Saturday, June 11, 2022

देवपुजे मागील शास्त्

 *🚩🛕देवपुजे मागील शास्त्र समजून घेऊया..मग ती घरातल्या देवाऱ्यातली असो किंवा घरच्या आपल्या कुलदेवतेची पूजेची.....🌺


देवाची जी पुजा केली जाते त्यात देवाला खुष करणे हा उद्देश असला तरी गंध,
अक्षता,फुले,धुप,दिप,अगरबत्ती याने पुजा करण्यामागे शास्त्र आहे.
माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खुष करण्याचा प्रश्नच येत नाही.
भक्ति मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचा देवाबद्दल भाव निर्माण करतात शास्त्रोक्त पुजा 
केल्याने आपली भाव वृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते.
आपण नित्य पुजेत वापरणारे घटक,पुजेच्या दृष्टीने त्यांचे महत्व आपण या लेखात जाणुन घेणार आहोत....

*🌸ज्यांना आवड असणाऱ्यांनी सवडीनुसार नक्की वाचा..🌸*

*🌹-स्नान-* 🌹:-
सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो.आणि घ्यावा...
देवाऱ्यात-देवाऱ्याच्यावर धुळ जाळे नसावी,शक्यतो त्यासाठी एक ब्रश व कपडा कायमस्वरूपी ठेवावा.
देवाऱ्यावर कोणतेही पुस्तके, किंवा जड वस्तू ठेऊ नये.
म्हणजे देवावर तुम्ही भार ठेवता.
  मग आपल्यावर नकळत भार होतो.
       त्यामुळे देवघरातुन सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते.
आपण पुजत असलेल्या देवतांच्या मुर्तित पवित्र लहरी याव्यात,मुर्तिवर चढलेली रजतमांची अपवीत्र लहरीची पुट काढुन टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे.
*(काही लोकं आठदिवसांनी घालतात)*
आणि आम्ही रोज संतूर साबणाने आंघोळी करतो.
देवांना स्नान घालतांना देवाचे स्नान सन्मानाने घालावे.
मुर्ती आपटा-आपट करुन देवाची स्नान घालू नये.
देवाची मुर्ती,घंटी ईतर वस्तू खाली पडू देता कामा नये.
नंतर स्वच्छ कपड्याने पुसुन देवाऱ्यात ठेवावे.

*🌺-गंध-🌺* :-
*( चंदन🪵)* सर्व देवता गंधानुगामी असतात.
म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात.
देवतानी आपल्या पुजेतील मुर्तित आकर्षित होऊन रहावे यासाठी देवताना चंदन लावतात.

*🌸-अक्षता-🌸* :-
न तुटलेले तांदुळ म्हणजे अक्षता.*(शक्यतो आख्खे असावे)*
देवाना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ति त्या अक्षतांकडे
आकर्षित होते.
वाहीलेल्या अक्षतांमध्ये त्या देवांची कंपने निर्माण होतात.
गणेश मुर्ति,कलश,अथवा कोणत्या ही देवतांची मुर्ति ठेवताना मुर्ति खाली तांदुळ ठेवतात.
त्या तांदळात देवांची कंपन शक्ति येते.
तांदूळ हे देवांना दिलेले आसन. हे तांदुळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात किंवा खिर बनवून खाल्ल्यास ती शक्ति आपल्यालाही मिळते.

*🌺-फुले-🌺* :-
विशिष्ठ रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात.
*🌸-ऊदा-.🌸* गणपतीला लाल रंगाकडे आणि फुल प्रिय,शंकराला सफेद रंगाकडे फुल प्रिय,विष्णुला पिवळा रंग आणि फुल प्रिय.
*-ईतर-...* कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणुन कोमजलेली फुले देवाला वाहु नये. 
किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत देवांची फुले,हार काढून नवीन चढवा.
देवाची फुले हार ही नदीच्या पात्रात,समुद्रात,सोडावे किंवा वड पिंपळाच्या झाडा खाली ठेवेले तरी चालेल पण पायाखाली येऊ नये.

