Wednesday, June 29, 2022

केशर*

   *आजचा विषय केशर*


*कुङकुम, रुधिर, संकोच (संस्कृत), केस (हिंदी, गुजराती), कुमकुम (बंगाली), जाफरान (फारसी) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या केशराचे मूळस्थान काश्मीर, इराण, स्पेन यापैकी कोणते याबाबत तज्ज्ञांत मतभेद आहेत. आशिया खंड, स्पेन, इजिप्त, ग्रीस, तुर्कस्थान येथे मोठया प्रमाणावर लागवड होते. भारतात काश्मीर येथे मोठया प्रमाणात लागवड होते. काश्मिरी केशरापेक्षा स्पॅनिश केशराला खवय्ये अधिक पसंती देतात. बाजारामध्ये ‘जाफरानी केशर’ या नावाने मिळणाऱ्या केशरला खूप मागणी असते. ज्या फुलापासून केशराची निर्मिती केली जाते त्या फुलांचा रंग फिकट जांभळा असतो. एका फुलापासून केवळ तीनच केशर काढले जातात. १ किलो केशराची निर्मिती करायची झाल्यास साधारणत: ३ लाख फुलांची आवश्यकता असते. उत्पादनाच्या अल्पतेमुळे बाजारात केशराची किंमत अधिक असते. त्यामुळे ब-याचदा केशरात भेसळदेखील केली जाते.* 

*नाकातून रक्त वाहत असल्यास चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्याने रक्त येणे ताबडतोब बंद होते.*

*लहान मुलांना सर्दी होत असल्यास केशराचं दूध प्यायला दिल्याने त्वरित आराम पडतो.*

*केशर पचनक्रिया सुधारते तसंच गॅस आणि अॅ सिडिटी यासारख्या विकारांवरही उपयुक्त ठरते.*

*अतिसार होत असल्यास केशर, आंब्याची कोय, जायफळ आणि सुंठ यांचं मिश्रण लावल्यानं आराम पडतो.*

*महिलांसाठी केशर अतिशय फायदेशीर आहे. मासिक पाळीची अनियमितता, त्या दरम्यानची पोटदुखी, गर्भाशयाला सूज आदी विकारांवर अतिशय गुणकारी आहे.*

*हिस्टेरियासारख्या आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील केशर फायदेशीर ठरतं.*

*खरचटल्यावर किंवा जखम झाल्यामुळे त्वचा निघाल्यास केशराचा लेप लावल्यावर त्वचा लवकर येते.*

*दुधाबरोबर केशराचे सेवन केल्यामुळे शारीरिक शक्ती वाढते. निद्रानाशाची समस्या असलेल्यांनी केशरयुक्त दुधाचं सेवन केल्यास हा त्रास कमी होतो.*

*केशरातील क्रोसीन या स्वादकारक घटकामुळे ताप उतरण्यासही मदत होते. केशराचा सगळ्या महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्या नियमित सेवनाने मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या तक्रारी यामुळे दूर होतात.*

*स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यासही केशर उपयुक्त ठरते. हिरडयांची सूज, जीभ किंवा मुखातील समस्यांवरही हे अतिशय उपयुक्त ठरते.*

*संजीव वेलणकर पुणे.*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...