म्हातारपणाला नांव छान
कोणी म्हणतं संन्यासाश्रम
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम
मी म्हणतो आनंदाश्रम....
म्हातारपणात कसं राहायचं
घरात असेल तर आश्रमासारखं
आश्रमात असेल तर
घरासारखं...
कशातच कुठे गुंतायचं नसतं
जुन्या आठवणी काढायच्या नाही
"आमच्या वेळी" म्हणायचं नाही
अपमान झाला समजायचं नाही
उगाच लांबण लावायचे नाही...
सुखाची भट्टी जमवत जायचं
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं
राग लोभाला लांब पळवायचं
आनंद सारखा वाटत जायचं...
म्हातारपण सुद्धा छान असतं
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं
नव्या दातांनी सहज चावता येतं
कान यंत्राने ऐकु येतं...
पार्कात जाऊन फिरुन यावं
क्लबात जाऊन पत्ते कुटावं
देवळात जाऊन भजन करावं
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं
मुलांसमोर गप्प बसावं
नातवंडांशी खेळत रहावं
बायकोबरोबर भांडत जावं
मित्रांबरोबर बोलत सुटावं...
जमेल तेव्हां टूर वर जावं
बायकोचं लगेज सोबत न्यावं
दिलखुलास फिरून घ्यावं
थकलं तिथेच बसून राहावं
लायन रोटरी अटेण्ड करावं
वेळ असेल तर गाण गावं
एकांतात ठेक्यावर नाचुन घ्यावं
पाहिलं कुणी, व्यायाम म्हणावं...
कंटाळा आला झोपुन जावं
जाग आली फेसबुक बघावं
बघता बघता घोरत राहावं
टोकलं कोणी व्हाट्सऍप उघडावं...
एकटं घरी किचन पहावं
दुधाची साय गायब करावं
मुलांचा खाऊ टेस्ट करावं
आलं मनात गोडाचं खावं...
जुना शर्ट घालत राहावं
थोडे केस सावरत राहावं
आरशालाच बोगस म्हणावं
कोणी नसलं तर वाकूली करावं...
छान रंगवावी सुरांची मैफल
मस्त जमवावी जेवणाची पंगत
सुरेल जुळवावी गप्पांची संगत
लुटत रहावी जगण्याची गम्मत...
स्वाद घेत, दाद देत
तृप्त मनानं आनंद घेत
हळुच आपण असं निघुन जावं
जसं पिकलं पान गळुन पडावं ..
No comments:
Post a Comment