Wednesday, July 27, 2022

 सुरेख मेसेज - का कुणास ठाऊक , पण व.पु. यांचाच असावा असे वाटते. थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.


" शुभ्र दही पाहिलं ... 
की तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो.

पण चमचा बुडवला,
की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार,
हे ठरलेलं !

पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?

At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.

अजून काही दिवस तसंच ठेवलं,
तर खराब होऊन जाईल.

मग उपयोग काय त्या
perfectly set झालेल्या दह्याचा ?

मनात विचार आला,
आयुष्याचंही असंच असतं ... नाही का ?

दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य
नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं
तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल.
.... वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज,
आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !

दिवसभर ते दही वेगवेगळ्या
form मध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून,
तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत,
तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा ...
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत
वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
*पूर्ण दही संपवायच्या आधी,रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !*

'उद्याचं' दही लावायला !

मग रात्री झोपण्यापूर्वी,
दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.

*मला ठाऊक आहे ... रोज ही भट्टी जमेलच असं नाही.*
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

*मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली... तरी त्यात कमीपणा नसतो.*

पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !

*आयुष्य कसं ' चवीनं ' जगायचं*
*शुभप्रभात* 🙏🏻🙏🏻
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

एक पत्र पत्रालाच....

 # जागतिक पत्र दिवसाच्या निमित्ताने, एक पत्र पत्रालाच....


प्रिय पत्रा

कसा आहेस रे? किती दिवसांत नव्हे वर्षांतच आपला काही संवादच नाही. कुठे असतोस हल्ली? आता तुला लिहून झाल्यावर पत्ता लिहावा लागेल म्हणून शोधत होते तुझा पत्ता. त्या निमित्ताने जुनं काय काय बघितलं गेलं. पत्त्यांच्या डायऱ्या. तुला माहितेय हल्ली कोणी असे पत्ते वगैरे लिहून ठेवतंच नाही. आमची निळी डायरी आठवतेय? शाईच्या रंगाची. आत किती पत्ते. माझ्या आईनं टिपलेले तिच्या सुंदर आणि सुवाच्य अक्षरात. अरे तुला माहितेय का? हल्ली कोणी हाती काही लिहितंच नाही बघ. मग होतात चुका शुद्धलेखनाच्या. अगदी भल्या भल्यांच्या. आता मराठीत कधी ह्रस्व कि असतो होय रे आणि हृस्व तु पण. हल्ली कित्येकदा येतो भेटीस. बरं असं म्हटलं की ऑटो करेक्ट झालं असेल ग,असं म्हणतात. तुला कळते का रे ही नवीन भाषा? इंटरनेटची वेगळी. फेसबुकची वेगळी. किती आणि काय काय सांगायचं आहेच तुला. पण तुझा पत्ता कुठे आणि कसा मिळेल रे मला?

पत्रा, मागे किती चैन होती नाही रे तुझी? कोण कोण लोकं लिहितं नाहीत तुला? काय तो तुझा तोरा! काय ती ऐट! आता बदललं नाही सगळं. तुला आठवतात का रे ते दिवस? तुझ्या तरुणपणाचा काळ तो...अहाहा!! किती रम्य होता नाही? कोणी कोणी म्हणे रक्तानं लिहितं. बाई गं. कसं नाही एकेकाचं धारिष्ट्य. ऐकावं ते नवलंच. आठवतं का रे तुला तुझं बालपण? चिठ्ठी चिठ्ठी खेळायचात म्हणे. छोट्याशा कागदावर लिहिलेली. बरेचदा शाळेत. वहीचा मागचा कागद टरकावून. दोन तीन ओळींची असे नाही. बालपण असं छोटंच असतं नाही. कधी होतं सुरु आणि कधी संपतं...कळतंच नाही. सरूनच जात एकदम. तुझं पण असंच झालं असेल, नाही का?

