Wednesday, July 27, 2022

 सुरेख मेसेज - का कुणास ठाऊक , पण व.पु. यांचाच असावा असे वाटते. थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.


" शुभ्र दही पाहिलं ... 
की तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो.

पण चमचा बुडवला,
की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार,
हे ठरलेलं !

पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?

At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.

अजून काही दिवस तसंच ठेवलं,
तर खराब होऊन जाईल.

मग उपयोग काय त्या
perfectly set झालेल्या दह्याचा ?

मनात विचार आला,
आयुष्याचंही असंच असतं ... नाही का ?

दह्यासारखं 'set' झालेलं आयुष्य
नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं
तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल.
.... वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज,
आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच !
आयुष्य जगायला तर हवंच !

दिवसभर ते दही वेगवेगळ्या
form मध्ये अनुभवायचं !
कधी साखर घालून,
तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत,
तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत !
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून !
मला ना, ह्या ताकाचा ...
हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला
तर आयुष्य पांचटच होतं !
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत
वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा !
*पूर्ण दही संपवायच्या आधी,रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं !*

'उद्याचं' दही लावायला !

मग रात्री झोपण्यापूर्वी,
दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.

*मला ठाऊक आहे ... रोज ही भट्टी जमेलच असं नाही.*
पण नासलंच समजा कधी,
कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

*मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली... तरी त्यात कमीपणा नसतो.*

पण 'दही' मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं !

*आयुष्य कसं ' चवीनं ' जगायचं*
*शुभप्रभात* 🙏🏻🙏🏻
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...