Thursday, June 30, 2022

वास्तुटिप्स

 वास्तुटिप्स 

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹


🏚️ घरात ठेवलेल्या वस्तूंचा वास्तुवर उलटा परिणाम ....✍🏻
   तुमच्या घरात अशा काही वस्तु असतील ज्या बघताना शुल्लक दिसतात, परंतु वास्तुच्या दृष्टीने त्यांचे मोठं महत्त्व असते....
 खुपदा लोक शास्रा विषयी माहिती नसल्यामुळे कळत-नकळत घरात काही वस्तु चुकिचा ठिकाणी ठेवतात,वापर करतात. 
जाणुन घेऊया कि एखादी छोटिशी चुकि तुंम्हाला किती जड जाऊ शकते..
 ♦️ मुख्य दरवाजा :-
 घराच्या मुख्य दरवाजा जवळ अंधार असण खुप अशुभ मानले जाते. मुख्य दरवाजाचा रंग, ठेवण आकर्षित नसणं हे सुध्दा अशुभ असते. त्याने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या संधी कमी होतात. 
♦️ घरातील चित्र वा फ्रेम :- घरात चुकिचा जागेवर चित्र जर लावलं गेलं तर ते अशुभता दाखवते. चित्रावर धुळ जमुन राहणे, एका पेक्षा जास्त चित्र लावणे चांगले मानल जात नाही. त्याने घरात वादविवाद जास्त होतात आणि नाती खराब होतात. ...
 ♦️ घरात चप्पल,बुट आणि कपडे :- 
  घरात कपडे आणि बुट चप्पलांचा वापर झाल्यावर त्यांना ईकडे तिकडे फेकण अशुभ असतं. चप्पल, बुट, कपडे हे नेहमी कपाटात व्यवस्थित ठेवावेत, अलमारीत कपडे अव्यवस्थित ठेवल्याने पैशाची नासाडी होते. करिअर मध्ये सुध्दा चढ उतार येतात. ..
 ♦️ पाणी वाहुन जाणे..
 घरात नळांमधुन पाणी ठीबकत राहुन, वाहुन जाणे घरातील टाक्यांमधुन अनावश्यक पाणी वाहुन जाणे. आवश्यकते पेक्षा पाणी जास्त वापरुन वाहुन घालवणे, त्यामुळे आरोग्य बिघडते, मानसिक आरोग्य बिघडते....
 ♦️ घरात जुन्या फाटक्या वस्तु ठेवणे..
 घरात ‌उपयोगात न येणारे कपडे, चप्पल बुट किंवा अजून काही जुन्या झालेल्या वस्तु घरात साठवुन ठेवल्याने राहु हा खराब होऊन आजारपण देतो, मानसिक ताण वाढवतो....
 ♦️ खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू :-
 घरात सर्व खोल्यांमध्ये नीट प्रकाशाची सोय नसणे. फ्युज,बल्ब, इत्यादींचा वापर करताना अडचणी येणे. खराब झालेले इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरु नये त्याने अनावश्यक ताण निर्माण होतो. घरात मुलांची स्थिती खराब होते...
 ♦️ दरवाजा आवाज करत असेल तर :- 
 घरातील दरवाजा योग्य प्रकारे खोलताना बंद करताना जोरात आवाज करत असेल तर घरात क्लेश सुरू होणार याची चाहूल असते. त्याने घरातील सदस्यां मधील नाती खराब होतात.....

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...