पण काही म्हण पत्रा, खरा मस्त काळ होता तुझ्या तारुण्याचाच... किती साजरा.मस्त. स्वच्छंदी. मनमौजी दिवस होते ते तुझे. आठवतं असतील नाही तुला? ते गुलाबी, मऊशार, रेशमी कागद. कागद कसले. प्रेयसीचे हातच जणू. किती तलम. मुलायम. आणि किती अलवार. त्यावर कळेल न कळेल असं उडवलेलं उंची अत्तरं. खसचं असे का रे? कधी गुलाबाच्या पाकळ्या. कधी सुकलेला चाफा. पण अजून दरवळणारा. काय आणि किती. एकूण भारी ऐश केलीस बेट्या तरुणपणात. मग तुला ते असं हृदयाशी गच्च कवटाळून धरणं. कधी उशीखाली दडवणं. कधी तुझी पारायणं करणं. कधी ते पत्रांतूनच भेटणं. कुठं, कुठं गेलं रे ते सगळं. ए गड्या, एक तू काय दिसेनासा झालास आणि बघ नां काय, काय आणि किती एकदम सूटूनच गेलं रे हातातून. त्या कविता. त्या आणाभाका. त्या शपथा. ती आर्जवं. ती प्रीतीची कहाणी. ती कोणी कोणाला लिहिलेली गाणी. ती वाऱ्यावरची विराणी.....ठेवलं आहेस ना रे जपून सगळं? अजूनही.... ठेवलंच असशील.

ए वेड्या. असं डोळ्यांत पाणी रे कशाला आणतोस. तुझी मुलंबाळं, नातवंडं नाव नेताहेत रे तुझं पुढं. तसं चांगलं काम करताहेत तीही. अरे आणि किती जलद. लिहिलं की पाठवलं. लगेच ह्या हृदयीचे त्या हृदयी... भावना पोचतेच रे. आणि इतकं काही बदललं नाही रे. प्रेम अजून तसंच आहे. अधीर. गहिरं. सर्वसाक्षी. अजूनही करतात लोकं. उधळून जाणारं प्रेम. तुझं नावं काढतं. कधी तुलाच साक्ष ठेवून. कधी ज्यांनी तुला अमर केलं त्यांना आदर्श मानत. आजही आहेतंच अनेक अमृता. आणि त्यांचा इमरोज. तू नसलास म्हणून काय रे झालं, पत्रा? तुझ्या नातवंडांच्या मदतीने पोचवलंच जातं बरंच काही. शेवटी दिल, दोस्ती आणि दुनियादारी कोणाला चुकलेय, सोन्या. तेव्हा आता उगाच इतक्या सुंदर दिवशी डोळ्यांतून झरायचं नाही. डोळयांनी तर बोलायचं असतं जे पत्रांतून थेट लिहिता येतं नाही.

चल, बघता बघता किती लांबलं हे माझं पत्र पण...पत्ता पण मिळाला बघ तुझा. म्हटलं नव्हतं तुला बदलतं काहीच नाही. एक काळ सोडून.....तेव्हा उलट टपाली एक मोठ्ठ पत्र लिही. वाट बघतेय बरं का?

तुझी

प्राची 

© प्राची बापट

*!!••चिं•त•न••!!*

 🌼🌼✍🏻📖 *!!••चिं•त•न••!!* 📖✍🏻🌼🌼


मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे
पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी *त्या व्यक्ती ला विसरू नये कारण देव स्वतः भेटू शकत नाही मदत करू शकत नाही म्हणून अश्या व्यक्ती ला पाठवतो* आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील..

 *पाँच तत्व का कोड है भगवान*    

       *जिससे यह ब्रह्माण्ड बना*
         
          *भ + ग + व + आ + न*

    *भूमि (धरती), गगन (आकाश),*
       *वायु (हवा), अग्नि (आग),*
                  *नीर (पानी)*

          *क्या अब भी कोई है*
      *जिसने भगवान को देखा*
          *अथवा जाना नही..?*

 *अब अपने अन्दर झांक कर देखिये*
       *भगवान नज़र भी आएंगे* 
         *और महसूस भी होंगे*