*🌹-हळद,कुंकू-🌹* :-
कुंकु हळदिपासुन बनवतात.
हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते.
म्हणुन जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदित भुमी लहरी जास्त असतात.
असे पृथ्वीतत्व असलेले हळद,
कुंकू वाहिल्याने मुर्तितील 
दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात.
पृथ्वीवरील अनिष्ट शक्तिंचा
त्रास होत नाही.
पुर्विच्या काळी स्त्रिया ठसठसशित कुंकू लावत,पुरूष ही टिळा लावुनच बाहेर पडत.
शिवाय हिंन्दू मराठी महिला रोजच्या जीवनात सकाळी देव पूजेनंतर उंबरठ्यावर पाणी घालून हळद कुंकू तांदूळ,फुल वाहून उंबरठ्याचा सकाळी येणाऱ्या लक्ष्मीचा दारात सन्मानच एकप्रकारे करतात.
त्या घरात लक्ष्मी नांदते.

*🥀-धुप-🥀* :-
धुप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे.
या सुगंधामुळे देवता पुजास्थळी आकर्षित होतात.
धुपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.*(वाईट शक्ति)*
म्हणुन सकाळ संध्याकाळ धुप,अगरबत्तीने पुजन करून दाखवले जाते.

*🌺-दिप-🌺* :-
खरी पुजा आत्मज्योतीनेच करायची असते.
आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही.
म्हणुन संकेत रुपाने निरांजनात गाईच्या तुपात वात पेटवुन देवाना ओवाळतात.
किंवा तिळाचे तेलही चालते.
तुपाच्या दिव्यातुन निघणाऱ्या लहरी सुक्ष्म असल्याने त्या अतिसुक्ष्म अशा देवतांच्या लहरी अकृष्ट करू शकतात.
म्हणुन वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे हा भाग महत्वाचा आहे. 

*🥀🪔-आरती-🪔🥀* :-
आरती करताना घंटा व ईतर वाद्ये वाजवतात.
त्यामुळे मुर्तित आलेली देवतांची शक्ति बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते.
वाद्ये नेहमी तालात वाजवावी.
आरती सुरात म्हणावी.
बेसुर वाद्ये वाजवणे व बेसुर आरती करणे म्हणजे.
वातावारणातील अनिष्ट शक्ति अकृष्ट करणे होय. 

*🌹👏-नमस्कार-🌹* :-
नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात.
त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते.
एका हाताने देवाला नमस्कार करु नये.
*देवापेक्षा तुम्ही मोठे नाही.*
काही लोकांना सवय असते घाईघाईने एका हाताने पाया पडतात.हळदकुंकू पटापट घालतात निघून जातात.त्याला पूजा म्हणत नाही.
या मुद्रेमुळे आपण देवताकडुन येणाऱ्या शक्ती लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो. 
 

*🌻-नैवेद्य प्रसाद-🌻* :-
प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो.
*त्या.त्या.*
देवताना त्यांच्या आवडीचा निवेद्य दाखविल्याने त्या देवतांची शक्ति लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात.
असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ति मिळते. 
*(खिर,पुरणपोळी,वरणभात,)* फार फार वर्षांपूर्वी आपल्या *🥀ऋषीमुनींनी🥀* देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवुन दिलेली आहे.
फक्त स्वधर्माचा अभ्यास काही लोकांना कमी असल्याने काही *बुद्धीवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात.*
शेवटी कृती भावपुर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही.
देवांंना नेहमी गोडाधोडाचे नैवेद्य फार आवडते.पुर्विच्या काळी गोडाधोडाचे नैवद्य दाखविणे त्याकाळच्या लोकांना शक्य न्हवते.किंवा साधणे न्हवती.
पण आताच्या काळातील काही लोकांना पूर्वीच्याच काळात वावरणारे दिसत आहेत.
*नस्ते देवांना नैवद्य दाखवून नवीन-नवीन प्रथा पाडायची नाही किंवा सवयी लावून ठेवायच्या नाही.*
नंतर आम्हाला जमेल की नाही आमच्या मुलांना जमेल की नाही दही भात दाखवला झाले असे.
पुर्वीचे लोकं हाफ पँन्ट घालत होते आता तर्हेचे-तर्हेचे फँशन कपडे घालतात.मग हाफ पँन्ट का घालत नाही आम्ही.कशाला नस्ते खर्चात पडून नको ती प्रथा पाडून घेतली.

*🌼-प्रदक्षिणा-🌼* :-
प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजुने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो....
देवळात प्रदक्षिणा तीन,पाच,सात,नवू अशा पध्दतीने घालाव्यात.घरात स्व:भवताली घालाव्यात...
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...