पोटदुखी झाली, की अगदी अस्वस्थ वाटू लागते. मग, आपण मेडिकलमधून गोळ्या आणून त्या खाऊन टाकतो; पण हा उपाय तात्पुरता आहे. पुन्हा पोटदुखी चालू होते; पण आयुर्वेदाने यावर एक रामबाण उपाय सांगितला आहे, तो म्हणजे ताक.
ताकाचे महत्त्व अगदी हजारो वर्षांपासून म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून आहे. किंबहुना श्रीकृष्णाच्याही आधीच्या काळापासून याचे महत्त्व आहे. तसे हिंदू, शीख आणि जैन धर्मात याच्या सेवनाने मिळणारे अनेक फायदे सांगितले आहेत.
दिवसातून तीन ते चार वेळा भाजलेले जिरे, थोडे मीठ आणि बारीक वाटलेले मिरे टाकून ताक प्यायल्यास एका आठवड्यात पोटातील दुखणे थांबते.
आपल्या पोटात अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव संचार करत असतात. पोटात असलेल्या लहान व मोठ्या आतड्यांमध्ये हे कृमी कोटींच्या संख्येने असतात; पण त्यापैकी काही सूक्ष्म जीव आपल्या आरोग्यासाठी लाभदायी असतात, तर काही उपद्रवी असतात. नुकसानकारक कृमी अधिक सक्रिय झाल्यास आपल्याला अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. उदा. मळमळ, अजीर्ण, ताप, थकवा, वारंवार शिंक, उलटी, पोटदुखी अशी लक्षणे सांगितली आहेत.
पोटाचे विकार सुरु असताना रुग्णाने पाचनक्रियेत कुठलाही अडथळा निर्माण होईल, असा कोणताही पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ वर्ज्य करावेत. अपचन आणि अजीर्ण झाल्यावर ताक घ्यावे. तसे पाहायला गेले, तर रोजच्या जेवणात दिवसातून एकदा तरी ताक घ्यावे. याबरोबरच भूक न लागणे, पोटात जोरात कळ येणे आदी लक्षणेही जाणवतात.
====================================================
*सुंठ.....*
1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.
2) आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.
3) आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.
4) पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.
5) आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.
6) आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.
7) सुंठीवाचून खोकला गेला' ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.
8) आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.
9) सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.
10) याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये.
सूचना- वरील दिलेला आयुर्वेदिक उपाय,सल्ला अमलात आणण्यापूर्वी आपल्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत
.
.
No comments:
Post a Comment