Sunday, June 26, 2022

*बाळाला सर्दी झाल्यावर वाफ देऊ शकतात पण . . . .*

बाळाला सर्वात मोठी कोणती समस्या येत असेल तर ती म्हणजे सर्दी आणि खोकला. आणि आता हिवाळा सुरु असल्याने तर आता सर्वच आई ह्या बाळाच्या सर्दी आणि खोकल्यावर चिंतीत असतात. आणि त्यासाठी बरेच उपाय करतात पण बाळ लहान असल्याने त्यांना सर्वच उपचार बाळाला देता येत नाही. तेव्हा बाळाला श्वासाद्वारे वाफ दिली जाते आणि वाफेद्वारा बाळाचे बंद झालेलं नाक उघडता येते. आणि सर्दीमधे बाळाचे नाकच बंद होऊन जाते. तेव्हा वाफद्वारे बाळाचे नाकं कसे उघडता येईल. कारण श्वास द्वारा वाफ घेण्यामुळे नाकं हळूहळू उघडायला व सर्दीवर उपचार होऊन जातो.


१) बाळाच्या जन्मानंतर दोन वर्षापर्यँत तान्ह्याला ९ ते ११ वेळा सर्दी -खोकला होत असतो. आणि नाक बंदच होऊन जाते. आणि त्याचवेळेस आपण गरम वाफ घेतल्यावर बाळाच्या नाकामध्ये जमलेले श्लेष्मा ढिले होऊन निघायला मदत मिळते. त्यातून बाळाचा श्वास घेण्याचा मार्ग खुला होऊन जात असतो.

२) सर्दी, साइनसाइटिस वरती हा नैसर्गिक उपाय आहे. ह्या उपायामुळे बाळ आरामाने झोपत असतो. आणि त्याला आराम मिळून झोपही चांगली लागत असते. आणि काही डॉक्टर मानतात की, ह्या पद्दतीने बाळ लवकर बरे होऊन जात असते.

*वाफ देण्याच्या वेळी काही गोष्टी लक्षात घ्या*
३) वाफ देताना बाळ खूप लहान असेल तर वाफ देऊ नका. कारण काही माता बाळ खूप तान्हा आहे तरीही वाफ देऊन टाकता. मान्य आहे की, त्यांना बाळ लवकर बरे करायचे असते पण खूप तान्ह्या बाळाचे शरीर खूप संवेदनशील असते. त्याला वाफेतून चटका लागू शकतो. वाफ देण्याच्या अगोदर डॉक्टरांना त्याचे वय आणि त्वचा किती संवेदनशील आहे. हे बघूनच वाफ द्या. नाहीतर तुमच्या बाळाला चटका लागेल. म्हणून ह्यात डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य माना.

४) वाफ देण्यासाठी आता तशी उपकरण आहेत. आणि तुम्ही बंद बाथरूममध्येही बाळाला वाफ देऊ शकता. तसे उपाय आहेत. पण जर ती तुम्हाला व्यवस्थित देता आली नाही तर बाळाला इजा होऊ शकते म्हणून काळजीपूर्वक करा.

आणि जर तुमच्याकडे वाफ देण्याचे उपकरण जरी असेल तर वापरताना खूप दक्षता घ्या. बेफिकिर करून तान्ह्याला चटका लागेल अशा चुका करू नका.

५) बाळाला १ वर्ष झाल्यावर जर घरगुती वाफ देत असाल तर कोमट पाणी एका कटोऱ्यात घ्या. आणि बाळाला मांडीवर घेऊन. त्याची पाठीवर व छातीवर कपड्याने मालिश करा. त्याला आराम मिळेल.पाणी कोमटच घ्या.

६) आणि जर बाळाला वाफ देता येत नसेल किंवा तो घाबरत असेल त्याला देता येत नसेल तर डॉक्टरांना औषध विचारून घ्या.

आणि व्हेपर रब (विक्स) वापरू नका. बाळाला तर बिलकुल लावू नका. खूप डॉक्टर त्याला विरोध करतात.

आणि वाफ देताना चटका लागणार नाही ह्याची दक्षता घ्या. खूप लहान बाळाला घरी वाफ देऊ नका. डॉक्टरांकडेच वाफ द्या. 
*आरोग्य ग्रुप*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...