंकाळी पिंपळाच्या झाडाला तीळ तेलाने दिवा लावावा .पांढरी तीळ विष्णूंना प्रिय आहे.
5) प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्या कुळातील समस्त ४२ पिढीतील पितर हे पिंपळाच्या झाडाजवळ भगवान विष्णूच्या दर्शनासाठी एकत्र जमलेले असतात. त्यामुळे दर अमावस्येला वरील जल सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे.
6) तसेच प्रत्येक शनिवारी पवनपुत्र हनुमान व शनिदेव हे देखील पिंपळाच्या झाडाजवळ विष्णू दर्शनासाठी आलेले असतात.
7) मंगळवार,शुक्रवार, व रविवार या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये ...जल अर्पण केलेले चालते ..पण हात लावून स्पर्श करू नये.
8) तसेच पितरांच्या ऋण मुक्तीसाठी त्र्यंबकेश्वर येथे असलेले लक्ष्मी नारायण चौकातील ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिरात जावून हातात तूरडाळ घेऊन ओली करून भगवान शंकराचे पिंडीवर अर्पण करावी व ऋण मुक्तीसाठी प्रार्थना करावी
No comments:
Post a Comment