                  🙏हरि ॐ🙏
       🌹आपका दिन शुभ हो🌹

🔆 *बहुत सुन्दर शब्द जो एक मंदिर के दरवाज़े पर लिखे थे*

❝ सेवा करनी है तो - *घड़ी मत देखो* ❞
❝ प्रसाद लेना है तो - *स्वाद मत देखो* ❞
❝ सत्संग सुनाना है तो - *जगह मत देखो*❞
❝ बिनती करनी है तो - *स्वार्थ मत देखो* ❞
❝ समर्पण करना है तो - *खर्चा मत देखो* ❞
❝ रहमत देखनी है तो - *जरूरत मत देखो*
----------------‐‐‐----‐‐--------------------------
    💐💐💐 सुप्रभात 💐💐💐
---------------------------------------------------

अक्कलकोट स्वामी स्तोत्र

 *🌹संस्कारदीप स्तोत्र मालिका🌹*



ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: |
ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १||
नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २||
नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी त्या पवित्र पायां | चित्तशुध्दी जाहली || ३||
थोर ॠषिमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयांसी नमन | ग्रंथरचना आरंभिली ||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां | स्तोत्र महात्म्य तुमचे गावया | प्रारंभ आता करतो मी || ५||
नांव गांव खुद्द स्वामींचे | किंवा त्यांच्या मातापित्यांचे | कोणालाच ठाऊक नाही साचें | अंदाज मात्र अनेक || ६||
त्यांच्या जन्मासंबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें | तीच सत्य मानुनी प्रत्येकाने | समाधान मानावे || ७ ||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं | स्वामी प्रगटले वारुळांतुनी | लाकुडतोड्याच्या निमित्ताने || ८ ||
कुर्‍हाडीचा घाव बसून, त्याचा राहिला कायमचा वण | आगळी ती अवतार खूण | प्रत्यक्ष पाहीली सर्वांनी || ९ ||
एका भक्तानें केला प्रश्न, स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिलें उत्तर छान | स्वमुखेंच समर्थानी || १० ||
मी यजुवेदी ब्राम्हण | माझे नांव नृसिंहभान | काश्यप गोत्र राशी मीन | ऐसें स्वामी म्हणाले ||११ ||
खरें खोटें देव जाणे | बरें नाही खोलांत शिरणें | ईश्ववरी करणीची कारणें | आपण काय शोधावी || १२ ||
दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण | सकळं भूप्रदेश केला पावन | आपुल्या चरणस्पर्शाने || १३ ||
नंतर स्वामी निघाले तिथून | तीर्थयात्रेसी केले प्रयाण | दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरुनी पाहिलें || १४ ||
दत्तवास्तव्य जेथे निरंतर | तो थोर पर्वत गिरनार | तेथेच गेले अगोदर | नंतर फिरले इतरत्र || १५ ||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले | तेथे थोडे दिवस राहिले | दामाजीच्या गांवात || १६ ||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला | जनसमुदाय भजनीं लागला | साक्षात्कारी यतीच्या || १७ ||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या || १८ ||
तेजःपुंज शरीर गोमटें, सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपिन छोटे | दिगंबर असती अनेकदां || १९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे | तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||
पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||
तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार | अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||
अक्कलकोटी नित्य राहूनी | अगाध गूढ लीला करूनी | भक्तांसी साक्षात्कार देऊनी | गुप्त झाले अनेकदा || २३ ||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना | शेवटी कराया क्षमायाचना | लागले स्वामी चरणांसी || २४ ||
स्वामी सर्वसाक्षी उदार | साक्षात दत्ताचे अवतार | कधी सौम्य कधी उग्रतर | स्वरुप दाविलें दासांना || २५ ||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली | पुण्यराशी मिळाल्या || २६ ||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद | झाल्याविण कृपाप्रसाद | अर्थ त्याचा समजेना || २७ ||
स्वामींचे बोलणे थोडें | जणूं काय कठीण कोडें | अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें || २८ ||
जाणणारे तेच जाणिती | घेती त्यांच्या संकेताची प्रचिती | ज्याचा तोच उमजे चित्तीं | इतरां अर्थबोध होईना || २९ ||
कोणाकोणाला पादुका दिधल्या | कोणाला वाहिल्या लाखोल्या | कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहाणाही || ३० ||
ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणें | स्वामीनी दिले भरपूर देणें | कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवनदानही दिलें त्यांनी || ३१ ||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार | अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा || ३२ ||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह्य ब्रम्ह्यज्ञानी | म्हणूनच हव्या त्या ठिकाणी | दर्शन दिधलें भक्ताना || ३३ ||
न सांगता सर्व जाणिले | ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें | लोण्याहुनी मृदु ह्रदय द्रवलें | दु:खी कष्टी जीवांसाठी || ३४ ||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उध्दार | सदुपदेश दिक्षा देऊनी || ३५ ||
स्वामीराया दत्तात्रेया | तुमच्या कृपेची असावी छाया | हीच प्रार्थना तुमच्या पायां | मागणे नाही आणखी || ३६ ||
मजवरी होता कृपादृष्टी | दत्तमय भासेल सर्व सृष्टी | सुखसंपत्तीची होईल वृष्टी | सकल सिध्दी लाभती || ३७ ||
ऐसी श्रध्दा माझे मनी | उपजली आहे आतां म्हणुनीं | मिठी घातली तव चरणीं | धाव पाव समर्था तूं || ३८ ||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा | ओळखुनी माझ्या भोळ्या भावा | वरदहस्त ठेवा मस्तकीं || ३९
संसार तापें पोळलों भारी, दूर करा ही दु:खे सारी | तुमच्यावीण माझा कैवारी | अन्य कोणी दिसेना || ४० ||
तुमचे पाय माझी काशी | पंढरपूर सर्व तीर्थे तशी | आहेत तुमच्या चरणांपाशी | मग यात्रेस जाऊ कशाला || ४१ ||
अक्कल्कोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं | ब्रम्हा विष्णू शिवधामी | सर्व भक्ती पोंचते || ४२ ||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||
पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||
भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||
वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||
स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||
बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती || ४८ ||
जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें || ४९ ||
पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||
शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||
बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले निमग्न || ५२ ||
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||
ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना || ५५ ||
गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी || ५६ ||
चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें || ५७ ||
अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||
याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||
नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||
जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी || ६१ ||
अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला || ६२ ||
व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी || ६३ ||
सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख | अंती सदगति लाभावी || ६५ ||
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे || ६६ ||
तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना || ६७ ||
मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||
वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||
शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||
स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत | इच्छा सफल होईल || ७१ ||
माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||
एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||
या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही || ७४ ||
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )
|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||
 

घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी ह्यासाठी उपाय


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

१. दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वछ करून घ्यावे. घरातील फारशी रोज पुसावी , आणि फारशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
२. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
३. रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात
लक्ष्मीची पावले , स्वस्तिक किंवा जय श्री राम लिहून रांगोळी काढावी.
🌺🌺🌺🌺🌺🌺
४. दर १५ दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर २ महिन्याने धुवून घ्यावेत. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
५. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा , घर सतत बंदिस्त ठेवू नये. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
६. दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी. रोज किमान १ माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःला हि लावून घ्यावे. भीमसेनी कपूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान १५ मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील ह्याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलाच व्हावं ह्यासाठी प्रार्थना करावी. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
७. दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी , तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप
ठेवण्यासाठी प्रार्थना करावी.   
🌺🌺🌺🌺🌺🌺
८. दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे , भांडणे , नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा TV वर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
९. घरामधे कुठेही कचरा , धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे ,घरात नाही. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१०. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा कि घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
११. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१२. आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१३. घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१४. दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे. त्यातील एक १०० रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी. ६ महिन्यांनी ह्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे. दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदा. मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील ह्याची काळजी घ्यावी. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१५. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू , किराणा, धान्य हे किमान ७ दिवसाचे , १५ दिवसाचे किंवा १ महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे , आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१६. घरामध्ये तुटलेले फर्निचर , चपला , बंद पडलेले घड्याळ , भंग पावलेल्या मूर्ती , रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वछ ठेवावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१७. घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१८. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे "शौचालय , बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी . दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
१९. घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे , उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो. त्यामुळे सतत वाद होणार नाहीत हि काळजी घ्यावी. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
२०. घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत, कुलधर्म कुलाचार करत राहावा. 
🌺🌺🌺🌺🌺🌺
वरील टिप्स आवडल्या असतील तर कृपया इतरांना शेयर करा.

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...