Sunday, June 26, 2022

कोजागिरी पौर्णिमा*

 *🌷🌷 श्री स्वामी समर्थ 🌷🌷

पौर्णिमेची रात्र,चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते.अश्विन.शुद्ध पौर्णिमा म्हणजे *कोजागिरी पौर्णिमा*. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शु पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12.39 या 39 मिनिटात करायचा असतो. *भगवान इंद्र,लक्ष्मी,चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते* .शक्यतो हा उत्सव घरीच करावा. वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात *त्यांना अमृताचा(दूध) नैव्यद्य लागतो*

*पूजा विधी मांडणी*
मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर..............
1)लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी.
2)विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी
3)तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा....त्यात आंब्याची डहाळी इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावी
4)चंद्राचे प्रतीक म्हणून चंदना चा भरीव गोल बनवावा .
अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी.
रात्री 12 ते 12.30 या तीस.मिनिटात दूधाचे भांडे चंद्र किरणात ठेवावे. 
*जेणेकरून चंद्र देवता शलाका रूपात अमृता चा प्रसाद देतात*
4)12.30 ला.पूजेच्या पाट समोर दूधाचे भांडे ठेऊन चारही देवांची हळद..कुंकू,पांढरी फुले,अक्षता,अष्टगंध,वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावी.दुधाच्या भांड्यात एक तुळसी पत्र टाकावे. व नैव्यद्य दाखवावा. व प्रार्थना म्हणावी.
*ऋण रोगा दी दारिद्रय म अप मृत्यू भय*
*शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा*

दुधाचा नैवेदय फक्त घरातील व्यक्तींनी च घ्यावा
. दुसऱ्या दिवशी सुपाऱ्या जपून ठेऊन ... लक्ष्मी, कुबेर अशी नाव लिहून जपून ठेवाव्यात

*कोजागिरीच्या दिवशी रात्री 12 ते12.30 दरम्यान लक्ष्मी प्राप्तीची करावयाची सेवा*
श्री स्वामी समर्थ जप....11माळी
श्री लक्ष्मी गायत्री...1 माळ
श्री विष्णू गायत्री....1 माळ
श्री कुबेर मंत्र....1माळ
श्री सुक्त ....16 वेळा 
व्यंकटेश स्तोत्र...1वेळा
गीतेचा 15 वास अध्याय 
 *ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे..लक्ष्मी म्हणजे शोभा...लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी,गुण लक्ष्मी, भाव लक्ष्मी वगैरे...सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मी लाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे.कृपाळू आहे.ती हित करणारी आहे.पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते,त्रास देते,कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.....या मोठ्या बहिणी स अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्का बाई चा फेरा आला...ही अक्का बाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते .पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात.....कोण जातोय? ...को जागर्ती ? ...या वरून या पौर्णिमेला ..कोजागिरी...हे नाव पडले..याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करत आहेत किंवा नाही हे पाहत असतो.वारंवार तो कोजगर्ता असे विचारतो...यावरून हे नाव रूढ झाले*

 *जनकल्याण* *प्रतिनिधी* : *भारती* *जागडे* :9561022322

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...