तूप आणि मध बरोबर घेतल्यास विषबाधा होते विरुद्ध आहार आहे
तूप आणि मध हे सहजपणे उपलब्ध होऊ शकणारे दोन घटकपदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वरदान आहेत.
*तूप आणि मध हे सहजपणे उपलब्ध होऊ शकणारे दोन घटकपदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वरदान आहेत. विविध आजारांमध्ये हे दोन्ही घटक इतके गुणकारी आहेत की ते घरोघरी असायलाच हवेत.*
*तूप : घृतम् आयु:।*
*‘सहस्रर्वीय विधिभिर्घृतं कर्मसहस्रकृत्’!*
*ज्याच्या आहारात थोडय़ा फार प्रमाणात तूप रोज आहे तो निरोगी आयुष्य दीर्घकाळ जगतो.*
सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थात तूप हे सर्वश्रेष्ठ आहे. शरीराची दर क्षणाला झीज होत असते. ती भरून यायला शरीरात स्निग्धता लागते. सात धातूंपैकी मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. त्याच्या शरीरातील ठिकठिकाणच्या कार्यास तुपाची मदत मोठी होते.
*आयुर्वेदशास्त्राप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक व मधुर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे. त्याची तुलना फक्त सुवर्णाशी होऊ शकते. शरीराला तुपामुळे स्थैर्य मिळते.*
बुद्धी, धारणाशक्ती, स्मरणशक्ती टिकवणे व वाढवणे याकरिता तूप माफक प्रमाणात घेतल्यास खूप मोठा उपयोग होतो.
घृत हे शीत गुणाचे असून वात व पित्त विकारात काम करते.
अग्निमांद्य किंवा भूक न लागणे या विकारात अग्निवर्धन होते. शीतपित्त व गांधी उठणे या विकारात तुपात कालवून मिरेपूड लावली तर अंगाची खाज लगेच कमी होते.
आम्लपित्त विकारात नियमाने सकाळी व सायंकाळी पंधरा ग्रॅम तूप घ्यावे.
काँग्रेस गवताची अॅलर्जी, अंगाची आग होणे, तळपाय, तळहात किंवा डोळय़ांची जळजळ या विकारांत तसेच झोप न येणे, झोप उशिरा येणे, जळवात या विकारात तळपायाला, तळहाताला व कानशिलाला तूप चोळावे.
स्त्रियांच्या धुपणी विकारांत कृश स्त्रियांकरिता तूप हा मोठा दिलासा आहे.
पोटातील आतडय़ांना व्रण असल्यास तो सुधारून उलटय़ा, पित्तकाळातील पोटदुखी कमी होण्याकरिता निव्वळ तुपाचा आश्रय करावा.
कृश व्यक्तींनी कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी यावर थोडे तूप गरम पाण्याबरोबर घ्यावे.
ज्यांचा कोठा रुक्ष आहे,
शौचाला कठीण होते, खडा होतो त्यांनी रोज रात्री एक कप गरम दुधाबरोबर एक चमचा तूप घ्यावे. कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, डोळे रूक्ष होणे,
डोळय़ांचा वाढता नंबर, डोळय़ांत लाल रेषा येणे, डोळे वारंवार तळावणे या विकारांत रसायनकाली म्हणजे सकाळी वीस ग्रॅम तूप खावे.
उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, उष्णतेचे फोड होत असल्यास कृश व्यक्तींनी नियमित तूप खावे. कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा शंभर वेळा पाण्यात धुऊन तयार केलेले तूप नियमितपणे कुरूपाला घासून लावावे.
शांत झोपेकरिता, झोपण्यापूर्वी तळपाय, कानशिले, कपाळपट्टी यांना चांगले जिरवावे. वात, गुल्म किंवा पोटात फिरता वायुगोळा या विकाराकरिता जेवणाच्या सुरुवातीला तूप चमचाभर खाऊन जेवण सुरू करावे. जेवण संपताना पुन्हा एक चमचा तूप घ्यावे. वारंवार लघवी होणे- रात्री बऱ्याच वेळा लघवीकरिता उठावे लागत असल्यास व मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे विकार नसल्यास याचप्रमाणे जेवणाअगोदर व जेवण संपताना एक चमचा तूप खावे.
कृश माणसाला खूप घाम येणे, चक्कर येणे, वजन घटणे, थोडय़ाशा कामाने थकवा येणे, काम करणे नकोसे वाटणे, पायात गोळे येणे, मुंग्या येणे, लिखाणकाम जास्त केल्याने डोके हलके होणे या तक्रारीत दिनचर्येला सुरुवात करताना अनशापोटी तूप खावे. कृश माणसाच्या छातीत दुखणे, टी.बी. विकार, थुंकीतून रक्त पडणे, वारंवार बारीक ताप येणे, कडकी, जुनाट ताप या विकारात नियमितपणे तूप खावे.
शरीरातील कोणतीही जखम बाहेरची व आतडय़ातील भरून यावयास तुपाची मोठी मदत होते. मधुमेह कमी प्रमाणात असल्यास , किरकोळ कोणत्याही जखमांकरिता तुपाचा वापर पोटात घेणे, जखमेला बाहेरून लावणे, याकरिता करावा. जखमेवर तूप हे मोठे रामबाण औषध आहे. डोकेदुखी विकारात रोज व रात्रौ व सकाळी दोन थेंब तूप नाकात टाकावे. तोंड येणे, तोंडात असणे या विकारात जिभेला तूप लावावे. फोड बरे होतात.
किरकिर करणारी मुले, कडकी, पुन:पुन्हा बारीक ताप येणे, बारा-पंधरा वर्षांची मुले वयाच्या मानाने लहान वाटणे, अग्निमांद्य, जीर्णज्वर या बालविकारात तूप व मिरेपूड असे मिश्रण नियमाने रोज सकाळी घ्यावे. सहा सप्तकात गुण येतो. तीन महिन्यांत बालकाची प्रकृती सुधारते.
समस्त त्वचाविकारात (मधुमेह सोडून) तुपाचा पोटात घेण्याकरिता व खाज, आग थांबवण्याकरिता उपयोग आहे. विशेषत: सोरायसिस विकारात अवश्य उपयोग करावा.
समस्त विषविकारात पोटात घेण्याकरिता तुपासारखा उपाय नाही. विषाच्या दहा गुणांविरुद्ध लढा द्यावयास तुपाचे दहा गुण आहेत. चुकीच्या औषधांचे शरीरावर, डोळय़ांवर, त्वचेवर, केसांवर, किडनीवर दुष्परिणाम झाल्यास रसायनकाळी (सकाळी) उत्तम दर्जाचे तूप नियमित घ्यावे.
शरीरातील सर्वश्रेष्ठ असे ओज, त्याचे रक्षण व वर्धन तुपाच्या सेवनाने होते.
स्वप्नदोष, दुर्बलपणा, हस्तमैथुनामुळे आलेले दोष, नपुंसकता,
No comments:
Post a Comment