निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥
जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळही ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ॥२॥
उगाची भितोसी भय हे पळू दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥
खरा होई जागा श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हाथ ॥४॥
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडती तया स्वामी जया घेई हाती ॥५॥
No comments:
Post a Comment